औषध कोणत्या तापमानात काम करते सोबत वातावरणीय परिस्थिती कोणती पाहिजे अशा गोष्टीचे असलेले अज्ञान यामुळे खूप नुकसान होत आहे.शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेवून मार्केट मधील संधी साधू याचा फायदा उठवतात व शेतकरी लुटला जातोय. शासनाचा कृषि विभाग आणि सज्ञान लोकांमार्फत माहिती प्रसाराचे खूप मोठे काम होणे गरजेचे आहे. खर तर शेती इंडस्ट्रीसाठी कन्सल्टंट किंवा डॉक्टर असणे ही काही नवीन बाब नाही. यामध्ये काम करणारी व्यक्ती खूप हुशार, अनुभवी, अभ्यासू असतात. या इंडस्ट्रीत चांगले काम करणारी, शेतकऱ्यांचे हित जपणारा हा वर्ग देखील असतो.
पण अलीकडील काही काळात कमी दिवसात जास्त पैसे कमावण्याच्या नादात कमी शिकलेली, कसला ही अनुभव नाही, अभ्यास नाही, १-२ वर्ष एखाद्या कंपनीत काम केले की, शेतकऱ्यांशी संवाद साधता आला की तो डॉक्टर होतोय. सदर लोकं ४-५ कंपनीचे कमिशन घेवून त्यांचे उत्पादने लिहून द्यायची मग त्यांचा रिझल्ट असो व नसो. यामुळे त्यांना पैसे मिळतात तसेच ते शेतकऱ्याकडून देखील फी घेत असतात. अवकाळी पावसाने फ्लॉवरिंग मध्ये गळ- कुज होऊन खूप नुकसान झाले. या दरम्यान लबाड लोकांनी दिलेले सल्ले आणि त्यामुळे झालेले नुकसान खूप जास्त आहे.
काही बहाद्दर लोकांना यांनी ऑईलची देखील फवारणी करायला सांगितली. नवीन आलेले स्प्रेडर त्याची जाहिरात अशी झाली की हे पाणी धरून ठेवत नाही, म्हणून त्याचीच फवारणी केली.
महागड्या औषधाच्या फवारण्या, टॉनिकची गरज नसताना या काळात दिली अशा चुकीच्या फवारण्या आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि आता ही लोकं शेतकऱ्यांचा फोन उचलत नाहीत.
शेतकरी मित्रांनो या अशा फसवणुकीच्या काळातून आपल्याला बाहेर पडायचे असेल तर आपल्याला चार गोष्टी कराव्या लागतील
१. लिहावे लागेल.
२. वाचावे लागेल.
३. सखोल अभ्यास करावा लागेल.
४. अभ्यासानुसार कष्ट करावे लागतील.
तरच आपण कठीण प्रसंगातून तरुण निघू. या कठीण प्रसंगात देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभव आपण घ्यावा, त्याचा अभ्यास करावा आणि पुढे जावे लागेल.
हा अनुभव या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना दिला पाहिजे जेणेकरून हे शेतकरी वाचतील.
शेतकऱ्यांना शेतकरीच वाचवू शकतो त्यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे.
अनुभवी शेतकऱ्यांनी मागे असलेल्या शेतकऱ्यांसाठी आपला अनुभव देण्याची वेळ आली आहे.
Share your comments