भाजीपाला शेतीमधून शेतकरी काही महिन्यात लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत मात्र काही शेतकऱ्यांना त्यापेक्षा जास्त नुकसान झेलावे लागते.चुकीची पद्धत आणि कमी माहिती यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते शिवाय वेळही वाया जातो आणि शेतीचा अयोग्य वापर होतो. भाजीपाला पिकांचा कालावधी मर्यादित असतो त्यामुळे मुख्य पिकांबरोबर भाजीपाला लागवड करावी लागतेय.दोडक्याची लागवड जर वैज्ञानिक पद्धतीने केली तर चांगले उत्पादन भेटते. भारतात जास्त प्रमाणात दोडक्याची लागवड पाहायला भेटते आणि त्यात महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पाहायला भेटते. महाराष्ट्र राज्यात सुमारे ११४७ एकरवर दोडक्याची लागवड केली जाते. खेड्यापासून ते शहरापर्यंत याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
लागवडीसाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत?
पावसाळा आणि उन्हाळा या दोन्ही हंगामात हे पीक घेतले जाते तसेच थंड हवामानात याची उत्तम वाढ होते. योग्य वेळेत व योग्य प्रमाणात तुम्ही पाणीपुरवठा केला तर उत्पादन वाढणार.
दोडक्याची वैशिष्टे:-
पुसा नासदार या वाणाची दोडका लागवडीमध्ये जास्त लागवड केली जाते. दोडका हे पीक लांब आणि हिरव्या रंगाचे असते. लागवड केल्यापासून ६० दिवसात हे तोडण्यास येते.एका वेलाला १५ - २० फळे येतात जे की या तोडणीला बहार ठरलेला असतो. ३ - ४ वेळा तोडणी होते. वेलीच्या स्वरूपात याची वाढ केली जाते त्यामुळे उत्पादन भेटते आणि दोडका खराब होत नाही.
खते आणि पाण्याचा योग्य वापर:-
20 किलो ‘एन' आणि 30 किलो ‘पी’ हा रासायनिक खतांचा डोस प्रति एकर दोडक्याच्या दरम्यानच द्यावा लागतो त्यामुळे पिकाची वाढ जोमात होते आणि रोगराई सुद्धा लागत नाही. पीक फुल लागवडी दरम्यान 20 किलो ‘एन’ चा डोस द्यावा लागतो तसेच लागवडी वेळी २० - २५ प्रति एकर २५ किलो 'पी' आणि २५ - ३० किलो एन चा दुसरा डोस एक महिना कालावधी ने द्यावा.
वेलीच्या अनावरणाचा फायदा:-
दोडका हे वेलभाजी फळ असल्याने त्याची वाढ सुरू झाली की त्यास आधाराची गरज लागते. वाळलेला बांबू किंवा झाडाच्या फांद्यांचा आधार म्हणून वापर केला जातो. तसेच तारेवर सुद्धा वेल लावले जातात.
रोगापासून संरक्षण करण्यासाठी उपाय:-
केवाडा आणि तपकिरी रोगांचा दोडका पिकांवर परिणाम होतो. तपकिरी रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी डिनोकॅप-1 मिली तर केवाडा नियंत्रण आणण्यासाठी डायथिन झेड 78 हे एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Share your comments