आपण रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर करून नत्र,स्फुरद, पालाश, तसेंच इतर मूलद्रव्ये पिकास उपलब्ध करून देतो,पण कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये पिकास नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. कार्बन हा प्रकाश संश्लेशन प्रकियेत महत्वाची व मुख्य भूमिका बजावतो. याप्रकारे कार्बन वनस्पतीमध्ये चयापचय चांगल्या रीतीने होते.
वनस्पतीचे जीवनमान पूर्ण झाले नंतर अवशेष विघटित होण्यास सुरवात होतात.जसे की पालापाचोळा,छोट्या मोठ्या फांद्या मातीमध्ये कुजायला चालू होतात,त्यामुळे झाडाच्या अवशेषामध्ये असलेला कार्बन मातीमध्ये मिसळायला चालू होतो आणि तोच कार्बन सेंद्रिय कर्ब म्हणून ओळखला जातो. तसेच फक्त झाडाचे अवशेष कुजल्यामुळे सेंद्रिय कर्ब मातीमध्ये समाविष्ट होतो असे नाही,मृत प्राणी,मल यांच्यामुळे सुद्धा माती मध्ये सेंद्रिय कर्बाचे वाढते,कारण कार्बन हा प्रत्येक जीवाच्या घडणावळीतील महत्वाचा घटक आहे.
सेंद्रिय कर्ब तयार होण्याची प्रक्रिया काही एका दिवसात होत नाही,त्यासाठी बराच कालावधी लागतो.
बहुपयोग:-
सेंद्रिय कर्ब मातीची सुपीकता वाढवतो.
पाणीधारण क्षमता वाढते,
मातीमधील बहुपयोगी जीवाणूंची संख्या वाढते.
मुळास प्राणवायूची उपलब्धता वाढवते.
चांगल्या कुजलेल्या जैविक खतामधून वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व मूलद्रव्ये त्यांना सहज उपलब्ध होतात आणि यामध्ये कर्बाचे प्रमाण जवळपास ६० टक्के असते.
कार्बामध्ये साधारणता ६५% ह्युमस (Humas) म्हणजे जुन्या सेंद्रिय कर्बा मध्ये रुपांतरीत झालेला भाग असतो , तर तितकेच महत्वाचे म्हणजे १० % पर्यंत जिवंत जीवाणू असतात. असे हि म्हणता येईल कि सेंद्रिय कार्बा मुळेच मातीचा कस वाढून जिवंत पण येतो.
सेद्रिय कर्बाचे चे मातितील प्रमाण – अगदी ढोबळमानाने विचार केल्यास मातीमध्ये २५% हवा , २५ % पाणी , ४५ % खनिजे आणि ५% सेद्रिय कर्ब असल्यास अशी माती शेतीसाठी सर्वात चांगली मानता येईल.
सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उपाय:-
1हिरवळीच्या खतांचा वापर
2शेणखताचा वापर
3रोगमुक्त पिकाचे अवशेष शेतामध्येच कुजवणे
सेंद्रिय कर्ब जमिनीतून कमी होण्याची कारणे:-
अवाजवी रासायनिक खतांचा वापर
तसेच तणनाशकांचा जमिनीवर होणारा मारा
जोराच्या पावसाने जमिनीची होणारी धूप.
पाण्याचे अत्यल्प प्रमाण
या गोष्टी सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेची कारणे ठरू शकतात.
-Team IPM School
Share your comments