शेतकरी मित्रांनो शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी, पिके रोटेशन पद्धतीने घेणे महत्वाचे ठरते. तसेच आपल्या शेतात वेगवेगळ्या पिकांची शेतीकरणेगरजेचेआहे. मिश्र शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होताना दिसत आहे.
डिमांड मध्ये असलेल्या पिकांची लागवड केली तर आपणास त्यातून बक्कळ पैसा प्राप्त होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो काकडीचे पीक नेहमी डिमांडमध्ये बनलेली असते. काकडीचे पीक करून अनेक शेतकरी लाखो रुपयांची कमाई करताना आपणास दिसत असतील आपल्या राज्यात देखील काकडीची लागवड ही लक्षणीय बघायला मिळते. काकडी हे एक हंगामी पीक आहे. आणि हे पीक अगदी कमी कालावधीत तयार होणारे पीक आहे.त्यामुळे या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. त्यामुळे आज आपण काकडीच्या एका वाणाची माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो काकडीची लागवड तसे बघायला गेले तर उन्हाळ्यात अधिक प्रमाणात बघायला मिळते. मात्र पावसाळ्यात याची लागवड केली तर उत्पादन अधिक प्राप्त होते. काकडीचे पीक हे जवळपास 80 दिवसांनी काढायला तयार होते. म्हणून कमी दिवसात निघणारे हे पिक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. काकडी लागवडीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काकडीची लागवड ही सहजरित्या कुठल्याही जमिनीत सहजरित्या केली जाऊ शकते. आणि या पिकातून चांगले मोठे उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते. काकडीची लागवड जरी कोणत्याही जमिनीत करता येणे शक्य असले तरी याची लागवड ही अशा जमिनीत केली गेली पाहिजे ज्या जमिनीचा पीएच हा 5.5 ते 7दरम्यान असतो.काकडीची लागवड ही नदी किनारे देखील केली जाऊ शकते. तसेच डोंगराळ भागात देखील काकडीची लागवड सहजरित्या केली जाऊ शकते.
नेदरलॅंडची काकडी ठरली या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर :-
उत्तर प्रदेश राज्यातील एका शेतकऱ्याने काकडी लागवड करून अवघ्या चार महिन्यात आठ लाख रुपयांची कमाई केली. उत्तर प्रदेशचे दुर्गा प्रसाद यांनी आपल्या शेतीत नेदरलँड काकडीची लागवड केली होती. दुर्गा प्रसाद यांच्या मते नेदरलँड होऊन काकडीचे बियाणे मागवून शेती करणारे ते उत्तर प्रदेश राज्यातील एकमेव शेतकरी आहेत.नेदरलँड च्या काकडी ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या काकडे ला बिया नसतात. त्यामुळे याची मागणी रेस्टॉरंटमध्ये हॉटेल्स मध्येमोठ्या प्रमाणात बघायला मिळते. म्हणून याची लागवड दुर्गाप्रसाद यांच्यासाठी देखील खूप फायद्याची ठरली.
दुर्गाप्रसाद यांनी या वाणाची काकडी पॉली हाऊस मध्ये लावलीहोती, त्यांना बियाण्या साठी 72 हजार रुपये खर्च आला होता. आणि या नेदरलँडच्या काकडीची लागवडकेल्यापासून चार महिन्यानंतर त्याचे उत्पादन मिळाले आणि त्यांनी त्यातून जवळपास आठ लाख रुपये कमावले. ह्या काकडीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या काकडी ची किंमत इतर काकडीच्या किमतीपेक्षा दुपटीने जास्त असते.
Share your comments