1. कृषीपीडिया

झाडाच्या चयपचय क्रिया.

झाडाच्या चयापचय क्रियेतून त्याला अनावश्यक असलेले काही पदार्थ मुळांवाटे बाहेर पडत असतात. ह्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर, प्रथिने, कर्बोदके, इत्यादी असतात. ह्या पदार्थांना इंग्रजीतून Root Exudates असे म्हणतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
झाडाच्या चयपचय क्रिया.

झाडाच्या चयपचय क्रिया.

ही exudates खाण्यासाठी मुळांभोवती उपयुक्त सूक्ष्मजीव (बॅक्टेरिया व फंगी) गोळा होतात. झाडाची चयापचय क्रिया सुरळीतपणे चालू असल्यास आणि जमिनीचे आरोग्य चांगले असल्यास उपयुक्त सूक्ष्मजीवांचे मुळांभोवती एक आवरण तयार होते. हे आवरण जमिनीद्वारे/ मुळांवाटे होणाऱ्या रोगांना अटकाव करते. 

म्हणूनच जमिनीतील उपयुक्त सूक्ष्जीवांची वाढ कशी होईल ह्याचा विचार आपण करायला हवा. घातक रसायनांच्या आळवणी पैसे तर वाचतीलच, मालाच्या दर्जातही वाढ होईल.

कुजणे आणि सडणे या दोन्हींत काय फरक आहे? (भाग १)

१) कुजणे हे चांगल्या सुक्ष्मजीवांचं काम आहे तर सडणे हे वाईट सुक्ष्मजीवांचं

२) ऑक्सिजन उपलब्ध असला तरच कुजण्याची प्रक्रिया घडते, तर ऑक्सिजन उपलब्ध नसल्यास सडण्याची प्रक्रिया घडते.

मुळं श्वसन करत असतात. ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायॉक्साईड सोडतात. माती जर घट्ट असेल तर अशा वेळी मातीत कार्बन डायॉक्साईड साचत जाईल. परिणामी मुळं घुसमटून मरतील. 

म्हणूनच माती भुसभुशीत ठेवण्याकडे आपला कल असावा. नैसर्गिकरित्या हे काम गांडुळं व सूक्ष्मजीव करत असतात

कोणत्याही झाडाला फुलं येण्याची मुख्य कारणे :

 

१) झाड मरेल असे वाटते तेव्हा

२) झाडात अन्नाचा भरपूर व समतोल साठा असेल तेव्हा ( म्हणजेच झाडात पुरेसे कर्ब असल्यावर)

 

याचा अर्थ असा की फुलं येण्यासाठी जास्त औषधं फवारून आपण झाडाला आतून खिळखिळे बनवत असतो. त्याऐवजी जर त्याला आपण योग्य प्रमाणात अन्न देण्यावर भर दिला तर झाडाचं आयुष्यमान वाढण्यात मदत होईल

बालपणात (अगदी लहान असताना) झाडाची वाढ जमिनीखाली होत असते. मुळं तयार होतात. साहजिकच खोड व पान यांच्या वाढीकडे झाड त्या काळात दुर्लक्ष करत असतं. म्हणूनच बालपणाच्या काळात पानांची वाढ नाही म्हणून चिंता करायची नसते. तेव्हा पानं कमीच येतात आणि खोडही छोटे असते.

 तुम्हाला माहित आहे का?

 

पानाच्या पृष्ठभागाचा pH (सामू) 7 पेक्षा कमी असल्यास भुरीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.

English Summary: Plant metabolism. Published on: 28 November 2021, 08:33 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters