राज्यात फळबाग लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते, आणि शेतकरी यातून चांगली मोठी कमाई देखील करतात. पण अनेकदा फळ पिकामध्ये तापमानात चढ-उतार व खतांची कमतरता यामुळे उत्पादनात घट घडून येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते व त्यांचे उत्पन्नच कमी होते. राज्यात पपईच्या बागा देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. या पपई च्या बागांवर बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम बघायला मिळतो. रात्रीच्या तापमानात झालेली घट, जास्त आद्रतेचे प्रमाण तसेच अधिक नायट्रोजनचे प्रमाण यामुळे पपई फळबागांना मोठा फटका बसतो. यामुळे मुख्यता पपईच्या फळांचा आकार हा बदललेला बघायला मिळतो.
त्यामुळे उत्पादनात घट घडवून येते शिवाय अशा पपईला चांगला बाजारभाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे घटत जाते. पपई पिकावर येणाऱ्या या खतरनाक आजारावर कृषी वैज्ञानिकांनी काही उपाययोजना सांगितळ्या आहेत त्या आपण जाणून घेऊया, हा रोग पपई पिकावर येऊ नये म्हणुन सर्व्यात आधी त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या ठरतात, म्हणुन पपईची बियाणे हे या रोगाने ग्रस्त फळांपासून घेतलेले नसावे.

पपई फळाचा आकार बिघडण्याचे लक्षण
बोरॉनच्या कमतरतेचे मुळे प्रभावित फळांमध्ये बिया तयार होत नाहीत किंवा कमी प्रमाणात तयार होतात.
तसेच यामुळे झाडांची वाढ खुंटते, त्यामुळे या झाडाचा पूर्ण विकास होत नाही.
तसेच पपईच्या कच्च्या फळांच्या सालीवर दुधासारखा पदार्थ स्त्रावतो.
फळ पूर्णता कडक बनते, आणि अशी फळे लवकर पिकत नाहीत शिवाय पूर्णतः बेचव लागतात.
फळांचा आकार पूर्ण बुडून जातो.
फुलोरा अवस्थेत असताना पपई पिकावरून फुलगळ होते.
नियंत्रण
अशा स्थितीत पपई लागवडीत सेंद्रिय खतांचा मुबलक वापर करावा. तसेच मातीचे परीक्षण जरूर करा यामुळे जमिनीतील कमतरता असलेल्या पोषक घटकंची माहिती मिळते. तसेच बोरॉनची कमतरता असल्यास सल्ल्यानुसार बोरॉनचे प्रमाण जमिनीत मिसळा.
Share your comments