नमस्कार मित्रांनो हा लेख आपल्या शेती मातीशी निगडित आहे. आपण आपल्या जमिनीत उत्पादन घेत आहोत तिचा पोत राखण्यात आपणकुठेतरी कमी पडत आहोत. बेसुमार रासायनिक खते व कीटकनाशके यामुळे उत्पादनात वाढ झाली खरी पण नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची आपल्या जमिनीची गरज पूर्ण होऊ शकत नाही.
ज्यामुळे जमीनीचा पोत टिकण्यास मदत करणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकण्याचे प्रमाण कमी झाले. जमिनीचे आरोग्य बिघडण्यास मदत झाली. सुपीक असलेल्या जमिनी आता नापीक होत गेल्या. याचे कारण काय असू शकते?
मित्रांनो आपल्या शेतात रासायनिक खतांच्या असंतुलित व बेसुमार वापरामुळे जमिनीत जैविक घटकांचा विनाश होऊन जमिनी मृत झाल्या. खतांची कार्यक्षमता ही कमी झाली. कमी कार्यक्षम त्यामुळे पुन्हा वाढीव वापर आणि पुन्हा जमिनीचा ऱ्हास या दुष्टचक्रात आपल्या नवीन उत्पादन पद्धतीमध्ये अडकलेल्या आहे. तिचे एक प्रकारे शोषण झालं. मला शेतकऱ्यांना हेच सांगायचे आहे मातीबाबत जागृतता निर्माण करणारी यंत्रणा तयार व्हावी.वेळोवेळी मातीचे महत्व हे शेतकऱ्यांना समजावून सांगणे, जमीन, जमिनीची उत्पादन क्षमता ही निसर्गाची देणगी आहे.
जमिनीचे गुणधर्म टिकवणे किंबहुना सुधारणे आणि उत्पादनक्षमता टिकवणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे.आपली जमीन नापीकव्यवस्थित पोहोचली आहे. याचा अर्थ असा की पंचवीस ते तीस वर्षाच्या कालावधीत आपण या देशात आवश्यक असलेले शेतीचे उत्पादन घेण्यासाठी कदाचित सक्षम राहणार नाहीत हे लक्षात घ्या. मित्रांनो आपण मातीची गुणवत्ता गमावत आहोत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना आपली पुढची पिढी शेतीत जावी असे वाटत नाही. याचा अर्थ असा की आणखी पंचवीस वर्षात आपण नक्कीच अन्नधान्याच्या मोठ्या महा संकटात सापडणार आहोत. आता मातीचे महत्व जाणवणे महत्त्वाचे आहे.आपण आपल्या शेतात कोणत्याही प्रकारची उत्पादने घेतोय त्या शेतातल्या मातीत आपण बीज पेरणी केली तर त्या शेतामध्ये एका बियांची हजार बी तयार होतात.या त्या झाडाला निर्माण झालेले एक हजार बी काही बाहेरून आणून कोणी त्या झाडाला लावलेले नाही. ही प्रक्रिया मातीमधून ते तयार झाले आहेत. हे लक्षात घ्या त्यांना तयार करण्याची प्रक्रिया जैविक प्रक्रिया आहे. ती मातीतच होऊ शकते.कारण माती हा सजीव घटक आहे. निसर्गाने शेतीला, बियाण्यांना आणि मातीला दिलेले हे एक अजोड वरदान आहे. आई मुलाला जन्म देते आणि नंतर त्याचे भरण-पोषण करते तशी ही काळी आई तिच्या पोटात तयार होणाऱ्या या पिकांचे भरणपोषण करत असते. वसुंधरा आहे!आपण तिचे शोषण करीत आहेत.
आता आपल्याला जागृत होण्याची वेळ आली आहे. आता नाही तर केव्हाच नाही मित्रांनो! जर जमीन आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर शेणखत व कंपोस्ट खताचा वापर, रासायनिक खतांचा असंतुलित वापर टाळणे, चुकीच्या खतांच्या मात्रा व त्या देण्याची अयोग्य पद्धती टाळणे तसेच पाण्याच्या योग्य वापर व पाण्याचा अति वापर टाळणे गरजेचे आहे. आपण जसे आपल्या डोळ्याने दिसू शकणाऱ्या घटकांची काळजी घेतो त्याप्रमाणे डोळ्यांना न दिसणाऱ्या मित्र सूक्ष्मजीवांचे संवर्धन करणे नितांत गरजेचे आहे. ती काळाची गरज आहे. मंडळी आपल्या शेतात मित्र जिवाणू तसेच मित्र जिवाणू पोषण संवर्धन होईल हे बघितले जाणे तितकेच शेतीमध्ये महत्त्वाचे आहे.
लेखक
मिलिंद जि. गोदे
युवा शेतकरी मित्र
Share your comments