MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

अनेक मजली पीक पद्धत आहे फायद्याची, नेमके काय आहेत फायदे या पीकपद्धतीचे

कृषी क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे व त्याद्वारे शेतीचे उत्पादन व पर्यायाने हातात येणारे उत्पन्न यात वाढ होईल असा प्रयत्न शेतकरी बंधू सातत्याने करताना दिसतात. तसेच वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याच्या पद्धतीतही दिवसेंदिवस बदल होत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
multilayer farming

multilayer farming

कृषी क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे व त्याद्वारे शेतीचे उत्पादन व पर्यायाने हातात येणारे  उत्पन्न यात वाढ होईल असा प्रयत्न शेतकरी बंधू सातत्याने करताना दिसतात. तसेच वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याच्या पद्धतीतही दिवसेंदिवस बदल होत आहे.

आपल्याला माहिती आहे की हायड्रोपोनिक्स,ऐरोपोनिक्सअशा पद्धतीने शेतीचे विविध प्रकार अवलंबिले जात आहेत. जाता जाता एक नवीन प्रकार म्हणजे अनेक मजली शेती किंवा बहुमजली शेती करण्याकडे देखील शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. या लेखात आपण याबद्दल माहिती घेऊ.

 नेमकी काय आहे ही अनेक मजली शेती पद्धती?

 अनेक मजली पीक पद्धत किंवा बहुमजली पीक पद्धत एक पीक घेण्याची पद्धत आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे तंत्र म्हणजे जमिनीत पिकाची लागवड ही उंचीनुसार केली जाते. म्हणजे सर्वात जास्त उंची, नंतर मध्यम उंचीची व त्याखालोखाल कमी उंचीची अशी पिकांची वर्गवारी करून पिकांची  लागवड केली जाते.

विशेष म्हणजे हे सगळे प्रकारचे पिके एकाच जमिनीवर घेतले जातात. या पीक पद्धतीमध्ये एकाच वेळी तीन ते चार किंवा पाच प्रकारचे विविध प्रकारचे पिके घेतली जाऊ शकतात. उदाहरणार्थ पाच मजली शेती असेल तर जमिनीच्या खाली आले किंवा हळद असे कंदवर्गीय पिके नंतर त्यावर सहा फुटाचा मंडप उभारून त्यावर कारले यासारखी वेलवर्गीय पीक तसेच पालेभाज्या प्रकारांमध्ये पालक किंवा कोथिंबीर सारखे पीक घेता येते. अशा पिकांच्या लागवडीमुळे तनाना अटकाव होतो व बाष्पीभवन रोखता येते.

जर लागवडीसाठी मिरची किंवा टोमॅटो अशी पिके निवडली तर पाच मजली ऐवजी चार किंवा तीन मजली प्रकार निवडावा लागतो.शेताच्या मंडपासाठी बांबु किंवा  लाकडाचा वापर केला जातो. या पीकपद्धतीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या पिकांना जास्त उष्णता मानवत नाही अशा पिकांना या पिक  पद्धतीचा फायदा होतो. त्यामुळे पिकांची योग्य प्रकारे वाढ होऊन अधिक उत्पादन मिळू शकते. या पीक पद्धतीत एका पिकाद्वारे दुसरा पिकास फायदा होतो. एकाच जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतल्यामुळे वर्षभर उत्पादन मिळत राहते व पीक मशागती वरील खर्च देखील कमी होतो.

 

 अनेक मजली पीक पद्धतीचे फायदे

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पीक पद्धतीमध्ये कमीत कमी क्षेत्रावर चार ते पाच पीक एका हंगामात घेणे शक्य होते.
  • या शेती पद्धतीमध्ये जवळजवळ 90 टक्क्यांपर्यंत तणांचे नियंत्रण होते.
  • एकाच शेतजमिनीवर पाच प्रकारची पिके घेतल्याने पाण्याच्या वापरामध्ये 60 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत बचत शक्य होते. अवघ्या 20 ते 30 टक्के पाण्यात एकाच वेळी पाच पिके घेणे शक्‍य होते.
  • या अनेक मजली पीक पद्धती मध्ये पाण्याचे बाष्पीभवन रोखता येते.
  • जलसंधारण आणि मृदा संधारण  चांगल्या पद्धतीने करता येते.
  • पारंपारिक शेती पद्धतीच्या तुलनेने अनेक मजली पीकपद्धती या माध्यमातून दुप्पट उत्पन्न मिळू शकते.
English Summary: multilayer farming is new way of farming Published on: 18 September 2021, 11:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters