शेतकरी आता शेतीची परंपरागत पिके घेण्याची पद्धत सोडून अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत आहेत. त्यामध्ये विदेशी भाजीपाला असो या विविध प्रकारच्या औषधी वनस्पती यांचे उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.तंत्रज्ञानाचा वापर,पिकांविषयीचे अचूक व्यवस्थापन याच्या जोरावर शेतकरी अशा पिकांच्या उत्पादनात यशस्वी होत आहेत.या लेखात आपण अशाच एका औषधी वनस्पती विषयी माहिती घेणार आहोत. त्या औषधी वनस्पतीचे नाव आहे मिल्क थिसल.
मिल्क थिसल बद्दल जाणून घेऊ
एक औषधी वनस्पती असून ज्या शेतकर्यांकडे पाण्याची कमी आहे अशी शेतकरी देखील सहजरीत्या या वनस्पतीचे उत्पादन घेऊ शकतात. म्हणजे सिया वनस्पतीचे उत्पादन हे दुष्काळी पट्ट्यात देखील घेता येऊ शकते. या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही औषधी गुणांनी युक्त अशी वनस्पती आहे अगदी कमीत कमी कालावधीत या वनस्पतीचे उत्पादनात येते.मिल्कथिसल एक काटेरी वनस्पती असून या वनस्पतीच्या बिया या औषधी उपयोगासाठी वापरल्या जातात. तसंच या वनस्पतींचे पाने आणि इतर भाग देखील औषध म्हणून वापरली जातात.
मिल्क थिसलही वनस्पती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहे.अजूनही आपल्याकडे हे पीक नवीन आहे. शेतकऱ्यांना या वनस्पती बद्दल माहिती व्हावी यासाठी शक्य तेवढे प्रयत्न सातत्याने केली जात आहे.या वनस्पतीच्या बियाआणि फुले यांचा वापरलिव्हर आणि पित्त नलिकांवर उपचार करण्यासाठी केला जातो. तसेच बर्याच प्रकारच्या आजारावर ही वनस्पती फायदेशीर असल्याचे मानले जाते.
मिल्क थिसलची पेरणी कशी करावी?
- यापिकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
- चिकन माती असलेली जमीन सर्वात योग्य मानले जाते.
- गाळाच्या जमिनीचा विचार केला तर या जमिनीत नायट्रोजन आणि पोटॅशचे प्रमाण कमी असते. परंतु ही वनस्पतीअशा प्रकारच्या जमिनीत देखील ती करता येते व त्याचे उत्पादन कुठल्या प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही.
- तसेच काळ्या मातीत आणि लाल माती मध्ये ही मिल्क थिसल ची लागवड करतात.
- शेतहे तणमुक्त ठेवणे फार आवश्यक असते
- जमिनीची खोल नांगरट करून नंतर फळीचालवून जमीन समतल करणे गरजेचे असते.
- मिल्कथिसलचे बियाणे तयार करताना शेतात सुमारे अर्धा इंच खोलीवर ते पेरले पाहिजे. तसेच पेरणीच्या अगोदर व्यवस्थित खताचा पुरवठा करावा.
- पेरणीनंतर तुषार सिंचनाचा वापर करणे योग्य ठरते.
या वनस्पतीचे पीक उगवण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात.मिल्कथिसल बद्दल शेतकऱ्यांचा अनुभव आहे की, या वनस्पतीचे मागणी आणि लोकप्रियता वाढत असून भारताची या वनस्पतीची निर्यात करत आहे. जर तुमच्याकडे हलकी जमीन असेल तर या पिकाची लागवड लागवड करून तुम्ही कमी खर्चात जास्त नफा मिळू शकतो. ( स्त्रोत-HELLO कृषी)
Share your comments