ज्यावेळेस ट्रायकोडर्मा हि बुरशी पिकाच्या मुळांच्या आत वाढत असते, त्यावेळेस तिच्या द्वारे जे काही अॅन्टीबायोटिक्स किंवा इतर ट्रव स्रावले जातात त्यांचे प्रमाण हे अल्प असे असते, ज्यामुळे पिकास ईजा न होता, पिकास केवळ रोगाचा हल्ला झालेला आहे असा संदेश मिळतो. पिकाच्या संरक्षण यंत्रणेला नियंत्रित करणाऱ्या व्यवस्थेला (Genes and J/ET Signaling pathways) चालना मिळते. ज्यावेळेस पिकाच्या मुळांच्या आत ट्रायकोडर्मा वाढते त्यावेळेस पिकाच्या पानांच्या आत देखिल हि संरक्षण यंत्रणा सिस्टिमिक एक्वायर्ड रसिस्टंस (SAR) मृळे कार्यान्वित झालेली असते.
एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, ट्रायकोडर्मा जरी मुळांच्या आत वाढत असली तरी हि बुरशी मुळांच्या आत काही थरापर्यंतच वाढते. त्याच्या पुढे हि बुरशी वाढत नाही. मुळांमधिल रस वाहीन्यात न शीरु शकल्याने हि बुरशी खोडातुन प्रवास करुन पानापर्यत जावु शकत नाही.
पिकाच्या मुळाच्या वर आणि काही प्रमाणात काही पिकांच्या मुळांच्या आत वाढुन ज्या पध्दतीने ट्रायकोडर्मा हि बुरशी पिकाचे मुळांचे रक्षण करते ते आपण बघितले, याशिवाय ट्रायकोडर्मा हि बुरशी ईतर अनेक विषारी द्रव स्रवते ज्यामुळे हानीकारक बुरशी, जीवाणूंचा नाश होतो.
ट्रायकोडर्मा हि हानीकारक बुरशी च्या वर वाढते, ट्रायकोडर्मा व्हिरिडे सेल्युलेज आणि चिटिनेज हे दोन एन्झाईम्स स्रवते. बूरशीच्या पेशी भित्तिका ह्या चिटिन (कायटिन / Chitin) पासुन बनलेल्या असतात, ट्रायकोडर्माद्वारा स्रवलेल्या चिटिनेज मुळे ह्या पेशी भित्तिकांना ईजा करुन ट्रायकोडर्मा बुरशी हानीकारक बुरशीच्या मायसेलियम वर वाढते. तसेच हानीकारक बुरशीच्या स्पोअर्स वर आणि जेथुन स्पोअर्स तयार केले जातात अशा स्पोरॅन्जिया वर देखिल वाढते. ट्रायकोडर्मा हानीकारक बुरशीवर ज्यावेळेस वाढते त्यावेळेस त्या हानीकारक बुरशीच्या आतील अन्नरसासाठीच ती वाढत असते, ह्यास मायको पॅरासिटिझम म्हणतात.
ट्रायकोडर्मा ग्लिओव्हिरीन, ग्लिओटॉक्सिन, अल्किल पायरॉन्स ह्या सारखी ईतरही काही विषारी द्रव स्रवतात.
मायको पॅरासिटिझम आणि पिकाची स्वतःची संरक्षण यंत्रणा सतर्क करणे ह्या व्यतिरिक्त ट्रायकोडर्मा हि बूरशी पिकांस काही प्रमाणात फॉस्फोरस, फेरस ह्या अन्नद्र्व्याची उपलब्धता करुन देवुन आणि मुळांची तसेच पिकाची वाढ जोमदार होण्यास मदत करु शकतील अशी संप्रेरके स्रवुन पिकास रोगाच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम देखिल करते.
मर्यादीत स्रोतांच्या स्पर्धेत जमिनीत आधी पासुन काही प्रमाणत असलेल्या ट्रायकोडर्माच्या कमी संख्येवर मात करत, योग्य प्रमाणात स्पोअर्स ची संख्या असलेले आणि शुध्द ट्रायकोडम्मा बाहेरुन वापरल्यास हानीकारक बुरशीच्या वाढीसाठी कमी स्रोत शिल्लक राहतात. ह्या स्पर्धेमुळे देखिल हानीकारक बुरशींवर नियंत्रण मिळवता येते.
ट्रायकोडर्माचा वापर हा विविध पिकांच्या मुळांवर हल्ला डॅपिग ऑफ, फ्युजरिम विल्ट, पिथियम विल्ट, फायटोप्थोरा, स्लेरोशियम ह्या रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो.
Share your comments