अरे व्वा ! गव्हाच्या नव्या वाणाने 'या' गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न झाले दुप्पट

16 October 2020 05:45 PM


भारतीय शास्रज्ञांनी देशातील शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पादन देणारे गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे. या गव्हाची चपातीही उच्च गुणवत्तेची बनते असा निष्कर्ष संशोधनाअंती काढण्यात आला आहे. एमएसीएस  6478 (MACS 6478) असे या नव्याने विकसित केलेल्या वाणाचे नाव आहे. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने (एआयआर) हे वाण विकसित केले आहे. आगरकर इन्स्टिट्यूट ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (डीएसटी) स्वायत्त संस्था आहे. 

गव्हाच्या या वाणाने सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील करंजखोप गावातील शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पन्न दुप्पट केले आहे. यापूर्वी स्थानिक वाणांसह संकरीत लोक वन, एचडी २१८९ अशा वाणांपासून येथील शेतकरी प्रति हेक्टर सरासरी २५ ते ३० क्विंटल गव्हाचे उत्पादन घेत होते. नव्या वाणामुळे शेतकऱ्यांनी एमएसीएस ६४७८ या वाणापासून शेतकऱ्यांनी हेक्टरी ४५ ते ६० क्विंटल उत्पादन मिळवले आहे.

 

 

नव्याने विकसित झालेल्या गव्हाच्या या वाणाची उत्पादन क्षमता उच्च आहे. हे गव्हाचे वाण ११० दिवसांत परिपक्व होते. या गव्हाची पाने आणि देठाचा भाग प्रतिरोधकाचे कामही करतात. मध्यम आकाराचे पिवळ्या रंगाच्या या गव्हात प्रोटीनचे प्रमाण १४ टक्के आहे. झिंकचे प्रमाण ४४.१ पीपीएम तर लोहाचे प्रमाण ४२.८ आहे. सध्या लागवड केल्या जाणाऱ्या जातींपेक्षा हे प्रमाण उच्च आहे. या वाणाविषयी इंटरनॅशनल जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाइड सायन्सेस यामध्ये शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

या गव्हाच्या पिठाची चपाती, त्याची गुणवत्ता उत्कृष्ट आहे. त्याच्या ब्रेडची क्वालिटीही अत्युच्च दर्जाची आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे संस्था, महाबीजने शेतकऱ्यांच्या वापरासाठी एमएसीएस ६४७८ हे वाण शेतकऱ्यांसाठी उत्पादित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या गव्हाच्या पिठाची चपाती गुणवत्ता उत्कृष्ट आहे व ती चांगली ब्रेड क्वालिटी 6.93 गुणांसह 8.05 आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे एजन्सी बियाणे गुणाकार, ‘महाबीज’ शेतक-यांच्या वापरासाठी एमएसीएस 78 647878 चे प्रमाणित बियाणे उत्पादन करीत आहे. करंजखोप येथील १० शेतकऱ्यांनी आतापर्यंत १४ एकर क्षेत्रात याची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी आता पुढील टप्प्यात याचे बियाणे उत्पादन आणि शेतीच्या इतर उत्पादनांसाठी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. बियाणे उत्पादनासाठी करंजखोपमध्ये एआरआयचे कर्मचारी आणि बियाणे सर्टिफिकेशन अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत.

याबाबत करंजखोपमधील शेतकरी रमेश जाधव म्हणाले, आम्हाला पीक उत्पादन पद्धतीतील बदलाबाबत प्रोत्साहनाची गरज होती. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने हे एमएसीएस ६४७८ हे वाण विकसित करून ही संदी दिली आहे. त्यामुळे आता आम्हाला नव्या तंत्राने शेती करण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

 

यासंदर्भातील अधिक माहितीसाठी

संशोधक अजित एम. चव्हाण

ई मेल - amchavan@aripune.org

मोबाईल - 919423007238

जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग ग्रुप, आणि डॉ. पीके ढाकेफळकर, संचालक (अधिकृत), एआरआय, पुणे,

(director@aripune.org, pkdhakephalkar@aripune.org, 020-25325002)

 

wheat गव्हाचे नवे वाण MACS 6478 wheat variety एमएसीएस 6478 आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट एआयआर Agarkar Research Institute
English Summary: Oh wow The new variety of wheat doubled the income of the farmers in this village

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.