जमिनीत सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणात नसेल, त्यांच्या कामात अडथळा येतो आणि उत्पादनात घट येऊ शकते. अशा परिस्थितीत बाकी निविष्ठा जास्त वापरूनही फारसा फायदा होत नाही. हरितक्रांतीच्या सुरवातीला सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य पातळीवर होते तोवर उत्पादनात वाढ मिळाली. पुढे सेंद्रिय कर्बामध्ये घट होत गेल्याने उत्पादनातही घट होत गेली. उत्पादन पातळी एकदम न घटता हळूहळू कमी होत गेल्याने शेतकऱ्यांच्या ध्यानात येण्यासही वेळ लागतो. सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष असले तरी सुरवातीला निसर्गाने जमिनीत राखलेल्या सेंद्रिय कर्बाच्या पातळीवर किमान १५-२० वर्षे उत्पादन मिळत राहते. जिथे सिंचनाच्या सोयी झाल्या, अशा सर्व ठिकाणी या संदर्भाला दुजोरा मिळाला आहे.
हरितक्रांतीपूर्वी फक्त खरिपात देशी वाणाचे पीक घेतले जाई. सेंद्रिय कर्बाचा वापर मर्यादित होई. हरितक्रांती व बागायतीच्या सोयी झाल्याने वर्षातून दोन-तीन पिके, वार्षिक-बहुवार्षिक पिके घेणे, सुधारित बियाणे, रासायनिक खतांचा वापर वाढला.
उत्पादनही वाढले, परिणामी सेंद्रिय कर्बाचा वापर वाढला. एखादे पिकाच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या सेंद्रिय कर्बाइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक जमिनीत परत दिला गेला असता तरच जमिनीची उत्पादकता टिकून राहिली असती. मात्र, उत्पादन वाढत गेले, तसतसे सेंद्रिय कर्बाचा वापर घटत गेला. सेंद्रिय कर्बाची पातळी एका ठराविक मर्यादेच्या खाली गेल्यानंतर उत्पादन घटत असल्याची जाणीव होऊ लागली.
जिवंत माती
१ ग्रॅम जिवंत मातीत, कोट्यावधी जीवाणू असतात, हे सर्व जिवजंतू जन्म मृत्युच्या अनंतचक्रात अव्याहतपणे फिरत असतात.जिवंत जमिनीत ह्या चक्रांची संख्या अनेक पटिने वाढते,अशी जमीन वनस्पती जीवनाला पोसण्यास संपूर्णतः सक्षम असते.भगवंताने लाखो वर्षांपर्यंत अविरत परिश्रमांती हि जीवंत माती तयार केली मात्र मनुष्याने रसायने वापरून तिची धूळदान चालवली आहे, शेती निसर्गाची आहे, हेच मुळी मानवाच्या लक्षात नाही.
' जमिनीवरून चालतांना पायांना जर एखादया जाड गादिवरून चालण्याचा अनुभव मिळाला, तर ती आपली काळी आई / जिवंत माती आहे, असे समजावे.
' खरी आईची कूस जपायची वेळ आली आहे,, नाहीतर कूसही नाही आणि ऊबही नाही मिळणार.
निसर्ग अजूनही वेळ देत आहे, सावरण्यातच शहाणपण आहे. !थकलेल्या आपल्या लेकराने अंग टाकल्यानंतर त्याच्या शरीरातील ताणतणाव जी शोषून घेते, अशा चुंबकिय शक्तिने ओतप्रोत व मानवी शरीराला मातीने ( मायेचा हात ) व्याधीमुक्त करणाऱ्या मातीस जिवंत म्हणजे जीवजिवाणूंनी संपृक्त माती संबोधतात.. !
नैसर्गिक जंगलातील जमिनीत २ ते ५ टन / हेक्टर कीटक असतात, ६.५ टन / हे. गांडूळे असतात व ०.५ टन / हेक्टर सूक्ष्म जीवाणू असतात.जमिनीत हे जीवजीवाणू ३ प्रकाराने आपले वास्तव्य करतात.
चांगल्या जमिनीत मातीच्या कणांची सुव्यवस्थित रचना तयार झालेली असते.. मातीच्या २ कणांभोवती पोकळी असते, प्रत्येक कणांभोवती पाण्याच्या रेणूंनी तयार केलेले १ पातळ जलवलय असते, ज्यातून केशमुळ्या अन्न, पाणी स्विकारतात, तसेच जमिनीत प्राण्यांनी तयार केलेली बिळे असतात.
सूक्ष्म जीवाणूंपैकी जे जलजीवन जगतात ( अल्प प्रमाण ) ते या कणाभोवतीच्या जलवलयात राहतात,, इतर जीवाणू ( जे हवेचा आधार घेतात ) २ मातीकणांच्या पोकळयांतील हवेत राहतात आणि ठळक जंतू, किडे, गांडूळासारखे प्राणी बिळे करुन राहतात !
जिवजंतूंचे जमिनीतील अस्तित्व त्या जमिनीत असणारे जिवामृताचे ( ह्युमस), सेंद्रिय पदार्थांचे ओलावा व उष्णतेचे प्रमाण किती आहे, ह्यावर अवलंबून असते.. जमिनीतील जैवभार जेवढा जास्त असेल तेवढी त्याची वाढ मंद राहिल व हि वाढ त्या जमिनीतील असलेल्या सेंद्रिय पदार्थांपेक्षा ( पिकाचे मूळ व काड ) जमिनीतील असलेल्या जीवामृताच्या (हयुमसच्या ) उलाढालीवर अवलंबून असते !
जिवजंतू आपले अन्न मंदपणे उत्पादन करतात व आक्रमणकारी रोगाणूंचे आक्रमणाला प्रतिबंध करतात. पिकांच्या कापणीवेळी त्यांच्या मुळापासून अन्नपुरवठा वेगाने स्त्रवित होण्याचा काही निश्चित कालमान असतो आणि पिकांच्या वाढकाळात हि अन्नद्रव्ये पिकांच्या मूळांतून स्त्रवित झालेली असतात.. पिकांच्या मूळ्यांतून जमिनीत साखर किंवा अन्नमिश्रण मुक्त होण्याच्या प्रक्रियेत झाडांची ३०% ऊर्जा नष्ट होते, तरीही जमिनीतील जीवसृष्टी ते अन्न मिळवतात.. तथापि हि जीवसृष्टी अपुऱ्या अन्नपुरवठयावरही आपले अस्तित्व दाखविते !
विशेष भरपूर आहे मात्र आपण आपली आई विषमुक्त करून कशी जिवंत ठेवायची,, हेच आचरणात आणण्याची आवश्यकता आहे अन्यथा निसर्गसंहार आपण बघतच आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही.
सेंद्रिय आनि जैविक खतांचा वापर वाढवा तुमचे उत्पन्न आपोआप वाढेल.
Share your comments