सध्या शेती व्यवसायात बदल करणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. काळाच्या ओघात पीकपद्धतीत बदल स्वीकारणे आता शेतकऱ्यांसाठी गरजेचे ठरत आहे. काही शेतकरी बांधव पीकपद्धतीत मोठा बदल देखील करीत आहेत. मात्र, अजूनही अनेक शेतकरी बांधव पारंपारिक पीक पद्धतीला अधिक पसंती देत असल्याचे बघायला मिळत आहे. परंतु यामुळे शेतकरी बांधवांना चांगले आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे.
यामुळे पारंपरिक पिकांसमवेतच नवीन नगदी तसेच फळबाग पिकांची लागवड करणे आता गरजेचे बनले आहे. यामुळे आज आपण अननस शेती विषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
भारतात अननस ची शेती केली जाते मात्र अजूनही अननसची शेती भारतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळत नाही. अननस शेतीची सर्वात चांगली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याची शेती बारामाही केली जाऊ शकते. इतर फळपिकांच्या तुलनेत शेतकरी बांधव या पिकातून चांगला नफा कमवू शकतात. तज्ञांच्या मते, हे उबदार हंगामातील पीक आहे. असे असले तरी याची लागवड बारामाही कोणत्याही हंगामात केली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
अननस पिकातून उत्पादन मिळवण्यासाठी सुमारे 18 ते 20 महिने लागतात. फळ पिकल्यावर त्याचा रंग लाल-पिवळा होऊ लागतो. त्यानंतर त्याच्या काढणीची प्रक्रिया सुरू होते. अननसाची वनस्पती निवडुंग प्रजातीची आहे. त्याची देखभाल आणि व्यवस्थापन देखील खूप सोपे आहे.
यासोबतच हवामानाची फारशी काळजी करण्याची गरज नाही. याशिवाय इतर झाडांच्या तुलनेत याच्या झाडांना कमी पाण्याची गरज भासत असते. शेतात तण राहणार नाही याची काळजी घ्या आणि रोपांसाठी योग्य सावलीची व्यवस्था करा निश्चितच यामुळे अननस शेतीतून चांगले उत्पन्न मिळवले जाऊ शकते.
अननसाच्या रोपाला एकदाच फळ येते. म्हणजेच एका लॉटमध्ये एकदाच अननस मिळू शकते. यानंतर दुसऱ्या लॉटसाठी पुन्हा पीक लावावे लागते. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अननसाचे सेवन अनेक रोगांसाठी गुणकारी असल्याने बाजारात याची मागणी खूप अधिक आहे. बाजारात अननस फळ सुमारे 150 ते 200 रुपये किलोने विकले जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने हेक्टरी 30 टन अननसाचे उत्पादन घेतल्यास लाखोंचा नफा मिळू शकतो.
Share your comments