1. अग्निअस्त्र
एका मोठय़ा भांडय़ात देशी गायीचं वीस लिटर मूत्र घ्यायचं. एक किलो तंबाखू, अर्धा किलो हिरवी मिरची, अर्धा किलो गावठी लसूण आणि पाच किलो कडुनिंबाची पानं वाटून त्याचा लगदा त्यात मिसळायचा. या सा:या मिश्रणाला पाच वेळा उकळी द्यायची. 24 तासानंतर हे सारं मिश्रण फडक्यानं गाळायचं. शंभर लिटर पाण्यात तीन ते पाच लिटर अग्निअस्त्र मिसळून त्याची पिकांवर फवारणी करायची.
2. ब्रम्हास्त्र
देशी गायीचं वीस लिटर मूत्र घ्यायचं. कडुनिंबाच्या पानांचा तीन किलो, सीताफळ-पपई-डाळिंब-पेरु (आणि मिळाल्यास घाणोरी व पांढरा धोतरा) यांच्या पानांचा प्रत्येकी दोनदोन किलो वाटलेला लगदा त्यात टाकायचा. या मिश्रणाला पाच वेळा उकळी द्यायची. फडक्यानं गाळून चोवीस तासानंतर त्याची झाडांवर फवारणी करता येते. त्याचं प्रमाण आहे शंभर लिटर पाण्यात तीन लिटर ब्रम्हास्त्र
3. निमास्त्र
शंभर लिटर पाण्यात देशी गायीचं पाच लिटर मूत्र टाकायचं, देशी गायीचं पाच किलो शेण, कडुनिंबाच्या पाच किलो पानांचा वाटलेला लगदा या मिश्रणात टाकायचा. 24 तास हे मिश्रण तसंच राहू द्यायचं. एखादी काठी घेऊन हे मिश्रण दिवसातून दोन वेळा चांगलं ढवळायचं आणि पिकांवर त्यांची फवारणी करायची.
महत्त्वाचे- ही सारीच अस्त्रं उत्कृष्ट कीटकनाशकं आहेत. परंतु यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अस्त्रं बनवण्यासाठी देशी गायीचंच शेण आणि मूत्र उपयोगी ठरू शकतं.
‘झिरो बजेट’ :
केवळ शेती नव्हे, तर जनआंदोलन!
शेतीचं तंत्र देणं हे शेतीचं शास्त्र झालं, पण त्यासोबतच नैसर्गिक जीवनशैली देणं हे जन आंदोलन आहे. विषमुक्त अन्न, प्रदूषणमुक्त हवा, पाणी देऊन माणसाला वाचवणं हे जनआंदोलन आहे. रस्त्यावर येऊन गाडय़ा जाळणं, दगडफेक करणं, मोर्चे, घेराव म्हणजे जनआंदोलन नाही. अहिंसक मार्गानं नवनिर्माणाची चळवळ म्हणजे जनआंदोलन. आम्ही तेच करीत आहोत. या मार्गानं लाखो शेतकरी एकमेकांशी जोडले जाताहेत. सातत्यानं चर्चा, बैठका आणि संवैधानिक मार्गाचा अवलंब हा जनआंदोलनाचाच भाग असतो. एखादी व्यवस्था आपण नाकारतो, तेव्हा तिला पर्याय देण्याची जबाबदारीही आपलीच असली पाहिजे.
झिरो बजेट नैसर्गिक शेतीची चळवळ केवळ उपदेश करीत नाही, प्रयोगसिद्ध पर्यायही देते. भारतात आजवर पाच लाख शेतक:यांनी आत्महत्त्या केल्या आहेत, पण ङिारो बजेट नैसर्गिक शेती करणा:या चाळीस लाख शेतक:यांपैकी (त्यातले लाखावर शेतकरी महाराष्ट्रात आणि तीस लाखांच्या वर शेतकरी दक्षिण भारतात आहेत) एकानंही आत्महत्त्या केल्याचं उदाहरण नाही.
नैसर्गिक शेतीची चतु:सूत्री
1. बीजामृत
देशी गाईचं शेण, गोमूत्र, चुना किंवा चुनखडीपासून बीजामृत तयार होतं. कीड, रोग नियंत्रणासाठी बीजामृताचा उपयोग होतो.
2. जिवामृत
गाईचं शेण, गोमूत्र आणि गुळाचा वापर करून जिवामृत तयार केलं जातं. पिकांच्या वाढीसाठी जिवामृत अत्यंत उपयुक्त ठरतं. जिवामृत हे खरं तर खत नसून विरजण आहे. त्यामुळे रासायनिक आणि सेंद्रिय खतांची पूर्णपणो छुट्टी करता येते. मात्र विदेशी किंवा जर्सी गायीचं शेण, गोमूत्र यासाठी अजिबात उपयुक्त नाही.
3. आच्छादन
आच्छादनाचे तीन प्रकार आहेत
मृदा आच्छादन- नांगरणीसारखी जमिनीची मशागत.
काष्ठा आच्छादन- शेतातल्या पिकांचे जे अवशेष जमिनीवर पडतात, त्याचं जमिनीवर पांघरुण.
सजीव आच्छादन- मुख्य पिकांमधली आंतरपिकं आणि मिश्र पिकं.
आच्छादनामुळे ओलावा जास्त काळ टिकून राहतो तसंच पाण्याची 9क् टक्के बचत होते. जमीन सुपीक होते.
4. वाफसा
जमिनीत पाणी आणि हवा यांचं मिश्रण 50-50 टक्के असायला हवं. पाणी केव्हा द्यायचं त्याचंही एक साधं, सोपं टेक्निक आहे.
शेतजमिनीतली माती हातात घेऊन मुठीनं दाबून त्याचा लाडू बनवायचा. आपल्या छातीइतक्या उंचीवरून तो खाली सोडायचा. लाडू जर पूर्णपणो फुटला तर जमिनीला पाण्याची गरज आहे. नाही फुटला तर जमिनीला पाणी देण्याला अजून अवकाश आहे असं समजायच.
Share your comments