1. कृषीपीडिया

उन्हाळ्यात करा काकडीची लागवड

KJ Maharashtra
KJ Maharashtra
काकडीची लागवड

काकडीची लागवड

काकडी या पिकाची योग्य नियोजन करून उत्पन्न घेतले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगती सुधारणा होऊ शकते.  काकडीला उन्हाळ्यात जास्त मागणी असते.

जर शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात योग्य नियोजन करून चांगले उत्पन्न घेतले तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.

काकडी लागवडीचा कालावधी

 काकडी पिकाची लागवड वर्षाच्या जून किंवा जुलै आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करणे महत्त्वाचे असते. लागवड करणे आदी शेताची चांगली मशागत करून योग्य प्रमाणात शेण खताचा पुरवठा करावा. जर माती परीक्षण केले असेल तर उत्तम. 50 किलो पालाश, 50 किलो स्फुरद या रासायनिक खतांचा पुरवठा योग्य प्रमाणात करावा. नत्राचा पुरवठा एकाच वेळेस न करता दोन हप्त्यात विभागून द्यावा. रासायनिक खतांचा पुरवठा खुरपणी झाल्यानंतर साधारणतः तीन आठवड्यांनी पहिला डोस व सहा हप्ता नंतर दुसरा डोस द्यावा.

  जमीन व हवामान

 काकडे पिकाच्या लागवडीसाठी मध्यम किंवा रेताड जमीन उपयुक्त असते. जास्त खोल व निचरा होणाऱ्या जमिनीत आली लावणी करता येते. काकडी पिकाच्या उत्पादनात हवामान या घटकाचा फार प्रमाणात प्रभाव पडतो. साधारणपणे काकडी पिकास उष्ण हवामान लाभदायी असते. लागवडीच्यावेळी 11 अंश सेल्सिअस पेक्षा तापमान कमी नसावे. जर तापमान यापेक्षा कमी असेल तर पिकाच्या उगवण शक्तीवर परिणाम होतो. काकडी पिकाच्या वाढीसाठी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 24  अंश सेल्सिअस तापमान योग्य असते.

 

लागवड पद्धत

 काकडी पिकाची लागवड सरी-वरंबा पद्धतीने केलेली चांगली असते. दीड ते एक मीटर आळे पाडून तीन फुटाची सरी पाडावी. व त्यात 90 सेंटिमीटर अंतरावर टोकण पद्धतीने लावणी करावी.

 पाण्याचे प्रमाण

 जमिनीचा मगदूर पाहून व इतर वेळेस गरज ओळखून पाण्याचा योग्य तो पुरवठा करावा. काकडी पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. जर उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण जास्त असेल तर पाण्याचा ताण आला तर वेल पिवळे पडतात. शक्यतो फुले धरण्याच्या वेळी पाणी योग्य प्रमाणात देणे फार महत्त्वाचे आहे. पाण्याचा ताण देऊन एकदम जास्त प्रमाणात पाणी दिल्यास फळांना तडे पडू शकतात. काकडीत मादी फुलांची वाढ होणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. त्याकरिता जिब्रेलिक एसिड 10-25 पी पी एम किंवा बोरान तीन पीपीएम च्या फवारण्या पीक दोन ते चार पानांवर असताना करावा. त्यामुळे माजी फुलांची वाढ होण्यास मदत होते.

  काकडीवरील रोग

 फळकूज आणि खोड कुज हा  काकडी पिकावरील मुख्य रोग आहे.  त्यासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढऱ्या बुरशी साठी मेट्यालयाक्सिल किंवा मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पांढरी माशी, मावा, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रतिबंधक करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा गुलाल आला या किटकनाशकांची फवारणी प्रति 15 लिटर पाण्यात आठ ते दहा मिलि या प्रमाणात करावे. जर एकात्मिक कीड व्यवस्थापन केले तर ते फायद्याचे ठरते.

 

फळांची तोडणी

 फळांची तोडणी शक्यतो काकडी निघायला चालू झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी करावी. सकाळच्या कोवळ्या उन्हात तोडणी केल्याने फळे ताजीतवानी दिसून फळांना बाजारात चांगली मागणी असते. पर्यायाने चांगला भाव मिळून चांगले उत्पन्न मिळते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters