MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

माशांच्या रक्त संकलन करण्याच्या पध्दती..!

विविध रोग व रोगराईमुळे संवर्धन तलावातील माशांची मरतूक मृत्यू होते. उत्पादन खर्चाच्या १० ते १५ टक्के एवढे नुकसान रोगराईमुळे होऊ शकते. माशांचे जीविताचे प्रमाण हे त्याच्या मधील असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबुन असते. म्हणूनच रोग होऊ नये याकरिता तलावामध्ये मत्स्य आरोग्य व्यवस्थापन महत्वाचे ठरते.

Methods of fish blood collection

Methods of fish blood collection

विविध रोग व रोगराईमुळे संवर्धन तलावातील माशांची मरतूक मृत्यू होते. उत्पादन खर्चाच्या १० ते १५ टक्के एवढे नुकसान रोगराईमुळे होऊ शकते. माशांचे जीविताचे प्रमाण हे त्याच्या मधील असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबुन असते. म्हणूनच रोग होऊ नये याकरिता तलावामध्ये मत्स्य आरोग्य व्यवस्थापन महत्वाचे ठरते. माशांच्या आरोग्य तपासणी करीता रक्ताचे नमुने घेवून त्याची चाचणी केली जाते. यावरून माशांच्या आरोग्य स्तर समजला जातो व त्याद्वारे आरोग्य सुधारणेकरिता योग्य ती उपाययोजना करणे शक्य होते. माशांचे रक्त नमुने गोळा करण्यासाठी भिन्न तंत्रे वापरली जाऊ शकतात.

रक्त संकलन पध्दती

१) शेपटी कापून रक्त संकलन करणे
२) पुच्छ वाहिनी मधून संकलन करणे
३) थेट ह्दयातून संकलन करणे
४) पृष्ठीय महाधमनी द्वारे संकलन करणे

माशांमधून रक्ताचे नमुने काढण्यासाठी ही काही सामान्य तंत्रे आहेत. तथापि, अधिक प्रगत तंत्रांमध्ये सामान्य कार्डिनल व्हेन (क्युव्हियरची वाहिनी) मध्ये छेद करणे आणि कॅन्युलायझेशन समाविष्ट आहे, ज्यामध्ये शस्त्रक्रियेवेळी बसविलेल्या कॅन्युलाद्वारे, माशांच्या कल्या मधून वारंवार रक्त काढता येते.

सर्वसाधारणपणे, जेव्हा रक्ताचे नमुने घेतले जातात, तेव्हा वापरल्या जाणार्‍या नळ्या आणि सिरिंज यांचा रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी हेपरिन किंवा एडिटअ (EDTA) सारख्या रसायनाचा (ऑन्टिकोयागुलंट) वापर केला जातो. तथापी, जेव्हा सीरम संकलन करावयाचे असते तेव्हा अश्याप्रकारे रसायने वापरत नाही. कारण प्रथम नळ्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या (म्हणजे फायब्रिनोजेनचे अघुलनशील फायब्रिनमध्ये रूपांतरित केले जाते) होऊ दिल्या जातात. नंतर रक्त पेशी आणि फायब्रिन काढून टाकण्यासाठी सेंट्रीफ्यूज केले जाते. माश्यांचे रक्त काढण्याच्या अगोदर माश्यांना गुंगी येणाऱ्या औषधाचा (ऍनेस्थेटिक) वापर करून बेशुद्ध करतात, त्यामुळे माशामध्ये येणारा तणाव कमी होतो.

१) शेपटी कापून रक्त संकलन करणे

ही पध्दत (तंत्र) प्रामुखय्याने लहान माशांसाठी (उदा. १० सें.मी. पेक्षा कमी) योग्य आहे. माशांच्या रक्तवाहिन्यांचा आकार व रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक प्रकरणामध्ये हा एकमेव पर्याय आहे. परंतु या पद्धतीचा वापर करून जास्तक्षमतेने रक्त गोळा करणे कधीकधी खूप कठीण असते. माशांच्या रक्ताची गुढली लगेचच होत असल्याने, शेपूट तोडल्यानंतर त्वरीत रक्त नमुना गोळा करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये नमुना मिळविण्यासाठी माशांना मारणे गरजेचे असते.

कृती:

१. गुंगी येणाऱ्या (ऍनेस्थेटिक) द्रावणाची जास्त मात्रा देऊन माशांचा बळी दिला जातो.
२. माशांच्या शेपटी जवळी भाग वरून खाली एकाच घावात कापतात. शेपटीचा भाग शरीराचा तुलनेने पातळ भागील भाग ज्याला शेपटीचा पंख जोडलेला असतो. शेपटीचा पाया आणि गुदद्वाराच्या पंखाच्या शेवटच्या किरणांच्या पाया दरम्यानची जागा).
३. श्लेष्मा आणि पाण्याने दूषित होऊ नये म्हणून शेपटीचा क्षेत्र शोषक ऊतकाने पुसून टाकतात.
४. नुकतेच कापलेल्या शेपटीचा पायाच्या शेवटी EDTA लेपित ट्यूब किंवा केशिका नळी ठेवतात. (रक्त गोळा करण्यासाठी निवडलेल्या नळीचा प्रकार हा कोणत्या प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या करावयाच्या आहेत यावर अवलंबून असते).
५. केशिका नळीच्या बाबतीत केशिका कृतीद्वारे नळी भरू द्या.

२) पुच्छ वाहिनी मधून संकलन करणे

ही एक पध्दत आहे जी मोठ्या माशांचे रक्त नमुने घेण्यासाठी वारंवार वापरली जाऊ शकते. (सामान्यत: १० सेमीपेक्षा जास्त लांब). हया पद्धती दरआठवड्यास ०.५ ते १ मिली ०.५ ते १ मिली रक्त रक्त २०० ग्राम. माशांपासून मरतुक न होता किंवा गंभीर दुर्बलता न घेता काढता येते.

कृती:

१. गुंगी येणाऱ्या (ऍनेस्थेटिक) द्रावणात मासे बेशुद्ध करतात.
२. सिरिंजला सुई जोडल्यानंतर तिचा बुड द्रावणाने (अँटीकोआगुलंट) स्वच्छ धुवून घेतात.
३. हेपरिन द्रावण किंवा EDTA द्रावणाने सिरिंज धुवून घ्यावे व नंतर अर्धा तास सिरिंज कोरडी करतात.
४. प्रॅक्टिसमध्ये, धुवून केल्यानंतर, रक्ताच्या नमुन्याचे गोठणे टाळण्यासाठी पुरेसे अँटीकोआगुलंट सुईमध्ये ठेवले जाते.
५. गुदद्वाराच्या पंखाच्या मागे मध्य-व्हेंट्रल रेषेवर सुई घुसवून पाठीचा कणा जाणवेपर्यंत सुईला स्नायूमध्ये ढकलून द्या. सिरिंजवर स्थिर पोकळी ठेवून, सिरिंजमध्ये रक्त येईपर्यंत हळूहळू सुई मागे घेतात. या प्रक्रियेस तंत्र परिपूर्ण करण्यासाठी अनेक सरावाची आवश्यकता असते. हवेचे बुडबुडे आत जात नाहीत याची खात्री करा.
६. हळूहळू आणि काळजीपूर्वक माशांपासून सुई आणि सिरिंज पूर्णपणे मागे घ्या. सिरिंज हळूवारपणे फिरवा आणि सुई काढा आणि सिरिंजमधील सामग्री बर्फावर ठेवलेल्या नळीमध्ये रिकामी करा. नळी थोड्या कोनात धरली पाहिजे कारण रक्त आत रिकामे केले जाते, ज्यामुळे द्रव नळीच्या बाजूने खाली वाहू शकते.
७. नळी वर खाली त्यामधील गोळा केलेले रक्त त्यामध्ये मिसळतात.
पुच्छ वाहिनी पंक्चर करणे

३) थेट ह्दयातून संकलन करणे

ही पध्दत मोठ्या माशांचे नियमित रक्त नमुने घेण्यासाठी वापरली जाऊ शकते (सामान्यत: १० सेमीपेक्षा जास्त).

कृती:

१. गुंगी येणाऱ्या (ऍनेस्थेटिक) द्रावणात मासे बेशुद्ध करतात.
२. सिरिंजला सुई जोडा.
३. सिरिंजच्या पायथ्याशी द्रावण (अँटीकोआगुलंट) फ्लश केले जाते. हेपरिन द्रावणामध्ये सिरिंज. सुमारे २०-३० मिंटासाठी बुडवून ठेवतात, फ्लशिंग केल्यानंतर, रक्ताच्या नमुन्याची गोठणे टाळण्यासाठी पुरेसे अँटीकोआगुलंट सुईमध्ये ठेवले जाते.
४. माशांच्या पोटाचा भाग आपल्याकडे राहील असे माश्याला पकडले जाते बाजूने मासे धरून ठेवा (सर्वात वर). पेक्टोरल फिनच्या आधीच्या तळांच्या मध्यभागी, उभ्या दिशेने सुई घुसविली जाते. रक्त सिरिंजमध्ये प्रवेश करेपर्यंत दट्ट्यावर नकारात्मक दबाव लागू करा. माशातून हळूहळू सिरिंज पूर्णपणे मागे घ्या.
५. हळुवारपणे सिरिंज फिरवा आणि सुई काढा आणि सिरिंजमधील सामग्री बर्फावर ठेवलेल्या नळीमध्ये रिकामी करा. नळी थोड्या कोनात धरली पाहिजे कारण रक्त आत रिकामे केले जाते, ज्यामुळे द्रव कंटेनरच्या बाजूने खाली वाहू शकतो.
६. उलथापालथ करून सामग्री मिसळा. हे नळीमध्ये हळूवारपणे उलटे करून केले जाते.
थेट ह्दयातून संकलन करणे. 

४) पृष्ठीय महाधमनी द्वारे संकलन करणे

ही पद्धत मोठ्या माशांचे नियमित रक्त नमुने घेण्यासाठी वापरली जाऊ शकते (सामान्यत: १० सेमीपेक्षा जास्त).

कृती:

१. गुंगी येणाऱ्या (ऍनेस्थेटिक) द्रावणात मासे बेशुद्ध करा.
२. सिरिंजला सुई जोडा.
३. सिरिंजच्या पायथ्याशी द्रावण (अँटीकोआगुलंट) फ्लश करा. सुमारे २०-३० मिंटासाठी सोडून घ्यावे, फ्लशिंग केल्यानंतर, रक्ताच्या नमुन्याची गोठणे टाळण्यासाठी पुरेसे अँटीकोआगुलंट सुईमध्ये ठेवले जाते.
४. पाठीचा कणा गाठेपर्यंत माशाच्या मध्यभागी, पाठीचा कणा (स्पाइनल कॉलम) खाली सुई घाला. सिरिंजमध्ये रक्त प्रवेश करेपर्यंत सिरिंजवर नकारात्मक दबाव लागू करा. माशातून हळूहळू सिरिंज पूर्णपणे मागे घ्या.
५. हळुवारपणे सिरिंज फिरवा आणि सुई काढा आणि सिरिंजमधील सामग्री बर्फावर ठेवलेल्या ट्यूबमध्ये रिकामी करा. ट्यूब थोड्या कोनात धरली पाहिजे कारण रक्त आत रिकामे केले जाते, ज्यामुळे द्रव कंटेनरच्या बाजूने खाली वाहू शकतो.
६. उलथापालथ करून सामग्री मिसळा. हे नळीमध्ये हळूवारपणे उलटे करून केले जाते.

जयंता टिपले, सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मो. न. ८७९३४७२९९४.
जयश्री शेळके, सहाय्यक संशोधक, मो. न. ९२०९३२४२९६.
सोमनाथ यादव, सहाय्यक प्राध्यापक, मत्स्यसंवर्धन विभाग, मो. न. ९८९०९१५६८६, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर. महाराष्ट्र.

English Summary: Methods of fish blood collection..! Published on: 02 January 2023, 11:52 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters