आपल्या रोजच्या दैनंदिन आहारात मिरची अत्यावश्यक असते. बाजारपेठेत वर्षभर हिरव्या मिरचीला चांगल्याप्रकारे मागणी असते.महाराष्ट्र मध्ये मिरचीची लागवड अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर होते. महाराष्ट्रातील बरेचसे क्षेत्र मिरची लागवडीखालील नांदेड,जळगाव,धुळे आणि सोलापूरतसेच कोल्हापूर,नागपूर या सारख्या भागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.मिरची हे तसे औषधी सुद्धा आहे. या लेखामध्ये मिरचीच्या काही प्रमुख जाती विषयी माहिती घेणार आहोत.
मिरचीच्या चांगल्या उत्पादन देणार्या काही प्रमुख जात
- ज्वाला: या मिरचीला भरपूर फांद्या असतात तसेच पाने गर्द हिरवी, फळे दहा ते बारा सेंटीमीटर लांब असतात. फळांवर आडव्या सुरकुत्या व कच्च्या फळांची साल हिरवट,पिवळी असते.हिरव्या मिरचीसाठी ही जात चांगली आहे. चुरडा मुरडा रोगास चांगल्या प्रकारे प्रतिकारकरते.
- जि 4: आंध्र प्रदेश मधील गुंटूर ची ही मिरची गेल्या वीस वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मध्ये मार्केट आली.तेव्हा त्या ठिकाणच्या स्थानिक जातींपेक्षा कसा कलर असल्याने मार्केटला चढ्या दराने विकली जाऊ लागली व स्थानिक जातीचे भाव घसरले. यामुळे या जातीची मागणीचे प्रमाण या भागामध्ये वाढले.
- एन पी 46 ए: या मिरचीची झाडे बुटकी,झुडपा सारखे व पसरणारी असून फळे 10.7 सेंटीमीटरलांब व बिया कमी असतात. रोप लागवडीनंतर पहिली फुले 84 दिवसांनी लागतात.ही जात बागायतीक्षेत्रासाठी योग्य असूनफुल किड्यांना प्रतिकारक आहे. या जातीचे पिकलेल्या मिरचीचे फळ आकर्षक तांबडे असून ती तिखटास चांगली आहे.
- संकेश्वरी: या जातीचे मिरचीचे झाड उंच व भरपूर फांद्या असलेली असते. फुले मोठ्या प्रमाणात येतात व फळांची लांबी 15 ते 20 सेंटिमीटर इतकी असल्याने जमिनीवरटेकतात. फळांचे साल पातळ असून बी कमी असते.पिकलेल्या फळांचा रंग गडद तांबडा असून तिखट असल्याने मसाल्यासाठी ही जात योग्य आहे. जिरायती पिकासाठी जात योग्य आहे.
- पंत सी 1: या जातीची मिरचीचे झाड उंच वाढणारे असून रोप लावणी पासून 90 दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते.कोवळी फळे हिरवी व पिकलेली फळे लाल रंगाची असतात.फळे 6 ते 7 सेंटीमीटर लांबी व भरपूर तिखट असतात.या जातीवर बोकड्या व मोसैक रोगाचे प्रमाण कमी असते.
- ज्योती:उन्हाळ्यामध्ये ज्वाला सारखी हिरवी मिरची कष्टकरी लोकांना सात ते दहा रुपये पावशेर दराने घ्यावे लागते.ज्योती मिरची आखूड,पोपटी, हिरवी आणि गुच्छ लागलेली अधिक तिखट असते. मिरची चवीला तिखट असते व त्यात बियांचे प्रमाण थोडे जास्त असते तसेच उत्पन्नात चांगली जातआहे.
- पुसा सदाबहार: बहुवर्षायू जात असून बोकड्या व मोझक रोगास प्रतिकारक आहे. या जातीचा खोडवा दोन ते तीन वर्षांपर्यंत घेता येतो. या जातीपासून दरवर्षी 60 ते 80 क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेता येते. एका गुच्छा मध्येच सहा ते बारा आकर्षक लाल मिरच्या असल्याने तोडणीचा खर्च वाचतो या जातीचे मिरच्या अति तिखट असतात व औषधासाठी या मिरच्या परदेशांत भरपूर मागणी आहे.
- काश्मिरी :काश्मिरी मिरची ही यात अतिशय लाल गर्द,आकार बारीक बोराच्या आकारासारखे असून कमी तिखट खाणाऱ्या भागात जसे की बंगालमध्येही चा वापर करी मध्ये बुडवून काढून टाकण्यासाठी करतात.
ज्यावेळी हिरव्या मिरच्या बाजार भाव कमी असतो अशा वेळी वाळलेल्या मिरची पासून तिखट तयार करण्याचे लघु उद्योग उभारल्यास अधिक उत्पन्न मिळू शकते. हिरव्या मिरची पासून देखील उत्पादन चांगले मिळून एका वर्षांमध्ये एकरी पन्नास हजार ते एक लाख रुपये सहज मिळू शकतात. या जातींतील रिक्त मिरचीच्या ज्योती, वैशाली या जाती अधिक उत्पादन देणारे असून भरपूर तिखट असतात. वैशाली या जातीची फळे झाडाला उलटी लागतात.
Share your comments