1. कृषीपीडिया

तुर पिकावरील कीड व एकात्मिक नियंत्रण

KJ Staff
KJ Staff


तुर हे डाळवर्गीय पीकापैकी एक प्रमुख पीक आहे. पण बऱ्याच वेळा उत्पादन कमी होतना दिसते. अनेक कारणांमुळे या डाळीचे उत्पादन कमी होत असते, त्यातील एक कारण म्हणजे किड. तूर पीकावर प्रामुख्याने शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगावरील ढेकूण, फुलकिडी, खोडमाशी, पट्टेरी भुंगेरे अशा विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. कधी कधी साथीच्या स्वरूपात कीड आढळून आल्यास ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.  म्हणून या किडींची ओळख करून त्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

) शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer) : 

शा. नाव: Helicoverpa armigera 

तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा रंग हिरवट पिवळसर असून अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. एक मादी सरासरी ८०० अंडी घालते. मादी कोवळी पाने, काळ्या, फुले तसेच शेंगावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळी पाने, कळ्या व शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे ३० ते ४० शेंगांना नुकसान करून आपली आवस्था पूर्ण करते. या अळीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यात पूर्ण होतो.

) शेंगमाशी (Pod Fly) :  

शा. नाव : Melanogromyza obtusa 

शेंगमाशीचा रंग हिरवट असून आकाराने फारच लहान असते. ही अळी पांढऱ्या रंगाची असून ती गुळगुळीत असते व तिला पाय नसतात. सुरुवातीस या माशीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. परंतु वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडून माशी बाहेर पडल्यावरच नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. अळी शेंगेत प्रवेश करून अर्धवट दाणे खाते आणि हे दाणे खाण्यास व बियाणे म्हणून वापरण्यास उपयुक्त ठरत नाही. 

) पिसारी पतंग (Tur Plume Moth) : 

Exelastis atomosa 

या पतंगाची अळी १२.५ मि. मी. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरवडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते. 

) पाने फुले जाळी करणारी अळी (Spotted Pod borer) : 

Maruca vitrata / Maruca testualis

 ही अळी हिरवट पांढरट रंगाची असून दोन्ही बाजूंना काळे ठिपके असतात. या किडीचा प्राद्रुर्भाव पीक फुलोऱ्यात आणि जास्त आर्द्रता असतांना आढळून येतो. अळी पाने, फुले व कळी यांचा एकत्रित गुच्छ तयार करून त्यात लपून बसते. पीक फुलोऱ्यात आल्यानंतर अळी शेंगेमधील कोवळी दाणे फस्त करते.

) शेंगावरील ढेकूण (Pod Bug) : 

शास्त्रीय नाव: Cavigralla gibbosa 

 पिल्ले व प्रौढ पाने, शेंगातील रस शोषण करतात. पूर्ण वाढलेला ढेकुण हा तपकिरी रंगाचा असतो. अंडी ८ दिवसाची असताना त्यातून लाल रंगाची पिल्ले बाहेर पडतात. या किडीचा प्रादुर्भाव शेंगावर असला तरी पिल्ले फुले व पाने यामधील रस शोषण करतात आणि शेंगेमधील रस शोषणांमुळे शेंगावर पिवळसर ठिपके पडून नंतर शेंग आकसून जाते.

 

) पाने गुंडाळणारी अळी (Leaf Roller) : 

शास्त्रीय  नाव : Caloptilia soyella

या किडीचा पतंग लहान व तपकिरी रंगाचा असतो. एक मादी पानावर व देठावर ८० ते १०० अंडी घालते. प्रामुख्याने या किडीचा प्रादुर्भाव पेरणी उशिरा केल्यास तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त आर्द्रता व मध्यम तापमान असल्यास आढळून येतो.              

