साधारणपणे ज्या जमिनीत सातत्याने ऊस लागवड केली जाते, सेंद्रिय खतांचा वापर कमी असतो आणि रासायनिक खतांचा वापर जास्त केला जातो, अशा जमिनीतून सुषमा अन्नद्रव्यांचे शोषण जादा झाल्यामुळे जमिनीत त्याची कमतरता जाणवते.
उसाचे उत्पादन वाढवायचे असेल तर त्यांची लक्षणे ओळखून शिफारशीत मात्रेमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे फायद्याचे ठरते. या लेखात आपण काही सूक्ष्मअन्नद्रव्य ची कमतरता आणि त्यांची लक्षणे याबद्दल माहिती घेऊ.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्यांची लक्षणे
लोह
लोहाची कार्य-1- हरितद्रव्य तयार करण्यासाठी उपयुक्त असते.
2- पानांचा गडद हिरवा रंग बनविण्यास मदत करते.
3-इतर अन्नद्रव्यांच्या शोषणास मदत करते.
4- झाडांच्या वाढीसाठी व प्रजननास आवश्यक आहे.
लोहाच्या कमतरतेची लक्षणे
- नवीन आलेली पाने पिवळी दिसतात व शिरा हिरव्या दिसतात.
- लक्षणे प्रथमतः वरील भागातील पानांवर आढळून येतात.
- पाणी हे पांढुरकी होऊन शेवटी वाळून जातात.
जस्त व त्याची कार्य
- प्रथिने व एन्झाइम्स निर्मितीसाठी आवश्यक घटक आहे.
- पिकांच्या वाढीस उपयुक्त प्रेरकांचे वाढीसाठी आवश्यक.
- वनस्पती मध्ये इंडोल ऍसिटिक ऍसिड तयार होण्यासाठी ट्रिवोफेनच्या निर्मितीची आवश्यक असते. त्यासाठी जस्त लागते.
- संप्रेरक द्रव्य तयार होण्यास मदत करते तसेच प्रजनन क्रियेमध्ये आवश्यक.
जस्ताच्या कमतरतेचे लक्षणे
- पानांत हरितद्रव्याचा अभाव दिसू लागतो व शिरा हिरव्या राहतात.
- करपलेले ठिपके व तांबडे डाग पानांच्या शिरा, कडा व टोके यावर तसेच सर्व पानांवर विखुरलेल्या स्वरुपात दिसतात.
- उसामध्ये कांड्या आखूड पडतात.
मॅगेनीज व त्याची कार्य
- प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत मदत करते.
- जैविक दृष्ट्या कार्यप्रवण असलेल्या पेशी जाला मध्ये इतर भागापेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध
मॅगनीजच्याकमतरतेची लक्षणे
- पानांमध्ये हरितद्रव्ययाचा अभाव दिसून येतो.
- मुख्य व लहान शिरा गडद किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात, त्यामुळे पानावर चौकट दार नक्षी दिसते.
तांबे व त्याची कार्य
- वनस्पतींना तांब्याची गरज फार अल्पप्रमाणात असते.
- तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त उपलब्ध झाल्यास अपायकारक ठरते.
- हरितद्रव्य प्रथिने तयार होण्यासाठी मदत करते.
- लोहाचा उपयोग योग्य प्रकारे होण्यासाठी मदत
- श्वसन क्रियेचे नियमन करण्यासाठी आवश्यक
तांब्याच्या कमतरतेची लक्षणे
- पानाच्या कडा गुंडाळलेल्या जाऊन पाने वाळून जातात.
- वनस्पतीचे खोड मऊ व लवचिक बनते.
- फुटव्यांची संख्या कमी होते.
- पानांवर हिरवे ठिपके दिसतात.
बोरॉन व त्याचे कार्य
- कॅल्शियम विद्राव्य स्थितीत राहण्यास व त्याचे स्थलांतर होण्यास मदत करते.
- नत्राचे शोषण करण्यास मदत करते.
- पेशी आवरणाचा घटक असून पेशी विभाजनास मदत
- आवश्यकतेनुसार साखरेचे स्थलांतर घडवून येण्यास मदत करते.
- वनस्पतीमध्ये पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक
कमतरतेची लक्षणे
- पाने ठिसूळ बनुन गुंडाळली जातात.
- त्याचा शेंडा पिवळा पडतो नंतर तो तांबूस काळा पडून वाळतो.
- शेंड्याकडील कोवळ्या पानांवर पाण्याचे लहान-लहान पारदर्शी ठिपके दिसतात.
Share your comments