शेतकरी (farmers) आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून आपले पीक चर्चेत आणत असतो. आता चर्चेत असलेले पीक म्हणजे मशरूमची शेती (Mushroom farming). सध्या गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरूमची चर्चा चांगलीच होत आहे.
हे जंगली मशरूम (Mushroom) मटनापेक्षा महाग दराने सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. प्रती किलो मशरूमसाठी (Mushroom) 800 ते 1000 रुपयांचा दर मिळत आहे. सध्या मटनापेक्षा महाग दराने मशरूम (Mushroom) मिळत आहे. मशरूमच्या विक्रीतून शेतकरी चांगलीच कमाई करत आहेत. जुलै महिन्यात जास्त मागणी असते असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मशरूम खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.
शेतकऱ्यांचे सोन्याचे दिवस; पीक नष्ट झालं तरी मिळणार सुरक्षा, सरकार देतंय एवढी रक्कम
मशरुम लागवड केली जात नाही
पुन्हा पाऊस सुरू होताच गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरुम (Wild mushrooms) विक्रीसाठी आले आहे. सध्या या जंगली मशरुमला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सोबतच चांगला दर देखील मिळत असून 800 ते 1000 रुपयां प्रति किलोला दर मिळत आहे. नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगले आहेत. या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागताच जंगलीव्याप्त भागात नैसर्गिक पद्धतीनं हे मशरुम स्वतः उगवते. याची कुठेही लागवड केली जात नाही. नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर जंगलात गे उगवते. गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरुम खोदून आणतात. त्यानंतर मशरुम स्वच्छ पाण्यानं धुवून त्यावा विक्रीसाठी बाजारात घेऊन जातात. मशरूम ही आरोग्यासाठी पोषक मानले जाते.
दिलासादायक बातमी! पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांचे वाटप
बांबू जंगलात मशरुमचं उत्पादन अधिक
पूर्व विदर्भातील जंगल परिसरात हे मशरुम (Wild mushrooms) मोठ्या प्रमाणावर उगवते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जंगलात हे मशरुम पाहायला मिळते. विशेषत: बांबू जंगलात याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. श्रावण महिन्यात नागरिक मांसाहारी करत नाहीत. त्यामुळं या काळात मशरुमला मोठी मागमी असते.आयुर्वेदात देखील मशरुमचे मोठे महत्व आहे.
महत्वाच्या बातम्या
क्या बात है! अपंग पेन्शन योजनेचे ऑनलाइन अर्ज सुरू; इतकी मिळतेय पेन्शन
काय सांगता ! कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त? वाचा..
मोठी बातमी ; पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता येणार 'या' तारखेला
धक्कादायक ! 'या' योजनेच्या 9 हजार मृत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा
Share your comments