1. कृषीपीडिया

स्फुरद विरघळवणारे जीवाणू: नावे व क्षमता.

निसर्गात आढळुन येणारे स्फुरद विरघळवणारे जीवाणू हे जमिनीत मुक्त स्वरुपात राहुन पिकासाठी स्फुरद विरघळवुन देण्याचे कार्य करत असतात. ह्या ठिकाणी आपण स्फुरद विरघळवणारे जीवाणू कशा प्रकारे कार्य करतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
स्फुरद विरघळवणारे जीवाणू: नावे व क्षमता.

स्फुरद विरघळवणारे जीवाणू: नावे व क्षमता.

आणि ते कोणत्या प्रकारचे असतात हे सविस्तर जाणुन घेणार आहोत.

स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणूंच्या वापरातुन स्फुरद उपलब्धता वाढते. कॅल्शियम, फेरस, मॅग्रेशियम ची उपलब्धता वाढते.

जमिनीतील जमिनीतील हानीकारक क्षार कमी होण्यास मदत मिळते. ज्यात प्रामुख्याने सोडीयम, क्लोराईडस, कार्बोनेटस आणि बायकार्बोनेटस चा समावेश होतो.

 जमिन भुसभुशीत होवुन पाण्याचा योग्य निचरा होतो.

पिकाच्या वाढीसाठी, विशेष करुन मुळांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतील अशी अनेक जैव रसायने हे जीवाणू स्रवत असल्या कारणाने पिकाची वाढ देखिल जोमदार होते.

पिकाची फुल धारणा, फळांची निर्मिती, जास्त प्रमाणात फळे असुन देखिल त्यांचा योग्य विकास होणे हे घडुन येते. पिकातील नैसर्गिक संरक्षण यंत्रणा सक्षम होते.

जमिनीची भौतिक आणि रासायनिक स्थिती सुधारते. स्फुरद विरघळवणारे जीवाणू हे जमिनीत, मुळांच्या परिसरात, रॉक फॉस्फेट, दगड आदी ठिकाणी आढळुन येतात. स्फुरद विरघळवणारे जीवाणू या गटात अनेक जीवाणू येतात, त्यापैकी एका किंवा एका पेक्षा जास्त जीवाणू असलेले उत्पादन आज बाजारात मिळते.

स्फुरद विरघळवणारे ऑक्टिनोमायसिटस -

Actinomyces,Streptomyces

स्फूरद विरघळवणारे सायनो बॅक्टेरिया -

Anabena sp., Calothrix braunii, Nostoc sp., Scytonema sp.

आताच जाणुन घेतलेल्या स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणूंपैकी ज्या जीवाणूं मध्ये स्फुरद विरघळवण्याची जास्तीत जास्त क्षमता आहे आणि जे पिक लागवड क्षेत्रातील परिस्थितीत सहजरित्या तग धरु शकण्यास सक्षम आहेत अशा बॅसिलस आणि सुडोमोनास गटातील जीवाणूंचा तुलनात्मक अभ्यास अनेक शास्रज्ञांनी केलेला आहे. त्यापैकी काही संशोधन अहवलांचा सारांश पुढील प्रमाणे. केळी या पिकाची लागवड झालेल्या शेतातील, मुळांच्या परिसरातील स्फुरद विरघळवणारे जीवाणू वेगळे करण्यासाठी पिकोव्हॅस्का मिडियम वर ट्राय कॅल्शियम फॉस्फोरस च्या उपस्थितीत वाढवले गेलेत. ज्या प्रमाणात ट्राय कॅल्शियम फॉस्फेट विरघळलेला आढळुन आला त्यानुसार त्या परिसरातील जीवाणू वेगळे करुन पुन्हा त्यांचे प्रमाणिकरण करण्यात आले. या प्रयोगात बॅसिलस सबटिलीस (१६०.८२ मिमी) आणि सुडोमोनास औरिगोनीसा (१२६.११ मिमी) यांचे व्दारा सर्वाधिक परिसरात स्फूरद विरघळवण्यात आलेला आहे असे आढळुन आले.

या ठिकाणी स्फुरद किती प्रमाणात विरघळला हे मिमी म्हणजेच मिली मिटर मधे दिलेले आहे. हे थोडे विचित्रच वाटत असेल की, विरघळलेला स्फुरद हा मिलि ग्रॅम, किंवा किलो ह्या एफकात न मोजता कसा काय फुटपट्टी घेवुन मिलि मिटर मध्ये मोजतात. स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणूंची स्फुरद विरघळवण्याची क्षमता तपासण्याकरीता एका काचेच्या प्लेट मध्ये ट्राय कॅल्शियम फॉस्फेट किंवा तत्सम पदार्थ टाकुन त्यावर हे जीवाणू वाढविले जातात. हे जीवाणू जसे जसे स्फुरद विरघळवत जातात तसा त्या परिसरातील द्रावणाचा रंग बदलत जातो. हे अगदी शांत पाण्यात दगड टाकला असता जसे गोलाकार वलय तयार होतात तसे होतांना दिसते. पाण्यात दगड टाकल्यानंतर तयार होणारे वलय हे फार वेगात तयार होतात, आणि जीवाणू त्या तुलनेत संथ गतीने म्हणजे १२ ते ४८ तासात अशा प्रकारे स्फुरद विरिघळवलेला भाग तयार करत जातो.  

स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणूंची क्षमता काढतांना जितक्या मिमी परिसरातील ट्राय कॅल्शियम फॉस्फेट त्या जीवाणू ने विरघळवले तेवढ्या परिसराच्या आकारानुसार त्याची स्फुरद विरघळवण्याची क्षमता ठरवली जाते. जितक्या जास्त परिसरातील स्फुरद विरघळवला जातो तितक्या जास्त क्षमतेचा जीवाणू असे ठरवले जाते. शिवाय जीवाणू कल्चर (म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर विरजण) , मिडीया (मिडीया म्हणजे ज्या मिश्रणात जीवाणू वाढवला जातो असे मिश्रण, ह्या मध्ये जीवाणुंच्या वाढीसाठी पोषक ठरतील असे सर्वच पदार्थ योग्य प्रमाणात मिश्रीत असतात) मध्ये टाकल्यानंतर त्या मिडियाचा सुरवातीचा सामु (pH) आणि नंतरचा सामु बघितला जातो, सामू जितक जास्त कमी होईल तितकी त्या जीवाणूची सेंद्रिय आम्ल (Organic acids) स्रवण्याची क्षमता जास्त आणि तितकीच त्याची स्फुरद विरघळवण्याची क्षमता जास्त असे गृहीत धरले जाते. याचे गणित करण्याचे एक सुत्र आहे

स्फुरद विरघळवण्याची क्षमता =

(स्फुरद विरघळलेल्या भागाचा व्यास - पुर्ण वसाहतीचा व्यास )/(पुर्ण वसाहतीचा व्यास) X 100         

झारखंड येथे ज्या जमिनीत विविध रासायनिक खते, किटकनाशके, बुरशीनाशके वापरली जा तात अशा जमिनीतुन वरिल पध्दतीनेच स्फुरद विरघळवणारे जीवाणू मिळविण्यात आलेत. ह्या जमिनीतुन जे जीवाणू मिळालेत त्या जीवाणूंत बॅसिलस स्पे. ह्या जीवाणूंनी सर्वाधिक म्हणजेच ३७३.०७mg/L किंवा ppm ईतक्या प्रमाणात स्फुरद विरघळवला तर त्या खालोखाल सुडोमोनास स्पे. जीवाणूंनी ३६८.५८ mg/L किंवा ppm इतक्या प्रमाणात स्फुरद विरघळवला. ह्या संशोधनातुन हे देखिल लक्षात येते की, रासायनिक पदार्थ वापरले जात असले तरी देखिल जमिनीत काही प्रमाणात स्फुरद विरघळवणारे जीवाणू हे असतात.

उबोन राटछाटॅनी, थायलँड येथे सेंद्रिय पध्दतीने उगवल्या जाणाऱ्या मिरची पिकाच्या शेतातुन स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणूंचे काही नमुने तपासले गेलेत. ज्यात त्या शास्रज्ञांनी बुरखोल्डेरिया अॅम्बीफेरिया आणि बुरखोल्डेरिया ट्रॉपिका (Burkholderia ambifaria and B. tropica) या जातीतुन स्थिर फॉस्फोरसच्या द्रावणातुन १२६.३६ ते ४८८.५५ microgram/ml इतक्या प्रमाणात स्फुरद विरघळेला मिळाला.          

इराण मधे ईस्लामिक आझाद युनिव्हर्सिटी, कराज येथे सुडोमोनास चे दोन स्ट्रेन्स Ps११६ आणि Ps१७३, आणि बॅसिलस स्पे. च्या दोन जाती बॅसिलस मॅगाथेरियम आणि बॅसिलस सबटिलीस यांचा बटाटा पिकात तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यात असे आढळुन आले होते कि, सुडोमोनास आणि बॅसिलस च्या एकत्रीत वापराने स्फुरदची उपलब्धता जास्त प्रमाणात होते, वजन वाढते आणि बटाट्याच्या आकारात देखिल चांगला परिणाम दिसुन येतो. या दोघांचे मिश्रण वापरलेल्या आणि प्रक्रिया न केलेल्या (Control) अशा दोन्ही प्रयोगांच्या तुलनेत जेथे दोन्ही एकत्र वापरले गेले तेथे स्फुरद उपलब्धता ५७ टक्के वाढली. बॅसिलस मेगाथेरियम वापरलेल्या बटाटा रोपात प्रक्रिया न केलेल्या बटाटा रोपापेक्षा १.४८ पट जास्त असे मुळांचे वजन आढळुन आले.

बटाटाच्या मुळांचे सुडोमोनास च्या Ps १७३ या स्ट्रेन च्या वापर केल्यामुळे बटाटा पिकात जेथे वापर केलेला नाही अशा बटाटा पिकापेक्षा ३४.५ टक्के इतका जास्त स्फुरद उपलब्ध झाला, तर Ps ११६ वापरलेल्या भागात केवळ १६.४ टक्के इतक्या जास्त प्रमाणात स्फुरद उपलब्ध झाला होता.

English Summary: Phosphorus dissolved microbs and names Published on: 29 December 2021, 01:53 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters