सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.
रासायनीक शेती ही उत्पादनखर्च वाढवणारी आहे व मानवी आरोग्य व प्राण्यांचे आरोग्यास हानिकारक आहे त्याच बरोबर मातीचे ही उत्पादनक्षमता कमी होते त्यामुळे आता आपल्याला नैसर्गिक कीटकनाशके व नैसर्गिक टॉनिक वापरावे लागेल. त्यामध्ये जिवाणू पाणी गारबेज, सेंद्रिय युरिया, संजीवनी अर्क, ह्युमिक ऍसिड अशा प्रकारचे टॉनिक व कीटकनाशके वापरायचे आहे.
जिवाणूपाणी / कल्चर : एकरी पाणी १८० लीटर + देशी गायीचे शेण ५ किलो + देशी गायीचे गोमुत्र ५ लिटर + गुळ २ किलो + राख ( अग्निहोत्राची असेल तर सर्वोत्तम ) २ किलो + माती ( रस्त्याकडचा फुफूटा) २ किलो हे सर्व मिश्रण एकत्र करून ७ दिवस ठेवणे .७ ते २१ दिवसापर्यंत वापरता येते
गारबेज – ( ९० दिवसाचा फॉर्मूला ) गोड फळे १० किलो+ गुळ ३.५ किलो + पाणी ३५ लिटर हे सर्व मिश्रण एकत्र करून बॅरल मध्ये पॅक करून ठेवणे.
पहिले ३० दिवस दररोज एकवेळ त्यामधील गॅस काढणे. दुसऱ्या ३० दिवसापर्यंत ४ दिवसातुन एक वेळ गॅस काढणे. शेवटच्या ३० दिवसात ८ दिवसातुन एकदा गॅस काढणे. प्रमाण फवारणी करीता १ लीटर पाण्यास १ मिली गारबेझ. आळवणी करीता १ लीटर पाण्यास ५ मिली गारबेझ.
सेंद्रीय युरीया – एकरी २ किलो कॉंग्रेस गवत + १०० ग्रँम ईष्ट पावडर किंवा २ लिटर D कंपोजर + देशी गायीचं गोमूत्र ४ लिटर + पाणी १० लिटर हे सर्व मिश्रण एकत्र करून २० दिवस ठेवावे दररोज सकाळ संध्याकाळ काडीने ढवळावे. २० दिवसानंतर तयार होते.
गारबेज – ( १५ दिवसाचा फॉर्मूला ) यामध्ये वरील सर्व निविष्ठासोबत ईष्ट पावडर १०० ते १५० ग्रँम वापरावी. पाण्याऐवजी D कंपोजर वापरू शकता.
संजीवनी अर्क – देशी गायीचे गोमूत्र ५ लीटर + मैदा १ किलो + तांदळाचे पिठ १ किलो + गुळ १ किलो हे मिश्रण एकत्र करून ८ दिवस ठेवावे. ८ दिवसानंतर त्या मधील १ लिटर विरजण घ्यावे व त्यात ४ लिटर देशी गायीचे गोमूत्र व २५० ग्रॅम गुळ टाकून परत ८ दिवस ठेवून नंतर वापरावयास घ्यावे.
प्रमाण – प्रति पंप ८० ते १५० मिली आळवणी एकरी ५ लिटर .
अग्निहोत्राची राख १०० ग्रॅम १ लीटर देशी गायीच्या गोमुत्रामध्ये १२ ते २४ तास भिजत ठेवुन त्यानंतर १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकाच्या फूलकळी अवस्थेमध्ये गोमूत्राऐेवजी ताक वापरावे. याचे अद्भुत परीणाम मिळतात.
ह्यूमिक अॅसीड – एकरी देशी गायीच्या २० लिटर गोमुत्रामध्ये ५ लिटर ताक टाकावे या मिश्रणामध्ये तिसऱ्या दिवशी २०० ते ३०० ग्रॅम गुळ टाकून ७ दिवसाच्या आत वापरावे.
जनावराची वार( देशी गायीची सर्वोत्तम ) एका ड्ममध्ये २० लीटर पाणी + २ लीटर D कंपोजर + २० लीटर देशी गायीच गोमुत्र हे सर्व एकत्र वारेचे पाणी होईपर्यंत ठेवणे.
प्रमाण – फवारणीसाठी प्रती पंप २०० मिली आळवणी एकरी ३ते ४ लिटर
करपा – एकरी १०० ग्रॅम बाभळीचा पाला २ लीटर पाण्यात टाकून १ लिटर होईपर्यंत शिजवावे गार झाल्यानंतर त्यामध्ये देशी गायीचे गोमूत्र १ लीटर टाकून फवारणी करावी . ६४ प्रकारच्या किडींवरती एकच औषध – २ किलो काँग्रेस गवत १० लीटर पाण्यात टाकून २.५ लीटर होईपर्यंत शिजवावे .
प्रमाण प्रती पंप १५ ते २० मिली खतरनाक रिझल्ट
फुलकळी वाढवण्यासाठी – हुंबूराची फळे १ किलो व १ किलो गुळ दहा दिवस एकत्र करून कुजवणे
प्रमाण – फवारणी साठी प्रती पंप ५० मिली
फळगळ – एकरी पळसाची फुले २ किलो + देशी गायीचे गोमुत्र २ लीटर + पाणी २ लीटर हे सर्व मिश्रण एकत्र करून ७ दिवस ठेवणे. त्यानंतर वापरावयास चालते. कॅल्शीयम व बोरॉनची कमतरता पूर्ण करते.
रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्याकरीता – एकरी १०० ग्रॅम बेलाची पाने २ लिटर पाण्यामध्ये टाकून १ लिटर होईपर्यंत आटवावे तयार झालेल्या द्रावणाची फवारणी करावी.
खोड किड किंवा शेंडा मुरगळणे- ३ फड्याची (घायपात )पाने घेउन छोटे छोटे तुकडे करून २ लिटर पाण्यात ३६ तास भिजत ठेवावे ३६ तासानंतर फवारणीसाठी प्रमाण प्रती पंपास १ ते अर्धा लिटर
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८
प्रतिनिधी गोपाल उगले
Share your comments