आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणुन ओळखला जातो कारण की, देशातील बहुतांशी लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबुन आहे.
आजही उपजीविकेसाठी आपल्या देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये तेथील हवामान आणि परिस्थितीनुसार वेगवेगळी पिके घेतली जातात.
मात्र सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारी पिके कोणती असा प्रश्न शेती करत असताना निश्चितच अनेकांना पडला असेल. आज आपण देखील याच प्रश्नावर मीमांसा करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोतं.
मित्रांनो आज आपण कमी खर्चात अधिक उत्पन्न प्राप्त करून देणाऱ्या पिकांच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत.चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी.
चंदन शेती- चंदन ही एक प्रकारची सुगंधी वनस्पती आहे. या चंदनाच्या भारतात एकूण 20 प्रजाती असल्याचा दावा केला असतो.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, चंदनाचा उपयोग धार्मिक कारणांसाठी, औषधी बनवण्यासाठी, खेळणी बनवण्यासाठी, अत्तर बनवण्यासाठी आणि हवन साहित्यासाठी केला जातो.
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रात चंदनाची लागवड सर्वाधिक केली जातं असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
मित्रांनो चंदन लागवडीसाठी मात्र जमिनीतील पाण्याचे योग्य तापमान आवश्यक आहे. याशिवाय याची शेती करण्यासाठी वनविभागाकडून परवाना घेणे देखील आवश्यक आहे.
तुळस शेती- तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. यामुळे अलीकडे या वनस्पतीला खूप मागणी आहे. ही वनस्पती शेतकऱ्यांसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते.
यासाठी उष्णकटिबंधीय आणि कटिबंधीय दोन्ही हवामान चांगले असल्याचा कृषी वैज्ञानिकांचा दावा आहे. तुळशीचे पीक लवकर खराब होत नाही, मात्र त्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते.
मशरूम शेती- आजच्या काळात मशरूमला खूप मागणी आहे. यामुळे याची शेती निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे.
याला बाजारात बारामाही मागणी असल्यामुळे हे चांगला नफा देणारे एक पीक आहे. आपण त्याच्या उत्पादनासाठी विशेष प्रशिक्षण देखील घेऊ शकता.
व्हॅनिला शेती- शेतकरी मित्रांनो व्हॅनिला लागवडीतून लाखो रुपये कमवले जाऊ शकतात. मिठाई, परफ्यूम, आईस्क्रीम इत्यादी अनेक गोष्टींसाठी व्हॅनिला वापरला जातो.
त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, आगामी काळात ती अजून वाढू शकते. याची शेती करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
इसबगोल शेती- या पिकाची लागवड मुख्यतः गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात केली जाते.
ही एक औषधी वनस्पती आहे. या शेतीसाठी शासनाकडून अनुदानही दिले जाते. आपल्या राज्यातही थोड्या प्रमाणात का होईना याची शेती केली जाते.
Share your comments