
pearl farming
जर तुमच्या डोक्यात एखादा नवीन व्यवसाय करायची कल्पना असेल किंवा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय करण्याच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे पर्ल फार्मिंग. हा व्यवसाय 25 ते 30 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करू शकता.
विशेष म्हणजे या उद्योगासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान देण्यात. या लेखामध्ये आपण पर्लफार्मिंग विषयी जाणून घेणार आहोत.
पर्ल फार्मिंग साठी लागणारे आवश्यक गोष्टी?
पर्ल फार्मिंग साठी एक तलाव,सिंपले आणि प्रशिक्षण या तीन गोष्टींचा प्रामुख्याने आवश्यकता असते. जर तुम्हाला शक्य असेल तर स्वतःच्या खर्चातून खोदकाम करून तलावाची उभारणी करता येते किंवा सरकारकडून यासाठी 50 टक्के अनुदानाचा लाभ घेऊ शकता.
यासाठी लागणारे शिंपले देशातील अनेक राज्यांमध्ये उपलब्ध आहेत.मात्र दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगा येथील शिंपल्यांचा दर्जा चांगला असतो. भारतात अनेक संस्था या उद्योगाबाबत प्रशिक्षण देतात जसे की मध्य प्रदेशातील होशंगाबाद आणि मुंबई येथून तुम्ही पर्ल फार्मिंग बद्दल ट्रेनिंग देऊ शकता.
पर्ल फार्मिंग कशी करायची?
सिम्पल यांना योग्य वातावरण निर्मिती करता यावी यासाठी सर्वप्रथम शिंपल्यांना एका जाळ्यात बांधून दहा ते पंधरा दिवसांसाठी तलावात सोडले जाते. त्यानंतर हे सिंपले बाहेर काढून त्यावर शस्त्रक्रिया केली जाते. म्हणजेच शिंपल्यांच्या आतील भागात काही कण किंवा साचा टाकला जातो. या साच्यावर कोटिंग केल्यानंतर शिंपल्यावर आवरण तयार केले जाते. त्यातूनच पुढे मोती तयार होतात.
किती खर्च येतो?
या पद्धतीने शिंपला तयार करण्यासाठी 25 ते 35 हजार रुपये खर्च येतो.एक शिंपला पूर्ण तयार झाल्यानंतर त्यातून एक किंवा दोन मोती मिळतात.हा मोती किमान 120 रुपयांपर्यंत विक्री होते. जर मोत्यांचा दर्जा अधिक चांगला असेल तर दोनशे रुपये अधिक दर मिळू शकतो. एक एकर क्षेत्रातील तलावात 25000 शिंपले सोडले तर त्यावर किमान आठ लाख रुपये खर्च होतात. या मधुन वर्षाला अगदी सहजपणे तीस लाख रुपयांची कमाई तुम्ही करू शकता.
Share your comments