आतापर्यंत कधी ज्वारी व बाजरी पिकावर कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव झाला नाही मात्र यंदा वातावरणाच्या बदलामुळे किडींनी पिकांना सुद्धा सोडलेले नाही. मराठवाडा विभागात तसेच खानदेशातील मका पिकावर सुद्धा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी सुद्धा केली होती मात्र पुन्हा १५ दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव दोन महिने वाढलेल्या पिकांवर झालेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांवर नामुष्की ओढवलेली आहे. पुन्हा अळीचा प्रादुर्भाव झाल्याने आता उत्पादनावरील खर्च वाढलेला आहे.
लष्करी अळीचा असा करा बंदोबस्त :-
मक्याचे पीक जोमात असतानाच त्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला जे की या अळीने मका पिकाची पाने कुरतडली आहे त्यामुळे त्याची वाढ ही रोखली आहे. मका उत्पादक शेतकरी मक्याच्या पोंग्यामध्ये कीटकनाशकाचे द्रावण टाकतात तसेच काही शेतकरी त्यामध्ये वाळू सुद्धा टाकत असतात यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. वाढत्या किडीमुळे भविष्यात सुद्धा उत्पादनावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी ५ - ६ कामगंध सापळे लावून या किडीचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
जनावरांच्या चाऱ्यााचाही प्रश्न :-
मका लागवड केल्यामुळे फक्त त्यामधून उत्पादन च नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागतो. उन्हाळ्यात मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतो. परंतु यंदा निसर्गाच्या अनियमितपणामुळे मका पिकाची लागवड केल्यापासून ते पूर्ण जोपासना करण्यापर्यंत शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागतो. शेतकऱ्यांना एकरी ३०० ते ४०० रुपये खर्च आला आहे. जे की १५ दिवसांनी किडीचा प्रादुर्भाव वाढतच असतो आणि याचा परिणाम भविष्यात उत्पादन वाढीवर होणार आहे अशी चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे.
किडीच्या प्रादुर्भावात वाढ :-
यंदा वातावरणाच्या बदलामुळे मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे जे की या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी सुद्धा केली मात्र पुन्हा १५ दिवसांनी पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका पिकाच्या पाने कुरतडली आहेत त्यामुळे पिकाची वाढ होत नाही.
Share your comments