) तुडतुडे (Leaf Hopper) : 

 शास्त्रीय नाव : Empoasca kerri

 या किडीचे पिल्ले व प्रौढ पानातून रस शोषण करतात. त्यावेळी विषारी लाळ पानाच्या पेशीत सोडतात. त्यामुळे पाने पिवळी पडून सुकतात आणि गळून पडतात.

8) खोडमाशी (Stem Fly) : 

शा. नाव :Ophiomyia phaseoli 

या किडीची माशी खोडामध्ये अंडी घालते तसेच अंडी व कोषावस्थेत १ ते २ आठवड्याची असते. अंड्यामधून बाहेर पडलेली अळी कोवळ्या भागावर उपजीविका करते आणि नंतर कोवळे खोड पोखरून आत शिरते . यामुळे रोपाचा शेंडा वाळतो. 

9) पिठ्या ढेकुण (Mealy Bugs) :          

शास्त्रीय नाव : Phenacoccus solenopsis 

ही कीड रंगाने पांढरट व आकाराने लांब वर्तुळाकार असते. पिल्ले व प्रौढ तुरीची पाने व कोवळे शेंडे यामधील रस शोषण करतात आणि त्यामुळे ते वाळतात. 

0) पट्टेरी भुंगेरे (Blister Beetle) :

शास्त्रीय नाव : Mylabris phalerata

प्रौढ भुंगेरे अधिशपनाने फुलकळी व फुले खातात. एका दिवसात एक भुंगा २० ते ३० फुलांना हानी पोहचवतो. या किडीच्या नियंत्रणसाठी उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी. पिकावर प्रादुर्भाव दिसल्यास त्यांना पकडून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकावे त्यामुळे ते नष्ट होतील.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

  • पीक काढणी नंतर शेतात खोलगट नांगरट करावी
  • कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या वाणांची निवड करावी.
  • वेळेवर अंतरमशागत करून कीड ज्या तणावर उपजीविका करतात अशा तणांचा नाश करून पीक तणविरहित करावे.
  • तूर पिकांमध्ये हेक्टरी ५० ते ६० पक्षीथांबे करावे यामुळे पक्षी अळ्यांचे भक्षण करतील.
  • एकरी पिकांमध्ये तीन ते चार कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) लावावे.
  • शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी हेलीओकील (HaNPV २५० LE) हे प्रभावी विषाणूग्रस्त जैविक किटकनाशक पीक फुलोऱ्यात किंवा शेंगा लागताना फवारावे.
  • शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कडूनिंबाच्या ५ % अर्काची पहिली फवारणी पिक ५० % फुलोऱ्यात असताना व दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

 

कीड उपाययोजना फवारणीची वेळ कीटकनाशके प्रमाण / १० ली. पाणी

शेंग पोखरणाऱ्या किडी (शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंग माशी) आणि पाने व फुले जाळी करणारी अळी. पिकास फुले, कळ्या लागताच. ५ % निंबोळी अर्क + १ % साबण चुरा एकत्र फवारावे.  पीक ५० % फुलोऱ्यात असताना. क़्विनॉलफॉस २५ ई. सी. १६ मि. लि.

दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी. इमामेक्टीन बेण्झोएट ५ एस.जी. किंवा फ्लुबेंडामाईड ३९.३५ एस.सी. ५ ग़ॅम किंवा क्लोरॅन्ट्रीनीलीपोल १८.५ एस.सी. ३ ते ४ मि.लि. किंवा स्पीनोसॅड ४५ एस.सी. ४ ग़ॅम फवारावे.  शेंग माशी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास डायमेथोएट ३० ई.सी. १० मि.लि. पिठ्या ढेकुण, मावा, तुडतुडे, फुलकिडे प्रादुर्भाव दिसल्यास डायमेथोएट ३० ई.सी. १० मि.लि.

                    

लेखक

खुशाल जवंजाळ

वरीष्ठ संशोधन सहकारी

डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला.

मो. ८५३०८८७६९६

गजानन चोपडे

एम. एस्सी. किटकशास्त्र

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters