जाणून घ्या काय आहे एरॉबिक पद्धत आणि ह्या पद्धतीने भातशेती कशी करायची
भारताच्या शेतीमध्ये खरीप पिकात भातशेतीचे अनन्यसाधारण महत्व आहे.परंतु भातशेतीसाठी सर्व्यात जास्त पाण्याची आवश्यकता असते. म्हणूनच अनेक राज्यातील शेतकऱ्यासाठी आता भातशेती अवघड बनली आहे.पाण्याच्या अंदाधुंद वापरामुळे आज भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. हे पाहता अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना आता भात लागवडीऐवजी कमी पाण्याची पिके पेरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हे खरे आहे की, पृथ्वीवरील पाणी कमी होत आहे, ज्याचे मूळ कारण म्हणजे दरवर्षी पाऊस कमी होत आहे. त्याचबरोबर आपली पाण्याची नासाडी करण्याची प्रवृत्तीदेखील याला जबाबदार आहे.तथापि, आम्ही भात लागवडीबद्दल बोलत आहोत.
भात लागवडीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते, परंतु जर काही गोष्टींची काळजी घेतली गेली तर कमी पाण्यातही भात लागवड करणे सोपे आहे. त्यासाठी आज आपण भात लागवड करण्याच्या एरॉबिक पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत तसेच, या पद्धतीने पाण्याची बचत कशी होते आणि चांगले उत्पादन कसे मिळेल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत.
भात शेती : एरॉबिक पद्धत काय आहे?
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि फिलीपिन्सस्थित आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (आयआरआरआय) यांनी संयुक्तपणे भात वायू तंत्र विकसित केले आहे, जे कमी पाण्यात पिकवता येते. कटक येथील केंद्रीय भात संशोधन संस्था (सीआरआरआय) चा देखील या प्रकल्पात सहभाग आहे. भात लागवडीच्या एरोबिक पद्धतीत शेतात पाणी भरण्याची किंवा रोपांच्या लागवडीची गरज नाही आहे. या पद्धतीने पेरणीसाठी बियाणे सलग पेरली जातात. या पद्धतीने पेरणीसाठी शेताची तयारीही करावी लागत नाही आणि लागवडही करावी लागणार नाही. यामध्ये इतर पद्धतींच्या तुलनेत 40 ते 50 टक्के पाणी वाचवले जाते. कारण दुसर्या पद्धतीत प्रथम रोपवाटिकेत अधिक पाणी वापरले जाते, त्यानंतर जेव्हा
रोपवाटिका तयार होईल व रोप लागवड करताना पाणी द्यावे लागते, तर या पद्धतीत कमी पाण्याचा वापर केला जातो.
एरॉबिक पद्धतीने भात शेती करण्याची पद्धत
भातशेतीच्या एरोबिक पद्धतीत, गहू किंवा मका सारखीच पेरणी केली जाते. यामध्ये सहसा भाताची (तांदळाची)थेट पेरणी केली जाते. सर्वप्रथम, 2 किंवा 3 वेळा नागरणी करून नंतर शेत समतल करून माती भुसभूशीत केली जाते. त्यानंतर शेतात जर हलकी आर्द्रता असली, तर या पद्धतीत सीडड्रिल-फर्टीड्रिलच्या माध्यमातून 2-3 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी केली जाते जर काळी माती असेल तर पेरणी 1-2 सें.मी. खोलईपर्यंत केली जाते. एका बिदपासून दुसर्या बिदचे अंतर 22 ते 25 सें.मी. अंतर ठेवले जाते.
भाताच्या "बी" चे प्रमाण व बिजोपचार
मे महिन्यात पेरणी केल्यास एकरी १२ किलो बियाणे वापरावे आणि जर जून-जुलैमध्ये केले तर बीज १० किलोपेक्षा कमी वापरावे. जास्तीचे बियाणे पेरल्यामुळे झाडे कमकुवत होतात. पेरणीपूर्वी बियाण्यांचा उपचार केला पाहिजे. प्रथम बियाण्यावर बुरशीनाशकाचा उपचार केला पाहिजे आणि नंतर सेंद्रिय पद्धतीने उपचार केला पाहिजे, उपचारित बियाणे पेरणीसाठी त्वरित वापरावे.
एरॉबिक पद्धतीने शेती करताना शेकर्ऱ्यांनी काळजी घेण्याच्या बाबी / भात शेतीची संपूर्ण माहिती
एरोबिक शेती करणार्या शेतकर्यांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कृषी शास्त्रज्ञांच्या मते, या पद्धतीने भात शेती करताना ज्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या त्या खालीलप्रमाणे आहेतः
1.या पद्धतीने पेरणीसाठी दुष्काळ सहन करतील अशा वाणांची/ जातींची निवड करावी.
2.उन्हाळी गहूच्या कापणीच्या हंगामानंतर लगेचच नागरणी करून घ्यावी व भात पेरणी करावी. आपण भात लागवड करीत असल्यास येथे पाऊस कसा पडतो याकडेही लक्ष द्या.
3.जर सलग 15 दिवस पाऊस पडला नाही तर पिकाला पाणी भरून द्यावे, जसे आपण गव्हाला पाणी देतो त्याच प्रकारे पाणी द्यावे.
4.पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी आपण ज्या प्रकारे गव्हाच्या शेतात बंधारे बनवितो आणि त्यास छोट्या छोट्या छोट्या भागामध्ये विभागतो, त्याचप्रमाणे भात शेतातही लहान बंधारे बनवून वेगवेगळ्या भागात विभागुन द्यावेत. यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी शेतातच राहते.
5
.भाताबरोबर अनावश्यक वनस्पती वाढतात, त्यांना तण म्हणतात. ते नष्ट करण्यासाठी, तणनाशकाची फवारणी करताना हे लक्षात घ्यावे की शेतात पुरेसा ओलावा आहे.
6.तणनियंत्रणासाठी पेंडामेथिलीनचा 200 लिटर पाण्यासाठी 1.25लिटर प्रति एकर पेरणीनंतर ताबडतोब किंवा १-२० दिवसानंतर फवारणी करावी. बेस्पीरीबॅक सोडियम 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली ह्या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
7.जर तुम्ही भातबरोबर उडीद किंवा मूग पेरले तर तण वाढत नाही.
8.या पद्धतीने पेरणीसाठी नेहमी सुधारित वाणांची निवड करा. जर उंचीवर एखादे शेत असेल तर लवकर पिकण्याच्या वाणांची निवड करा, आणि शेती जर खोलीत असेल व शेतात पावसाचे पाणी गोळा होत असेल तर तेथे मध्यम वाण निवडा.
9.भात पेरताना सीडड्रिल किंवा झीरो टीलेज मशीनद्वारे पेरणीचा प्रयत्न केला पाहिजे कारण ते एका ओळीत पेरले जाते, ज्यामुळे तन काढायला सोपे होते. परंतु अशी सुविधा नसल्यास पेरणी शिंपडण्याच्या पद्धतीने करता येते.
10.जशी आपण गहूला गरजेनुसार पाणी देतो त्याच पद्धतीने आपण भातलाही पाणी देणे चालू ठेवले पाहिजे, जर शेतकरी बांधवांनकडे स्प्रिंकलरची उपलब्धता असेल तर पाणी स्प्रिंकलरद्वारे द्यावे जेणेकरून जास्त उत्पादन मिळेल.
11.एरोबिक पद्धतीने भात पिकाची शेती केल्यास 115 ते 120 दिवसात पीक काढणीला येऊ शकते.
Share your comments