निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वात जास्त परिणाम पिकांवर होत असतो जे की सध्या वातावरणातील आद्रता कमी झाल्याने हवामान स्वच्छ झाले आहे. सकाळी वातावरण थंड तर दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. सध्या थंडी कमी झाल्यामुळे वातावरणात कमाल व किमान तापमान वाढले आणि याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके जोमाने वाढत आहेत मात्र फलधारणा अवस्थेत जर वातावरणात बदल झाला तर याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. सध्या जे वातावरणात आहे ते पिकांच्या वाढीसाठी तसेच फलधारणेसाठी योग्य आहे असे कृषितज्ञ रामेश्वर चांडक सांगतात.
थंडी कमी, तापमानाचा पिकांना फायदा :-
थंडीमध्ये रब्बी हंगामातील पिकांची जोमाने वाढ होते जे की पिकांची योग्यरीत्या वाढ तर झाली आहेच जे की पीक शेंगा आणि दाणे लागण्याच्या अवस्थेत आहेत. सध्या चे १७-१८ अंश डिग्री सेल्सिअस तापमान हे शेंगा पोसण्यासाठी तसेच ज्वारी पिकामध्ये दाणे भरण्यासाठी चांगले आहे. पिकांना पोषक वातावरण तयार झालेले आहे जे की पोषक वातावरणामुळे पिकांची जोमात वाढ तर होणार आहेत पण सोबतच उत्पादनात देखील प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे असा विश्वास कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.
रस शोषण किडीचा धोका :-
रब्बी हंगामातील पिके आता कुठे बहरत आहेत तो पर्यंत त्यावर रस शोषण अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे जे की या रस शोषण अळीचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे. मावा, तुडतुडे तसेच पांढरी माशी आणि फुलकिडे सुद्धा पिकांमधील रस शोषण करण्याचे काम करत आहेत त्यामुळे आता उत्पादनावर परिणाम होणार आहे. एका बाजूला पिकांची जोमात वाढ होत आहे तर दुसऱ्या बाजूला पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. जर पिकांवर वेळेवर फवारणी केली तरच पीक वाचेल आणि उत्पन्न पदरी पडेल असे कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे. मात्र जो पर्यंत रस शोषण अळी पाहत नाही तो पर्यंत काहीच करता येणार नाही असेही कृषी तज्ञांनी सांगितले आहे.
अळी पाहणी झाली तरच फवारणी करा :-
पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले असल्यामुळे एका बाजूला पिके चांगल्या प्रकारे बहरत आहेत तर दुसऱ्या बाजूला पिकांवर रस शोषण अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणी करण्याचा सल्ला तर दिला आहे मात्र जो पर्यंत अळी कोणती आहे याची पाहणी होत नाही तो पर्यंत आपणास कोणत्याही प्रकारची फवारणी करता येणार नाही असे कृषी विभागाने शेतकऱ्याना सांगितलेले आहे.
Share your comments