1. कृषीपीडिया

स्फुरद विरघळवणारे जीवाणुः स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणुंची कार्य पध्दती

जमिनीत अटकुन राहणारा आणि जमिनीत आधीपासुन असलेला स्फुरद हा, स्फुरद विरघळवणारे जीवाणू, पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरुपात रुपांतरीत करतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
स्फुरद विरघळवणारे जीवाणुः स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणुंची कार्य पध्दती.

स्फुरद विरघळवणारे जीवाणुः स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणुंची कार्य पध्दती.

जमिनीतील सेंद्रिय घटक आणि जमिनीत असलेल्या विविध मिनरल्स मधिल असेंद्रिय अशा दोन्ही प्रकारच्या संयुगात अडकुन असलेला स्फुरद विरघळवण्याची क्षमता जीवाणू, बुरशीत असते.  

हि प्रक्रिया कशी होते, या बाबतीत अनेक सिध्दांत आहेत, त्यापैकी सेंद्रिय अॅसिड स्रवुन स्फुरद विरघळवणे हा एक सिध्दांत आहे.

या सिध्दांतानुसार स्फुरद विरघळवणारे जीवाणू हे त्यांच्या पेशीतुन विविध सेंद्रिय आम्ल सरवतात, ज्यामुळे अविद्राव्य असलेला स्फुरद विद्राव्य अवस्थेत रुपांतरीत होतो. या सिध्दांतावर अभ्यास करणाऱ्या अनेक शास्रज्ञांना स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणू मुळे फिल्ट्रेट (ढोबळ मानाने असे म्हणता येईल - ज्या मिडीयावर स्फुरद विरघळवण्याची पध्दती जाणून घेण्यासाही अविद्राव्य स्फुरद आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू वाढवले जातात) चा सामु (pH) हा 7 पासुन 2, इतका कमी झालेला आढळुन आलेला आहे, ज्यावेळेस ह्या फिल्ट्रेट चे परिक्षण केले गेले त्यावेळेस त्यात अनेक सेंद्रिय आम्ल (Organic Acid) आढळुन आलेत. ज्यात मॅलिक, ग्लुकोनिक, ग्लाऑक्झालिक, सक्सिनिक, टारटॅरिक, फ्युमॅरिक, अल्फा केटो ब्युट्रिक, ऑक्झॅलिक, सायट्रिक, २-केटो ग्लुकोनिक अॅसिड आढळुन आलेत.

जीवाणू हे चयापचयाच्या ऑक्सिडेटिव्ह श्वसन (Respiration) किंवा कुजवणे (Fermentation) या क्रियांच्या दरम्यान सेंद्रिय आम्ल स्रवत असतात. सेंद्रिय आम्लाचा प्रकार आणि त्याची स्रवण्याची तिव्रता हे सुक्ष्मजीवानुसार बदलतात. जीवाणू व्दारा स्रवलेले सेंद्रिय आम्ल हे अविद्राव्य स्वरुपात असलेले स्फुरद, सामु कमी झाल्याने विद्राव्य स्वरुपात रुपांतरीत करतात. दुसरा असा अंदाज आहे कि, स्फुरद सोबत स्थिरिकरण होणाऱ्या धन भार असलेल्या मुलद्रव्यांना (Ca, Fe,Al) ते चिलेट करतात.

जीवाणू हे पेशीच्या बाहेर पचन करुन, त्यापासुन तयार होणारा पाचक रस ग्रहण करित असतात, यास एक्स्ट्रा सेल्युलर मेटाबोलिझम (Extra Cellular Metabolism) असे म्हणतात. पेशीच्या बाहेर अन्न पचविण्यासाठी जीवाणू विविध सेंद्रिय आम्ल स्रवत असतात. काही जीवाणू हे स्फुरद विरघळवतात हे सर्व प्रथम पिकोव्हॅस्का या शास्ज्ञास कळाले. त्याने सर्व प्रथम स्फूरद विरघळवण्याची क्षमता असते हे शोधुन काढले, आणि आज देखिल त्याने तयार केलेल्या मिडियावरच स्फुरद विरघळवणारे जीवाणू वाढवले जातात, तपासले जातात आणि त्यांची स्फुरद विरघळवण्याची क्षमता जाणून घेतली जाते.

जीवाणूंमधे आणखी एक जो सिध्दांत आहे त्यात जीवाणू त्यांच्या पेशीतुन काही ईस्ट्रेज गटातील एन्झाईम्स स्रवत असतात. या एन्झाईम्स मुळे आणि फॉस्फोटेज एन्झाईम मुळे फॉस्फोरस चे रुपांतर विद्राव्य स्वरुपात होत असल्याचे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. मुख्यत्वे करुन अमोनिया क्षारांच्या ग्रहणात जीवाणू जे प्रोटिन्स स्रवतात त्यामुळे फॉस्फोरस विद्राव्य स्वरुपात येतो.

याव्यतिरिक्त काही प्रमाणात जीवाणू व्दारा तयार केले जाणारे चिलेटिंग पदार्थ साईड्रेफोअर्स, मिनरल आम्ले,

इंडॉल असेटिक अॅसिड, जिब्रॅलिन्स, सायटोकारयनिन्स यांच्या मुळे देखिल फॉस्फोरस विद्राव्य स्वरुपात आणण्यास मदत मिळत असावी असा कयास आहे.

स्फुरद विरघळवणारे जीवाणू कधी वापरावेत.

ज्या पिकांचे जीवन हे ३ ते ५ महिन्याचे असते अशा पिकात स्फुरद विरघळवणारे जीवाणू १ वेळेस वापरावेत. हा वापर शक्यतो वाढीच्या सुरवातीच्या काळा पिकात एका पेक्षा जास्त वेळेस फळांची काढणी होते 

अशा पिकात जर १० पेक्षा जास्त वेळेस काढणी होणार असेल तर त्या पिकाचे जीवन हे ४ ते ५ महिने असले तरी देखिल ४ ते ५ वेळेस फळ काढणी झाल्यानंतर एकदा स्फुरद विरघळवणारे जीवाणू वापरावेत.

फळ पिकात माल काढणी नंतरच्या विश्रांतीच्या काळात, फुल धारणा होण्यापुर्वी, फळात जर दाणे असतिल तर फळांचा विकास होत असतांना स्फूरद विरघळवणाऱ्या जीवाणूंचा वापर करावा.

English Summary: Phosphorus dissolved microbs and their lifestyle Published on: 29 December 2021, 03:28 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters