1. कृषीपीडिया

संत्रा/मोसंबीतील 'आंबिया बहार' केंव्हा, कधी व कसा घ्याल?

निसर्गतः संत्रा/मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी थंडी संपतेवेळी (जानेवारी-फेब्रुवारी) म्हणजे आंब्याला ज्या वेळी बहार येतो तो "आंबिया बहार'.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
संत्रा/मोसंबीतील 'आंबिया बहार' केंव्हा, कधी व कसा घ्याल?

संत्रा/मोसंबीतील 'आंबिया बहार' केंव्हा, कधी व कसा घ्याल?

. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहित आहेच. परंतू अज्ञान व स्वाभाविक परिस्थितीत पुढिल हंगामात चांगला भाव मिळावा करीता चुकीच्या पद्धतीत ताण सोडल्यावर झाडांचे ऋतूचक्र बिघडवले जाते. त्यामुळेच झाडातील बहार धरण्याच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे अडथळे निर्माण झाल्याची लक्षणे.
 झाड नवती देवून शांत होतात.
 बहारात समसमानता (युनिफॉर्मीटी) न रहाता, बगीच्या विकतांना (चुरा) उत्पादनाची गुणवत्ता ढासळते व भाव कमी मिळतात.
 बहारात मागे पुढे झाल्यामुळे पहिल्या बहारातील फळे टिकतात आणि त्यानंतरच्या बहाराची फळे शेवटपर्यंत फळगळ दाखवीतच रहातात. 
(स्वस्त व परिणामकारक हाड-मासाचे खत(बोनमील)', मासोळी खत (फिशमील), 'जिप्सम पावडर', 'फळमाशीचे ल्युर व ट्रॅप', 'मासोळी, निम, करंज, पॅराफीन तेल' व 'तेल -विघटक' शेतकर्यांचे मागनी वरून 'निसर्ग फाऊंडेशन' द्वारा अमरावती जिल्हांतर्गत दिल्या जातात.)

बहार केंव्हा घ्याल 

या प्रश्नाचे उत्तर मिळविण्या करीता, झाड कोणत्या वातावरणात सर्वाधिक जास्त अन्नद्रव्य उचलते? यावर विचार करावा लागेल. 
सर्वसाधारणपणे असे दिसून आले आहे की २३°-३६° डिग्री सेल्सिअस तापमानात झाडे सर्वाधिक जास्त अन्नद्रव्ये स्वतःकडे घेतात.
तापमान १५° डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी व्हायला लागते तसे वनस्पतीची अन्नद्रव्य उचलण्याची क्षमता कमी होऊ लागते. (याउलट तापमान ४०° डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यास पुन्हा एकदा झाडांची अन्न उचलण्याची क्षमता कमी होऊ लागते.) 
म्हणूनच १५°सेल्सिअस पेक्षा तापमान कमी झाल्यास आपण संत्रा/मोसंबी बगीच्यात विश्रांती देतो. कारण सर्वसाधारणपणे १५°सेल्सिअस पेक्षा कमी तापमान झाल्यास वनस्पतीचा अन्न उचलण्याचा रेशो खूप कमी झालेला असतो अशा वेळेस झाडे तानाखाली येतात, फळ व फुल धारणा करण्यात झाडांचे लक्षच नसते. फळाची फुगवण होत नाही दिलेले खत वाया जाण्याची शक्यता असते, कमी तापमानात झाडांच्या नवीन फुटी थांबतात व शेंडा वाढत नाही. म्हणूनच 'अंबीया बहार' १५° सेल्सिअस किंवा त्यापेक्षा तापमानवाढ असल्यासच बहार प्रक्रियेतील ओलीत कराल अन्यथा नकोच.

संत्रा/मोसंबीचा "आंबिया बहार" कधी घ्याल.

संत्रा/ मोसंबीची झाडे निसर्गतः थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी-जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेत असतात. साधारणतः या काळात वातावरण पोषक नसते. झाडांवर नवीन वाढ होत नाही. त्यामुळेच या विश्रांतीच्या काळात अतिरिक्त शर्करेचा संचय झाडाच्या लहान फांद्यांमध्ये होतो. हवामान अनुकूल (१५° सेल्सिअस चे वर) झाल्यावर त्या शर्करेचा उपयोग झाडावर फुले येण्यास होतो. असा काळ आपल्या भागात 'डिसेंबरचा दुसरा आठवडा' ते 'जानेवारीचा दुसरा आठवडा' या एका महिन्याच्या कालावधीत होतो म्हणूनच हा काळ बहारासाठी वर्ज्य मानुन बगीच्यात पाणी सोडण्याची घाई न केलेली बरी. 

संत्रा/मोसंबी बहार कसा घ्याल.

संत्रा-मोसंबीच्या आंबिया बहाराला नैसर्गिक बहार म्हणतात.  
थंडी सोबतच ताणाचा कालावधी जमिनीचा पोत, झाडाचे वय आणि जमिनीमध्ये उपलब्ध असलेला ओलावा यावर अवलंबून आहे. म्हणूनच थंडी व्यतिरिक्त आंबिया बहारासाठी जमीन स्तरावर विचार केल्यास ताणाचा कालावधी.
हलक्‍या जमिनीत ३५ ते ४५ दिवस, 
मध्यम जमिनीत ४५-६० दिवस आणि
भारी जमिनीत ५५-७५ दिवस असावा.
त्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन ती फिक्कट व नंतर पिवळी पडतात. असे होत असतांना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया पानं सुरूच ठेवतात. साधारणपणे २५ टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बगीच्यातील जमीन स्तरावरील अंतर्गत व्यवस्थापन (उदिम) चालू करावा.
'जिप्सम' टाकून आडवी-उभी वखरण करावी आणि पाणी देण्यासाठी पट्या फाडाव्या. 
ताण तोडण्याचे अगोदर प्रत्येक झाडाला खतावनीत.
"बोनमील" (हाड मासाचे खत) दिड-दोन किलो + 
६०० ग्रॅम नत्र (अमोनियम सल्फेट/ अमोनियम नायट्रेट)+ ४०० ग्रॅम पालाश आणि सुक्ष्म खतात फेरस सल्फेट व झींक सल्फेट प्रत्येकी १००-२०० ग्रॅम द्यावे.
ताण तोडण्याच्या प्रक्रियेतील ओलीत पद्धती अतीशय महत्त्वपूर्ण असते.
जानेवारीच्या दुसर्‍याच आठवड्यात किंवा तापमान थोडे वाढताच पहिले हलके ओलित करावे. ताण सोडतांनाचे पहिलेच ओलित अतीशय कमी करावे.
 त्यानंतर जमीनीच्या जलधारणेची क्षमत पाहुनच (पाच ते सात दिवसांनी) दुसरे पाणी (आंबवणी) द्यावे. 

तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी (चिंबवनी)द्यावे. 

ताण सोडल्यावर जास्तीत जास्त २०-२५ दिवसांनी किंवा त्याअगोदर सुद्धा फुल धारणा होवू शकते. याप्रकारे संपुर्ण बहार प्रकिया पूर्णत्वास जाईल, धन्यवाद  

वरिल लेखातील माहिती जर समजली नसेल तर ते समजून घेण्यासाठी अवश्य फोन कराल. 

 

संकलन - पंकज काळे (M.Sc. Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती

संपर्क - ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११

निसर्ग फाऊंडेशन चा उद्देश-

कृषी खर्च निवारण,

English Summary: Orange bahar when how give Published on: 21 December 2021, 05:05 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters