1. कृषीपीडिया

कांदा, केळी ,पपई, भाजीपाला आणि वेलवर्गीय फळे यासाठी मोलाचा सल्ला

1967 सालापूर्वी म्हणजे, हरितक्रांतीपूर्वी फक्त खरिपात देशी वाणाचे पीक घेतले जाई.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कांदा, केळी ,पपई, भाजीपाला आणि वेलवर्गीय फळे यासाठी मोलाचा सल्ला

कांदा, केळी ,पपई, भाजीपाला आणि वेलवर्गीय फळे यासाठी मोलाचा सल्ला

1967 सालापूर्वी म्हणजे, हरितक्रांतीपूर्वी फक्त खरिपात देशी वाणाचे पीक घेतले जाई. सेंद्रिय कर्बाचा वापर मर्यादित होई.विजेच्या, सिंचनाच्या सोयी झाल्याने वर्षातून दोन-तीन पिके, वार्षिक-बहुवार्षिक पिके घेणे, सुधारित बियाणे, रासायनिक खतांचा वापर वाढला. उत्पादनही वाढले, परिणामी सेंद्रिय कर्बाचा वापर वाढला. एखादे पिकाच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या सेंद्रिय कर्बा इतकेच किंवा त्यापेक्षा अधिक जमिनीत परत दिला गेला असता तरच जमिनीची उत्पादकता टिकून राहिली असती.

मात्र, उत्पादन वाढत गेले, तसतसे सेंद्रिय कर्बाचा वापर घटत गेला. 3ते4 % वरुन 0.3 ते 0.4 % पर्यंत सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कमी झाला ,म्हणजे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 10 पटीने कमी झाले त्यामुळेच आपले पिकावरील खर्चाचे प्रमाण 10 पटीने वाढले. सेंद्रिय कर्बाची पातळी एका ठराविक मर्यादेच्या खाली गेल्यानंतर उत्पादन घटत असल्याची जाणीव आता आपल्या शेतकऱ्यांना होऊ लागली. जमिनीत सेंद्रिय कर्ब आणि जैविक खतांचा वापर आपण वाढवला नाही तर, आपल्या जमीनिची उत्पादन क्षमता वाढणारच नाही ,त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनि रासायनिक खतांचा वापर 30 ते 40% कमी करून, तेव्हढाच (30 ते 40%) सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे .शेतकऱ्यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढेल, आणि जैविक खतांचा वापर का? आवश्यक आहे हे समजून घेतले पाहिजे.

कांदा

 जसजसे कांद्याचं आयुष्य वाढत जाते तशीतशी त्याची वाढ होणे थांबते,कमी होते,त्यामुळे वरील शेंडा थोडा करपू लागतो,शेंडा का ? करपू लागतो तर त्याची वाढ थांबल्या मूळे तो करपू लागतो.असा प्रकार कांदा लागवड करून 60 दिवसाच्या पुढं चालू होतो,जे अन्न कांदा पाती मध्ये साठवलेले असते ते ती पात सगळा रस कांद्याची साईझ वाढवण्या साठी खाली सोडू लागते ,म्हणून शेंडे करपू लागतात, कांदा या पिकाला पिक वाढीचे टाॅनीक/ खते साठ दिवसांचे पुढे वापरले तर कांदा पातीची अतिरिक्त वाढ होणे, मान लांब होणे ,मान जास्त जाङ होणे, पर्यायाने कांदया ची साईज कमी येणे व कांदे जोड होणे हया समस्या निर्माण होतात ,कांदया ची मान हि सरासरी हाताच्या अंगठ्या एवढी कशी राहील याची काळजी घेतली पाहिजे, कांदा दोन महिन्याचा झाल्या नंतर फुगवणी कङे लक्ष दिले पाहिजे.ह्या वर्षी ज्यांच्या कांदा लागवडी डिसेंम्बरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात झाल्या त्या कांद्यावर दोनअडीच महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात थ्रीप्स आणि करपा पडल्यामुळे,व तो आटोक्यात न आल्यामुळे कांद्याची साईझ झाली नाही,कांदा बारीक पडला त्यामुळे उत्पादनात 40%पर्यंत घट झाली.15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी दरम्यान लागवड झालेले कांदे सध्या शेतात आहेत ,या कांद्यावर तापमान वाढीमुळे थ्रीप्स चा अटक कमी झाला व करपाही नाही,पाण्याची उपलब्धता व शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या कीड नाशकांचा फवारणीमुळे या कांद्याचा उतारा चांगला येईल असे माझे मत आहे.पण गेल्या 17 मार्च पासून देशातील विविध भागात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे त्यात कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अवकाळी पावसामुळे व कोरोना मुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढतील असे वाटते.

