शेतातल्याच वस्तूंचा वापर करून उत्तम खत तयार करण्याची निर्मिती एक कला आहे. शेतातल्या उरलेल्या पालापाचोळ्याचा palapa (Mulch) वापर करून उत्तम पद्धतीचे खत (Fertilizers) तयार करता येऊ शकते.रासायनिक खतांपेक्षा (Chemical fertilizers) या खतांचा वापर केल्यास उत्पादनात (Production) चांगल्या पद्धतीची वाढ दिसते. कमी साहित्यामध्ये व कमी खर्चामध्ये उत्तम पद्धतीचे खताची निर्मिती होऊ शकते. यामुळे खर्चही कमी राहील आणि उत्पादनात सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढ होईल.उसाच्या पाचोळ्या पासून खत निर्मिती
कोणतेही खत पाहिजे असेल तर त्याच्याती सावली राहणे गरजेचे असते. खड्ड्यावर दिवसभर सावली राहावी यासाठी छप्पर करावे. त्यासाठी लाकूड,उसाचे पाचट, बांबूइ त्यादी साहित्यांचा वापर करावा. हे शेड उभारताना त्याची मधील उंची साडे सहा फूट, बाजूची उंची पाच फूट व रुंदी दहा फूट असावी. छपराची लांबीती आपल्याकडे किती पांचट उपलब्ध आहे यानुसार कमी जास्त होऊ शकते. छपराच्या मध्यापासून 1-1 फूट दोन्ही बाजूस जागा सोडून चार फूट रुंदीचे व एक फूट उंचीच्या दोन समांतर वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत व आतील बाजूने चांगल्या पद्धतीने प्लास्टर करून घ्यावे व खालील बाजूस कोबा करून घ्यावा.
एक शेड तयार करताना जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी तळाशी पाईप टाकावा. वाफे तयार करण्याची दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी आठ ते नऊ इंच खोलीचे दोन समांतर चर काढावेत.खड्ड्यातील माती चांगली चोपून टणक करावी.अशा पद्धतीने शेड तयार करून घ्यावे.खत तयार करण्यासाठी केलेल्या छपरामध्ये खोदलेल्या चरामध्येतेव्हा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे. त्याची उंची जमिनीपासून/ विट बांधकामापासून 20 ते 30 सेंटिमीटर ठेवावी.
पाचट भरतांना एक टन पाचटसाठी आठ किलो युरिया,दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ताजे शेण खत 100 किलो वापरावे.या सर्वांचे पाण्यात मिश्रण करावे.कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धक एक टनास एक किलो या प्रमाणात प्रत्येक थरावर थोडेसे वापरावे. यावरती पाणी मारत रहावे.अर्धवट कुजलेल्या 1 टन पाचटासाठी दोन हजार हसीनिया फोटेडा ( Eisenia fetida) जातीची गांडुळे सोडावी व हे गांडुळे सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे अडीच ते तीन ( 2.5-3 Months) महिन्यांनी उसाच्या पाचटापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
Share your comments