1. कृषीपीडिया

फवारणी करताना शेतकऱ्यांनी अशी दक्षता घेतल्यास नो टेन्शन

पोषक वातावरण असल्याने पिकांवर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
फवारणी करताना शेतकऱ्यांनी अशी दक्षता घेतल्यास नो टेन्शन

फवारणी करताना शेतकऱ्यांनी अशी दक्षता घेतल्यास नो टेन्शन

पोषक वातावरण असल्याने पिकांवर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. किडनियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीवर भर दिला जात आहे. मात्र आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर विषबाधा होण्याची अधिक शक्यता आहे. पुढील अनर्थ टाळण्यासाठी फवारणी करताना दक्षता घ्यावी.पवसाने विश्रांती घेताच, शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, फवारणी करताना आवश्यक ती दक्षता न घेतल्यामुळे चार वर्षांपूर्वी शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याचे प्रकार वाशिमसह अन्य जिल्ह्यातही समोर आले होते.

या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबत कृषी विभागाने जनजागृती सुरू केल्याचे दिसून येत आहे. तरी फवारणी करणारा आणि फवारणी करते वेळी त्या सोबत असणाऱ्या व्यक्ती यांनी विशेष काळजी घ्यावी.फवारणी करताना काय करू नये?- किटकनाशकाची वाहतुक अन्नपदार्थासोबत करु नये.- किटकनाशके लहान मुलांच्या हाती लागू देवू नये.- किटकनाशकाचा डबा हा अन्न अथवा पाण्याकरिता वापरु नये.- किटकनाशकांची वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये.- नोझल साफ करण्यासाठी तोंडांनी फूंकर मारु नये.Do not blow with the mouthpiece to clean the nozzle- फवारणी करताना धुम्रपान / तंबाखू तसेच काहीही खाणे पिणे टाळावे.

- किटकनाशके व तणनाशके फवारणीसाठी एकच पंप वापरू नये.- फवारणीचे द्रावण बनविण्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ किवा पिण्याचे पाणी ठेवू नये.उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी.काय दक्षता घ्यावी?नोझल साफ करण्यासाठी तार, काडी किंवा टाचणीचा वापर करावा.- डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.- किटकनाशके मुळ पॅकिंगमध्येच खरेदी करावी.- संरक्षण कपडे, बुट, हात मोजे, नाकावरील मास्क, चष्मा इत्यादीचा वापर करावा.- किटकनाशकांचे मिश्रण काडी किंवा लाकडी दांड्याने निट मिसळवून घ्यावे.- औषधी अपघाताने अंगावर उडाल्यास त्वरीत स्वच्छ धुवावे. 

- फवारणीनंतर आंघोळ करावी व फवारणीचे कपडे स्वच्छ धुवावे.- विषबाधा झाल्यास शक्य तितक्या लवकर जवळच्या दवाखान्यात घेवून जावे. याकरिता १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.कोणता डबा सर्वाधिक विषारी?किटकनाशकाच्या डब्यावरील विविध रंगाचे चिन्ह हे किटकनाशकाची तिव्रता दर्शवितात. लाल रंगाचे चिन्ह हे सर्वाधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा उतरता क्रम लागतो.अश्या प्रकारे किटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी फवारणी करताना काय करावे आणि काय करू नये याबाबत जनजागृती सर्वांनीच केली पाहिजे..

 

Nutritionist & Dietician

Naturopathist 

Dr. Amit Bhorkar  

whats app: 7218332218

English Summary: No tension if farmers take such precautions while spraying Published on: 29 July 2022, 12:22 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters