आपण शेती करत असताना नवीन पिकांच्या नवीन जाती आपल्या शेतामध्ये लागवड करत असतो जसे विद्यापीठाने संशोधित केलेली नवीन वाण आपण आपल्या शेतामध्ये लागवड करतो व आपल्या उत्पादनात वाढ होईल अशी काळजी करतो.परंतु शेतकरी मित्रांनो आपण जसी नवीन वान आपल्या शेतामध्ये लागवड करतो आणि त्या पिकाला कोणते कोणते खत देत आहात याची काळजी घेतली पाहिजे म्हणजेच आपण आज पिकांना काय देतात आणि त्या पिकांना तेच अन्नद्रव्ये लागते का याचा विचार केला पाहिजे म्हणजे शेतकरी आपल्या शेतामध्ये 10 .26. 26 डीएपी 12. 32. 16 0.52.34. युरिया म्हणजेच आपण N.P.K. हे तीनच मुख्य अन्नद्रव्य देत आहात.
फक्त तीन मुख्य घटक. ते पण रासायनिक खतांच्या माध्यमातून. याचा दुष्परिणाम म्हणजे जमिनीतील जिवाणू ;गांडूळ संपले. जिवाणू संपल्यामुळे जमिनीत हवा जात नाही पाणी मुरत नाही , जमीन भुसभुशीत होत नाही याचा परिणाम मातीच्या सुपीकतेवर होत असतो म्हणून उत्पन्न घटते .जर मातीची सुपीकता व उत्पन्न वाढवायचे असेल तर सेंद्रिय औषध वापरावे लागतील. सेंद्रिय खते व औषधे किंवा मनुष्य आणि पिक किंवा मातीला हानिकारक नाहीत.
या सर्व बाबींची शेतकऱ्यांनी जोपासना घेतली पाहिजेत.सेंद्रिय औषधांच्या वापरामुळे पीक जोमाने वाढेल व उत्पादन खर्चात बचत होईल जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस वाढत जाईल आणि याचा परिणाम असा होईल की रासायनिक खताच्या कमी वापरामुळे निरोगी आयुष्य लाभेल व एकंदरीत शेतीचा उत्पादन खर्च सुद्धा कमी होईल .
मातीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक घटक.
पिकांना काय देतात आणि त्या पिकांना तेच अन्नद्रव्ये लागते का याचा विचार केला पाहिजे
Share your comments