
neem arc
पिकांवर निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे पाने कडू बनतात हे असे पानेखाणे किडी टाळतात त्यामुळे त्यांची उपासमार होते व शेवटी त्या मरतात.पिकांवर निंबोळी अर्क वापरल्याने त्याचे काय फायदे होतात याची माहिती या लेखात घेऊ.
निंबोळी अर्क वापरण्याचे फायदे
- किडीच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळा- निंबोळी अर्काचा कडू वासामुळे पिकाच्या पानांवर, फुलांवर तसेच कोवळ्या शेंड्यावर मादी कीटक अंडी घालत नाही. त्यामुळे पुढील पिढी तयार होण्यास अडथळा निर्माण होतो.
- किडींच्या प्रजोत्पादन प्रक्रियेत अडचण- निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे किडीमध्ये नपुसंकता येते तर मादी मध्ये लिंग आकर्षण कमी होते परिणाम पुढील पिढी तयार होण्याचे प्रमाण कमी होते.
- पिकापासून परावृत्त करणे- निंबोळी अर्काच्या कडू वासामुळे कीड जवळ येणे टाळते. केळीच्या कात टाकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येऊन किडीची नैसर्गिक वाढ होताना होळी अगर पिल्लू अवस्थेत शरीरवाढीसाठी नियमित कात टाकनेआवश्यक असते. निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे त्यात व्यत्यय येतो.
- अविकसित प्रौढ तयार होतो- अशा अवस्थेतून निघालेल्या पिढी मध्ये विकृती,अपंगत्व येणे, अविकसित पंखा तयार होणे इत्यादी प्रकार आढळतात. त्यासोबतच प्रजोत्पादन क्षमता मंदावते आणि पुढील संभाव्य नुकसान कमी होऊ शकते.
- कालावधी कमी होणे- निंबोळी अर्काचा संपर्कात आलेल्या किडीच्या विविधा अवस्थांवर घातक परिणाम होऊन त्याचा जीवन कालावधी कमी होतो.
निंबोळी अर्क वापरण्याचे फायदे
1-निंबोळी अर्क तयार करण्याचा खर्च अतिशय कमी असतो.
2- निंबोळी अर्क नैसर्गिक असल्याने प्रदूषण होत नाही.
3- निंबोळी अर्क हाताळणे व वापरणे सोपे आहे.
4- निंबोळी अर्क घातक किडींना प्रतिबंध करत असले तरी नैसर्गिक शत्रू मित्र कीटकांसाठी फारसेहानिकारक ठरत नाही, ही रासायनिक कीटकनाशक मुळे होणारे दुष्परिणाम टाळता पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
5-निंबोळी अर्क वापरल्यामुळे जमिनीत सूत्रकृमी मुळे कुरतडणाऱ्या अळ्या नियंत्रित होतात. निंबोळी अर्क मुळे पिकावरील विविध किडींच्या मादी अंडी घालण्यापासून परावृत्त होतात.
6-निंबोळी अर्क पिकावर फवारणी साठी वापरला असता पांढरी माशी,मिलीबग लष्करी आळी,तुडतुडे, फुल किडे, कोळी इत्यादी प्रकारचे किडींना खाद्य प्रतिबंध करतो.कडूनिंब आतील अझडिरिक्टिन हा घटककिडिंची वाढ थांबवतो. तसेच कात टाकण्यास प्रतिबंध करतो त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते.
लेखक- जैविक शेतकरी- शरद केशवराव बोंडे
( संदर्भ- कृषी वर्ड)
Share your comments