उन्हाळी हंगामात बाजरी, मूग, भुईमूग, सूर्यफूल या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकांच्या लागवडीसाठी जमीन, योग्य पीक पद्धती, पेरणी पद्धती, सुधारित बियाणे, बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन यांचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून या पिकांचे चांगले उत्पादन मिळेल.
भुईमूग
लागवडीसाठी मध्यम, भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची १२-१५ सेमी एवढीच खोल नांगरट करावी, जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. त्यामुळे काढणीवेळी झाडे उपटताना किंवा वखराने काढताना आया तुटून शेंगा जमिनीत राहतात. परिणामी उत्पादनात घट येते. पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणी करताना उपट्या जातींसाठी दोन ओळींत ३० सेंमी, तर दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवावे. निमपसऱ्या जातींसाठी ४५ बाय १० सेमी अंतर ठेवावे.
बियाणे प्रमाण (प्रति हेक्टरी) :
कमी आकाराचे दाणे असलेल्या जाती १०० किलो
मध्यम आकाराचे दाणे असलेल्या जाती १२५ किलो
टपोरे दाणे असलेल्या जाती १५० किलो.
भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश, जागतिक दूध उत्पादनात 24% वाटा
जाती : एसबी ११, टीएजी २४, टीजी २६, जेएल-५०१, फुले ६०२१
बियाणे प्रति हेक्टरी : १०० किलो.
फुले प्रगती, फुले व्यास, टीपीजी ४१, फुले उनप, फुले भारती : बियाणे प्रति हेक्टरी १२५ किलो.
◆पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी, बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे. नंतर पेरणी करावी.
कोरफडीची शेती करून वर्षाला कमवा 10 लाख, जाणून घ्या शेती कशी करावी
खत व्यवस्थापन :
पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत कुळवणीवेळी मिसळावे.
पेरणीवेळी नत्र २५ किलो स्फुरद ५० किलो + जिप्सम ४०० किलो प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी पेरणीवेळी जिप्समची अर्धी मात्रा (२०० किलो) आणि उर्वरित २०० किलो आऱ्या सुटताना द्यावी.
मध्यम काळ्या जमिनीत अधिक उत्पादन, पाणी व खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी पूर्वमशागतीवेळी व शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी ५ टन शेणखत द्यावे.
शिफारस खत मात्रेच्या १०० टक्के खते (हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद ) विद्राव्य स्वरूपात ठिबक सिंचनातून नऊ समान हप्त्यात द्यावे.
महत्वाच्या बातम्या;
धोनी झाला शेतकरी, तब्बल दोन वर्षांनी पोस्ट करत सर्वांनाच दिला धक्का
बैलगाडीतून आले लग्नाचे वऱ्हाड, पारंपरिक विवाह सोहळ्याची रंगली चर्चा
सरकार २ हजार रुपये परत घेणार, शेतकऱ्यांकडून 100 कोटी वसूल करणार
Share your comments