आंबा म्हणजे फळांचा राजा...आणि हापूस या आंब्यामधला महाराजा... याच हापूस आंब्या बाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकणातील जगप्रसिद्ध अशा हापूस आंब्याची (Hapus Mango) चव आता वर्षभर चाखता येणार आहे.
आंबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी
आंबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ऐन गणेशोत्सवात खवय्यांसाठी हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. कोकणातील जगप्रसिद्ध अशा हापूस आंब्याची (Hapus Mango) चव आता वर्षभर चाखता येणार आहे
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील नेमळे गावातील आंबा व्यावसायिक गुरुप्रसाद नाईक (Guruprasad Naik) यांनी ही किमया साधली आहे. त्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये नैसर्गिकरित्या पिकलेलल्या आंब्याची साठवणूक केली आहे. त्यामुळं वर्षभर हवा तेव्हा आता हापूसची चव चाखता येणार आहे.
हेही वाचा: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार...
लाडक्या बाप्पाला कोकणच्या हापूस आंब्याचा नैवद्य
कोकणातला आवडता सण म्हणजे गणेश चतुर्थी. हजारो चाकरमानी या सणाला कोकणात दाखल झाले आहेत. गणेश चतुर्थीत आपल्या लाडक्या बाप्पाला कोकणचा फळांचा राजा असलेला हापूस आंबा नैवद्य म्हणून ठेवला जातो आहे. तर काही जण आबा ज्युस, आंब्याचं रायत बनवून त्याची चव चाखली जात आहे.
आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये टिकतो
नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये विशिष्ट तापमानाला साठवून ठेवला तर तो वर्षभर टिकतो. त्यासाठी गुरुप्रसाद नाईक यांनी गेली दोन वर्ष प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे.
आता शासनाने कोकणातील आंबा बागायदारांना अशा प्रकारे कोल्ड स्टोरेज करण्यासाठी व्यवस्था करुन दिल्यास आंबा बागायदारांना वर्षभर रोजगार सुध्दा मिळेल. आंबा खवय्यांना चव देखील चाखता येईल.
आता मोफत रेशन मिळणार की नाही? केंद्र सरकार याबाबत घेणार मोठा निर्णय
डझनाला 1 हजार 200 रुपयांचा दर
डझनाला किमान 1 हजार 200 रुपयांचा दर मिळत असल्याने चांगला फायदा होत असल्याचे गुरुप्रसाद नाईक यांनी सांगितले. परंतु कोल्ड स्टोरेजसाठी मोठ्या प्रमाणात लाईट बिल येते, हे परवडणारे नाही.
बऱ्याचवेळा लाईट गेल्यास जनरेटरचा वापर करावा लागतो. शासनाने सबसीडी दिल्यास आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास हा प्रयोग कोकणात नक्की यशस्वी होईल.
Share your comments