केळी पपई,आणि भाजीपाला

 

 सध्या होणाऱ्या केळी रोप व पपई रोप लागवडीवर वाढत्या तापमानामुळे व बदलत्या हवामानामुळे विपरीत परिणाम होत आहे , या वातावरण बदला पासून सावरण्यासाठी रोपांना लागवड करतांना " ग्रो कव्हर " चा वापर करावा ,ग्रो कव्हर वापरल्यास उत्तम रिझल्ट मिळतात,ज्यांची पपई ,केळी लागवड 10/12 फेब्रुवारीच्या अगोदर झाली आहे, त्यांनी ग्रो कव्हर नाही वापरले तरी चालेल. उच्च प्रतीचे ग्रो कव्हर केळी ,पपई, या पिकासाठी वापरावे.

केळी, पपई ,भाजीपाला ,आणि वेलवर्गीय फळे या पिकासाठी इ.एम ,वेस्टडीकंपोझर, जीवामृत,व्हॅमपॅक (मायक्रोरायझा) ट्रायकोडर्मा कार्बन+ ,यांचा वापर करावा.

 

 तसेच केळी पपई आणि भाजीपाला पिकांच्या व्हायरसच्या प्रतिबंधासाठी

 

 व्हायरोकिल,याक्टिस, परफेक्ट, ओना,ओसीप या औषधींचा वापर करावा.

केळी, पपई लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी लागवडी पूर्वी,वडाच्या झाडाच्या खालची माती एका एकरला 15 किलो सारख्या प्रमाणात पसरून संपूर्ण शेतात मिसळून घेतल्यास शेतात मोठ्या प्रमाणात सूक्ष्म जिवाणू तयार होतात,वडाच्या झाडा खालचीच माती का? तर त्या मातीत मोठ्या प्रमाणात गांडूळ निर्माण होतात,वडाचे झाड 12 ही महिने हिरवे आणि दाट सावली असलेले झाड आहे, त्यामुळे वर्षभर या झाडावर विविध पक्षांचा रहिवास असतो ,त्यांचे मलमूत्र जमिनीवर पडलेले असते ,आणि वडाच्या परंब्यांमध्ये नवनिर्मिती साठी लागनारे हार्मोन्स असतात, त्यात इंझाईमची निंर्मिती करण्याचा मोठा गुण असतो, म्हणून वडाच्या झाडाच्या पारंब्या खालची माती सेंद्रिय कर्ब जिवाणू आणि गांडूळ वाढविण्या साठी केल्यास, सेंद्रिय कर्ब व जिवाणू वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.तसेच वर सांगितलेली जैविक खते वापरल्यास आपल्या

 जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे, केळी, पपई, भाजीपाला आणि वेलवर्गीय फळे यांच्या उत्पादनात 20 ते 25 %वाढ होते,आणि व्हायरसचे प्रमाण 90 ते 95%पर्यंत कमी करता येते, असा माझा अनुभव आहे.

केळी

पाण्याच्या बाबतीत केळी पीक अत्यंत संवेदनशील असते. एकूण पीक कालावधीत केळीला १६०० ते २००० मि.मी. पाण्याची आवश्‍यकता असते. मृगबागेस दररोज ठिबक सिंचन पद्धतीने मार्च महिन्यात १६ ते १८ लिटर, एप्रिल महिन्यात १८ ते २० लिटर आणि मे महिन्यात २० ते २२ लिटर पाणी प्रतिझाड देण्याची आवश्यकता आहे. कांदेबागेस या तीन महिन्यांमध्ये दररोज प्रतिझाडांस १० ते १४ लिटर पाणी द्यावे. घड निसवण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या मृग बागेस हजार झाडांसाठी प्रति आठवडा ५.५ किलो युरिया आणि ७ किलो म्युरेट ऑफ पोटॉश द्यावे. तर मुख्य वाढीच्या अवस्थेतील कांदेबागेस १३ किलो युरिया आणि ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दर आठवड्याला ठिबक सिंचनद्वारे द्यावे. व्यवस्थित पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यामुळे पीक सशक्त राहते आणि त्याच्या प्रतिकार क्षमतेत वाढ होते.

कांदा केळी, पपई आणि भाजीपाला या पिकांना सर्व 16 प्रकारचे अन्न घटक योग्य वेळी आणि संतुलित प्रमाणात दिल्यास पिकाची प्रतिकार क्षमता वाढून पीक सशक्त होते व अशा सशक्त पिकावर बुरशीजन्य रोग व कीड कमी पडते त्यामुळे कीटकनाशक औषधीही कमी लागते,खर्चात बचत होऊन उत्पन्नात निश्चितच वाढ होते

 

श्री शिंदे सर

भगवती सिड्स,चोपडा

भ्रमणध्वनी 9822308252

English Summary: Onion vegetable papaya vegetable important tips Published on: 23 January 2022, 02:02 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters