भाजीपाला पिकांची देशात मोठी मागणी असते. मिरची हे प्रमुख भाजीपाला पिकांपैकी एक आहे आणि ह्याची मागणी ही वर्षभर बनलेली असते. भारतात मिर्चीसाठी मोठा बाजार उपलब्ध आहे म्हणुन मिरची पिकाची लागवड ही शेतकऱ्यांसाठी खुपच फायदेशीर ठरत आहे. मिरची लागवडीतून (Chilly Cultivation) असंख्य मिरची उत्पादक शेतकरी लाखों रुपयांची कमाई करत आहेत.मिरची हे एक प्रमुख नगदी पिकांच्या यादीत येते शिवाय हे एक प्रमुख मसाला पिक आहे. भारतात मिरचीचे उत्पादन हे हिरवी व लाल अशा दोन्ही स्वरूपात घेतले जाते. म्हणजे मिरची ही तशीच भाजीपाला म्हणुन विकली जाते शिवाय सुकवून लाल करून मसाल्यासाठी वापरली जाते.
भारतातील हवामान हे मिरचीच्या यशस्वी उत्पादनसाठी अनुकूल आहे तसेच आपल्याकडे मिरचीची लागवड ही बारमाही केली जाते. भारतात खुप मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते, आणि मोठया प्रमाणात मिरची ही भारतातून विदेशात निर्यात केली जाते. भारत हा प्रमुख मिरची उत्पादक देश आहे तसेच प्रमुख मिरची निर्यातक देशाचा मान देखील राखतो. शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या उत्पादनात त्या पिकाच्या जातींची महत्वपूर्ण भूमिका असते असेच मिरची पिकाच्या बाबतीत देखील आहे. जर मिरचीच्या उन्नत आणि सुधारित जातींची लागवड केली तर शेतकरी बांधव मिरची पिकातून चांगली मोठी कमाई करू शकतात. त्यामुळे आज आम्ही आमच्या वाचक शेतकरी मित्रांसाठी मिरचीच्या सुधारित जातींची माहिती घेऊन आलो आहोत चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया मिरचीच्या काही सुधारित जाती.
मिरचीच्या काही सुधारित जाती
»काशी
काशी ह्या जातीच्या मिरचीची उंची ही 70 ते 100 सें.मी. पर्यंत असते. ही जात इतर मिरचीच्या तुलनेत काहीशी सरळ वाढते. ह्या जातींच्या मिरच्याची लांबी ही 10 ते 12 सेमी असते तसेच 1.5 ते 1.8 सेमी जाड असते. ह्या जातीच्या मिरचीचा रंग हिरवा असतो. ह्या जातीच्या मिरचीचा पहिली तोडा काढणीसाठी 50 ते 55 दिवसात येतो. ही वाण हिरव्या आणि लाल अशा दोन्ही मिर्चीसाठी सर्वोत्तम असल्याचे वैज्ञानिक सांगतात. जर ह्या जातीच्या हिरव्या मिरच्यांचे उत्पादनचा विचार केला तर हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन ह्यातून मिळते, तसेच कोरड्या लाल मिरच्याचे उत्पादन 3 ते 4 टन प्रति हेक्टर मिळते.
»काशी अर्ली
काशी अर्ली ह्या जातीच्या मिरचीची झाडे 60 ते 75 सें.मी. उंच वाढतात. ह्या जातीच्या मिरच्या 7 ते 8 सें.मी. लांब असतात. मिरच्या थोड्या जाड असतात.
पहिला तोडा हा लागवडीनंतर फक्त 45 दिवसांतच तयार होतो, जे इतर जातींपेक्षा सुमारे 10 दिवस लवकर येते म्हणून ह्यांचे नाव देखील असे ठेवण्यात आले आहे. हिरव्या मिरच्यांचे उत्पादन हेक्टरी 300 ते 350 क्विंटल पर्यंत मिळते.
»पुसा सदाहरित
मिरचीची ही वाण रोग प्रतिरोधक आहे, ह्या मिरचीचे झाडे कुज म्हणजे महूव, थ्रिप्स आणि माइट्स इत्यादी किडीपासून आणि रोगापासून लढण्यास सक्षम आहे. ह्या जातीची झाडे उंच वाढतात आणि मिरच्या गुच्छामध्ये येतात. या जातीपासून हेक्टरी 8 ते 10 टन मिरचीचे उत्पादन येत असल्याचे दिसून येते.
Share your comments