भारत एक कृषिप्रधान देश आहे आणि या देशाचा बळीराजा कृषी भूषण आहे. अलीकडे देशातील कृषी भूषण अर्थात शेतकरी राजा आधुनिकतेची कास धरत आहे, आता शेतकरी बांधव पारंपारिक पीक पद्धतीला बगल दाखवत नगदी पिकांची लागवड करण्याकडे विशेष आकृष्ट झाल्याचे बघायला मिळत आहे. पारंपारिक पीक पद्धतीत उत्पादन खर्च आणि उत्पन्न यामध्ये सांगड बसत नसल्याने आणि वर्षानुवर्षे बळीराजा कर्जाच्या डोंगराखाली दबत असल्याने शेतकरी राजाने आता पीक पद्धतीत बदल करण्याचे महत्त्व ओळखले आहे. शेतकरी राजा आता मागणी मध्ये असलेल्या नगदी पिकांची लागवड करण्यास अधिक पसंती दर्शवितात. औषधी वनस्पतींची देशात नव्हे-नव्हे तर संपूर्ण जगात मोठी मागणी आहे.
अनेक औषधी वनस्पती औषध निर्मितीसाठी वापरली जातात तसेच याचा कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशाच औषधी वनस्पती पैकी एक आहे पुदिना अर्थात मेंथा, या वनस्पतीस इंग्रजीमध्ये पिपरमेंट असे म्हणून संबोधले जाते. शेतकरी बांधव या पिकाची लागवड अतिशय अत्यल्प खर्चात करू शकतात तसेच कमी खर्चात या पिकातून शेतकरी बांधव चांगले दर्जेदार उत्पादन आणि उत्पन्न पदरात घेऊ शकतात. पुदिना एक औषधी वनस्पती व नगदी पीक म्हणून ओळखले जाते. नगदी पीक अर्थातच बाजारात मागणी असलेले पीक, या नगदी पिकाची लागवड करून शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई अर्जित करू शकतात.
पुदिना शेतीसाठी आवश्यक हवामान आणि शेतजमीन
पुदिना लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते मात्र यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या तसेच वैज्ञानिकांचा सल्ला देखील एक महत्त्वाचा रोल प्ले करू शकतो. याची लागवड अनुकूल हवामानात केली तरच यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त होऊ शकते. या पिकाची लागवड जानेवारी महिन्यापासून सुरू केली जाऊ शकते तसेच फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत या पिकाची लागवड केली जाऊ शकते. या कालावधीत या पिकाची लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त होत असल्याचा दावा वैज्ञानिक करत असतात. या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी याची लागवड नेहमी सुपीक चिकन माती असलेल्या जमिनीत करण्याचा सल्ला दिला जात असतो. मित्रांनो याची लागवड करण्याआधी जमिनीची व्यवस्थित पूर्व मशागत करणे अत्यावश्यक आहे, यासाठी आपणास सर्वप्रथम जमीन व्यवस्थित नांगरावी लागेल त्यानंतर जमिनीवर फळी मारून जमीन समतल करणे आवश्यक असणार आहे.
एवढी पूर्वमशागत झाल्यानंतर शेतजमिनीत चांगल्या क्वालिटीचे जुने कुजलेले शेणखत टाकण्याचा सल्ला वैज्ञानिकांद्वारे दिला जातो. पुदिना लागवड केल्यानंतर ताबडतोब पाणी भरण्याची शिफारस केली जाते. याची लागवड पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत केल्यास त्यापासून चांगले उत्पादन मिळते. ज्या भागात हिवाळ्यात दंव किंवा हिमवर्षाव अर्थात बर्फ पडतो, अशा प्रदेशात मेंथा किंवा पेपरमिंटची अर्थात पुदिना लागवड करता येत नाही. दंव किंवा हिमवृष्टीमुळे याच्या झाडांची वाढ खुंटते, तर दुसरीकडे यामुळे पुदिना तेलाचे प्रमाणही कमी होते. पुदिना लागवड डोंगराळ भागात मार्च ते एप्रिल या महिन्यात करण्याचा सल्ला दिला जातो. पुदिना लागवडीत ओळीपासून ओळीचे अंतर 60 सेमी आणि रोप ते रोप अंतर 45 सेमी ठेवावे.
पुदिना शेती मधील उत्पन्नाचे गणित
शेतकरी मित्रांनो जर आपण एक बिघा जमिनीत पेपरमिंटची अर्थात पुदिनाची लागवड केली तर आपणांस यापासून सुमारे 20 ते 25 लिटर पुदिना तेल मिळू शकते. बाजारात याच्या तेलाची किंमत 1000 ते 1600 रुपये प्रति लिटर एवढी असते. तसेच पेपरमिंट ऑइलच्या उत्पादनासाठी प्रतिलिटर 500 रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा चांगला फायदेशीर व्यवहार आहे.
Share your comments