1. कृषीपीडिया

जैविक शेती व लोकांची भावना

नमस्कार मी मिलिंद जी गोदे आज एक नवीन विषय मांडत आहे. जैविक हा शब्द काही आपल्यासाठी नवीन नाही.शेती मधून निघणार विषमुक्त उत्पादननाच जेवण सर्वांना चांगले वाटते पण जेव्हा जैविक शेती करताना नकारात्मक भूमिका असतात. मला हेच सांगायचे आहे की, सेंद्रिय शेती असो की जैविक शेती ही प्रमुख्याने 90 टक्के शेतकरी यांचं मन या शेतीकडे वळत नसतं!

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
organic farming

organic farming

नमस्कार मी मिलिंद जी गोदे  आज एक नवीन विषय मांडत आहे. जैविक हा शब्द काही आपल्यासाठी नवीन नाही.शेती मधून निघणार विषमुक्त उत्पादननाच जेवण सर्वांना चांगले वाटते पण जेव्हा जैविक शेती करताना नकारात्मक भूमिका असतात. मला हेच सांगायचे आहे की, सेंद्रिय शेती असो की जैविक शेती ही प्रमुख्याने 90 टक्के शेतकरी यांचं मन या शेतीकडे वळत नसतं!

शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याची इच्छा असते, परंतु असे शेतकरी विविध पिकांवरील रोग आणि कीड यांनी त्रस्त असतात आणि त्यामुळेच ते रासायनिक शेतीकडे वळतात. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सेंद्रिय शेतीमधील जैविक उपाय जाणून घेणे गरजेचे आहे. जैविक शेती बद्दल शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत आला. पहिली दोन ते तीन वर्षे उत्पादन कमी येते. पुन्हा ते वाढत जाते असा सल्ला देत होती. मात्र तेवढे थांबण्याची शेतकऱ्यांची मानसिकता नाही यामुळे शेतकरी पुन्हा रासायनिक शेतीकडे वळल्याचे वास्तव आहे. त्यासाठी शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची अस्मिता जागृत करणे व जैविक शेतीचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.

सेंद्रिय शेती निसर्ग व आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. आपण आजच्या उत्पादन फायद्यासाठी उद्याच भविष्य धोक्यात तर घालत नाही ना? आधुनिक तंत्रज्ञानाने उल्लेखनीय बदल झाले व त्याचबरोबर पर्यावरण आणि आरोग्याच्या दिशेनेही काही विपरीत परिणाम झाले. रासायनिक खतांचा व कीटकनाशक, बुरशीनाशक अशा कितीतरी रसायनांचा वारेमाप वापर झाला. परिणामी काय तर जमिनीचे प्रत आपल्या या कारणामुळे ढासळली. जमिनितील साठवलेले  सेंद्रिय कर्ब  नष्ट झाले व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तर अतिशय हानिकारक  परिणाम दिसून आले हे काही नवीन नाही. त्याचबरोबर शेतीतील जैवविविधता धोक्यात आली. त्यामुळे आज गरज निर्माण झाली आरोग्य पूरक, पर्यावरण पूरक शेती करण्याची म्हणजेच सेंद्रिय शेती किंवा जैविक शेतीच्या कडेवळण्याची. जेव्हा आपण सेंद्रिय शेती करीत असताना काही तत्वे जोपासली पाहिजे व मुख्य म्हणजे निसर्गाप्रती प्रेम व आवड असणे आवश्यक आहे. निसर्गाने आपल्याला हे सर्व दिलेले आहे म्हणून आपणही निसर्गाचं काही देणं लागतो.

 असे कंपोस्ट खत,शेणखत!

मित्रांनो सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट काय आहे. पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते. जसे मातीचा कस टिकविण्यास मदत होते. पारंपरिक शेती पद्धतीचा वापर केला जातो.जीवनमान उंचावण्यास मदत होते. कमी खर्चात खत तयार होत असल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. सेंद्रिय शेती करावयाची असल्याने पाळीव प्राण्यांनाही पाळावे लागते. शेतीतील उरलेला पालापाचोळा व आजूबाजूस उगवलेल्या वनस्पतींचा खत तयार करण्यासाठी वापर केला जातो. तेव्हा मित्रांनो जैविक शेतीचा अवलंब करा. घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करा. पण हे करण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे सेंद्रिय खत आपल्या शेतात उपयोगी राहिल हे माती परीक्षण करून जाणून घ्या ही काळाची गरज आहे.

 लेखक

 मिलिंद जि. गोदे

 युवा शेतकरी मित्र

English Summary: organic farming and life of farmer one important anylisis Published on: 27 January 2022, 05:43 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters