1. कृषीपीडिया

धानाचे प्रकार: नव्या वाणांच्या लागवडीने होणार उत्पादनात भर

देशातील प्रत्येक भागात मॉन्सून पोहचला आहे, पण तीन - चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून सर्व भागात पोहोचला आहे. जोरदार पाऊस होत असल्याने भात लागवडीच्या कामाने जोर पकडला आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशातील प्रत्येक भागात मॉन्सून पोहचला आहे, पण तीन - चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून सर्व भागात पोहोचला आहे.  जोरदार पाऊस होत असल्याने भात लागवडीच्या कामाने जोर पकडला आहे.  दरम्यान पौष्टिक तत्त्व असलेले धान्यांची लागवड केली गेली पाहिजे यासाठी कृषी शास्त्रज्ञ आग्रही आहेत.  त्यावर काम करत असून शेतकऱ्यांना पौष्टिक आणि गुणवत्ता असलेले बियाणे देत आहेत. सध्या शेतकऱ्यांचा ओढा हा उत्पन्न वाढ आणि गुणवत्ता असल्या धान्याकडे आहे. याच मागणीचा कल लक्षात घेत भारतीय तांदूळ  संशोधन केंद्राने भाताच्या काही नव्या वाण विकसित केल्या आहेत. ज्यात पोषक तत्वे अधिक आहेत.

या वाणांची या बियाणांची विशेषता ही आहे की, हे कुपोषणांच्या समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरणार आहेत. आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, आसाम, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उडिसा आणि पंजाब आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात देखील भाताची शेती केली जाते. अशात ही नवी बियाणे किंवा वाणाची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.  कृषी शास्त्रज्ञांच्या मते, शरिरात जिंक आणि आर्यनचे प्रमाण अधिक असणे आवश्यक असते. जगातील अनेक लोकांच्या शरिरात या दोन जीवनसत्त्वाची कमी मोठ्या प्रमाणात आढळते. आपल्या देशातील ३० टक्के लोकांच्या शरिरात जिंक हे जीवनसत्त्व नाही आहे. परंतु भाताच्या या प्रकरामुळे शरिरातील जिंकचे प्रमाण ५८ टक्क्यापर्यंत मिळेल. शरिरासाठी जिंक हे फार महत्त्वाचे खनिज आहे. आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी हे फार गरजेचे असते.  गर्भवती महिलांसाठी याची गरज फार असते. आपल्या शरिरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. 

धानचे नवे सहा वाण झाले विकसित

हैदराबाद मधील भारतीय  तांदूळ संशोधन केंद्राद्वारे भाताचे नवीन वाण विकसित करण्यात आले आहे. यात डीआरआर धान ४५, डीआरआर धान ४९, यांचा समावेश आहे. रायपूर, छत्तीसगडमध्ये स्थित इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालयद्वारे जिंक ओ राईस आणि सीजीडेआरचे वाण विकसित करण्यात आले आहेत. या  नवीन धानाचे वैशिष्ट्ये हे आहे, की  या वाणाचे तांदूळ खाल्ल्याने शरिरात जिंकची पुर्तता होते. कृषी शास्त्रज्ञच्या मते, देशाच्या सर्वच भागात भात खाल्ला जातो. अशात केंद्राद्वारे अशी नवीन वाणे विकसित करण्यात आली आहे, ज्या शरिरातील जिंकचे कमी असलेले प्रमाण वाढवतील. इतर तांदूळाच्या तुलनेत या नव्या वाणमध्ये जिंकचे प्रमाण २५ पीपीएम आहे. तर दुसऱ्या तांदूळात २ पीपीएम असते. आत्ताच या नव्या वाण विकसित करण्यात आले आहे. याच्यात जिंक अधिक आहे. जर शेतकऱ्यांनी याची लागवड केली तर पिकांचे उत्पन्न अधिक होईल. यासह बाजारातही दर चांगला मिळेल.

English Summary: Paddy Varieties ; production will increased after sowing new varieties Published on: 04 July 2020, 02:09 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters