1. कृषीपीडिया

महिन्याला लाखो रुपये कमवू शकता मायक्रोग्रीन शेतीच्या माध्यमातून, जाणून घेऊ मायक्रोग्रीन शेतीबद्दल

घरी बसून करता येणाऱ्या मायक्रोग्रीन शेती बद्दल तुम्हाला माहिती आहे का? कोरोना महामारी च्या काळात लोक आरोग्य विषयी सजग झाले आहेत.बरेच लोक त्यांच्या आरोग्यावर आणिशरिराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांवर अधिक लक्ष देताना दिसत आहेत.त्यामुळे मायक्रोग्रीन या सुपरफूडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
microgreen farming

microgreen farming

घरी बसून करता येणाऱ्या मायक्रोग्रीन शेती बद्दल तुम्हाला माहिती आहे का? कोरोना महामारी च्या काळात  लोक आरोग्य विषयी सजग झाले आहेत.बरेच लोक त्यांच्या आरोग्यावर आणिशरिराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांवर अधिक लक्ष देताना दिसत आहेत.त्यामुळे मायक्रोग्रीन या सुपरफूडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

इतर फळे आणि भाजीपाल्याच्या तुलनेत या मायक्रोग्रीन मध्ये चाळीस पट अधिक पोषक तत्त्वे असतात.त्यामुळे आला सुपरफुड असे म्हटले जाते.या मायक्रोग्रीन सुपरफूडची बाजारात मागणी वाढल्यामुळे बरेच लोक हा व्यवसाय करून महिन्याला लाख रुपये कमवत आहेत.या लेखात आपण मायक्रोग्रीन शेती विषयी माहिती घेऊ.

 मायक्रोग्रीन कशाला म्हणतात?

 कोणत्याही झाडाच्यासुरुवातीचे जे कोवळी पाने असतात त्यांना मायक्रोग्रीन म्हणतात.ही पाने दोन ते तीन इंच लांब असतात.हे पानेजेव्हा उगवतात तेव्हा लहान असताना तोडून बाजूला केले जाते. या कोवळ्या पानांमध्ये खूप पोषण तत्वे असतात. दररोज 50 ग्रॅम मायक्रोग्रींस सेवन केले तर  शारीरिक पोषणाच्या सर्व गरजा पूर्ण होतात. यासाठी प्रामुख्याने मुळा,मोहरी, यासारख्या झाडांच्या कोवळ्या पानांचा वापर केला जातो.

 मायक्रोग्रीन शेतीसाठी लागणारा खर्च

ही शेती करण्यासाठी तुम्हाला जमिनीची गरज नाही अगदी तुमच्या घराच्या टेरेसवर,बाल्कनीमध्ये किंवा चक्क तुमच्या बेडरूममध्ये तुम्हीही शेती करू शकता.यासाठी तुम्हाला काही साहित्य लागते ते म्हणजेट्रे,बियाणे, जैविक खत आणि माती किंवा कोकोपीट याची गरज भासते.झाडांना प्रकाशसंश्लेषण यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्‍यकता असते त्यामुळे ते उन्हात आपण ठेवतो.मात्र मायक्रोग्रीन शेतीसाठी झाडांना प्रखर सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे गरजेचे असते.

दररोज काही प्रमाणात पाणी शिंपडले नंतरकाही दिवसांमध्ये रोपांची उगवण होते.यासाठी गाजर, मुळा अशी कंदमुळे किंवा इतर भाज्यांचा देखील वापर करता येतो.

 मायक्रोग्रीन शेतीपासून मिळणारे उत्पन्न

सर्वात कमी खर्च करून चांगले पैसे या माध्यमातून कमवू शकतात.दोन ते तीन आठवड्यांमध्ये मायक्रोग्रीनपीक काढणीसाठी तयार होते.त्यानंतर फाय स्टार हॉटेल, कॅफीन नाही तुम्ही याचा सप्लाय करू शकता.किंवा स्वतःच्या स्टॉल उभारूनआणिस्वतःचा विशीष्ट ब्रँड निर्माण करून देखील तुम्ही हा व्यवसाय करू शकतात.

English Summary: micrograin farming is benificial for farmer give more profit through this farming Published on: 15 November 2021, 12:10 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters