1. कृषीपीडिया

हरभरा पिकात मर, मूळकुजव्या किंवा जळणे, उबळणे या समस्या असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संदेश.

शेतकरी बंधुंनो मागील काही वर्षात हरभरा या पिकात पाने पिवळे पडून झाडे वाळणे जळणे उबळणे ही लक्षणे दिसून मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाचे नुकसान होत असल्याचे आढळून येत आहे

KJ Maharashtra
KJ Maharashtra
हरभरा पिकात मर, मूळकुजव्या किंवा जळणे, उबळणे या समस्या असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संदेश

हरभरा पिकात मर, मूळकुजव्या किंवा जळणे, उबळणे या समस्या असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संदेश

शेतकरी बंधूंनो ही जी लक्षणे सांगितली ती हरभरा पिकात दिवसेंदिवस का वाढत आहेत कोणत्या या रोगामुळे ती दिसतात? तसेच त्यासाठी करावयाच्या एकात्मिक व्यवस्थापन योजना याविषयी थोडं जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो हरभरा पिकात वर निर्देशित लक्षणे प्रामुख्याने खालील निर्देशित रोगांमुळे दिसून येऊ शकतात.

१) हरभरा पिकावरील मर रोग :

शेतकरी बंधूंनो हा रोग फ्युजॅरियम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो या रोगात प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने पिवळे पडून कोमजतात शेंडे मलूल होतात व झाड हिरव्या अवस्थेत वाळते .या रोगाची बुरशी रोपात घुसल्यानंतर हळूहळू झाडात वाढते पाने पिवळसर पडतात किंवा शिरांमधील भाग हलका पिवळा किंवा गर्द पिवळा होतो. मूळ, खोड चिरले असता आत मध्ये मध्यभागी हलक्या तपकिरी ते गर्द तपकिरी रंगाची रेघ दिसते या रोगात झाडाचे शेंडे मलूल होतात व कोमजतात झाड बऱ्याचवेळा हिरव्या स्थितीत वाळते मूळ उभे चिरले असता मुळाचा मध्यभाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते. या रोगामुळे शेतकऱ्याची बरीचशी झाडे वाळल्या मुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट येते. या रोगाचा प्रादुर्भाव हरभरा पिकात काईक वाढ अवस्थेपासून घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा आढळून येतो.

२) हरभरा पिकावरील मूळकुजव्या रोग :

हरभरा पिकात दोन प्रकारची मुळकुज आढळते. कोरडी मुजकुळ Rhizoctonia bataticola या बुरशीमुळे आणि ओली मुळकुज Rhizoctonia solani या बुरशीमुळे होते. या रोगामध्ये हरभरा पिकात रोपाची पाने पिवळी पडून रोपे कोमजतात. रोप उपटून पाहिले असता मुळे सडलेली दिसतात. विशेषता ओली मुळकुज या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीत अती जास्त ओल असताना आणि जमिनीतील उच्च तापमान असताना हरभरा पिकात सुरुवातीच्या रोपावस्थेत आणि अति लवकर पेरलेल्या हरभऱ्यात जास्त आढळतो मूळकुजव्या रोगात विशेषता ओली मुळकुज या रोगात प्रादुर्भावग्रस्त हरभऱ्याचे झाड उपटून पाहले असता झाड सहजपणे निघून येते.

हेही वाचा हरभरा पिकातील अन्नद्रव्याचे (खताचे व्यवस्थापन)

   याव्यतिरिक्त हरभऱ्यामध्ये जमिनीतून प्रादुर्भाव करणाऱ्या हानिकारक बुरशी द्वारे होणारे कॉलर रोट या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोगाची चर्चा आत्ता करणे अत्यंत आवश्यक आहे कारण या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शेतकरी गांभीर्याने घेतात परंतु या रोगांवर नंतर उपाययोजना करणे म्हणजे डोक्याला जखम व पायाला मलम अशी गोष्ट घडू शकते. प्रतिबंधात्मक व एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केल्याशिवाय या समस्येवर व्यवस्थापन मिळत नाही कृपया खालील निर्देशित उपायोजना यासंदर्भात नोंद घेऊन नियोजन करून पेरणीपूर्व काही बाबीचा तर पेरणीनंतर काही बगीचा अंगीकार करून प्रभावी व्यवस्थापन करा यातील बहुतांश रोग वरून फवारण्या करून दुरुस्त होण्याची शक्यता कमी असते म्हणून खालील उपाययोजनांची नोंद घेऊन त्यांचा अंगीकार करा.

हरभरा पिकावरील मर, मूळकुजव्या, कॉलर रोट किंवा पिकावरील मर, जळ किंवा उबळणे याकरता एकात्मिक उपायोजना

१) त्याच त्या शेतात एक सारखे हरभरा पीक घेणे टाळा पिकांची फेरपालट करून दर तीन वर्षानंतर किमान एकदा हरभऱ्याच्या शेतात दुसरे पीक घ्या

२) हरभरा ज्या शेतात आपण पेरतो त्या शेतात खरीप हंगामात पेरणीपूर्वी किमान दहा ते पंधरा गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्या.

३) हरभरा पेरणीपूर्वी शक्य होईल इतक्या उपलब्ध चांगल्या कुजलेल्या शेणखतात प्रती एकर त्यात एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा व्हीरीडी हे जैविक बुरशीनाशक या प्रमाणात मिश्रण करून जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व द्या व वखर पाळी देऊन चांगले जमिनीत मिसळून घ्या यामुळे जमिनीत ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीची वाढ होण्यास मदत होईल व जमिनीचे तापमान सुस्थितीत राखण्यास मदत होते व मर तसेच मूळकुजव्या रोगाला कारणीभूत असणाऱ्या बुरशीचा व्यवस्थापन मिळेल

४) शेतकरी बंधूंनो जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता व इतर तांत्रिक बाबी लक्षात घेऊन हरभरा पिकात मर रोगासाठी प्रतिकारक असलेले नवीन शिफारशीत वाण उदाहरणार्थ पीडीकेव्‍ही कांचन ( AKG - 1109 ), फुले विक्रम यासारख्या मर रोगासाठी प्रतिकारक वाणाची पेरणी करावी परंतु वाण निवडताना जमिनीचा प्रकार व वाणाची इतर वैशिष्ट्ये लक्षात घेऊन या संदर्भात तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊनच वाण निवडावे

५) पेरणीपूर्वी हरभऱ्याच्या बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची चार ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करून घ्यावी

६)रोगग्रस्त शेतात तसेच पाणी साचणाऱ्या जमिनीत हरभऱ्याचे पिक घेणे टाळावे आणि रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत.

    शेतकरी बंधूंनो वर निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन योजनेचा किंवा प्रतिबंधात्मक बाबीचा अंगीकार केल्यास हरभरा पिकावरील मर जळणे इत्यादी बाबीचा प्रतिबंध मिळू शकतो व नंतर होणारा अविवेकी अवास्तव फवारणीचा खर्च सुद्धा कमी होतो. कृपया जमिनीतून प्रादुर्भाव करणाऱ्या रोगा करिता वर निर्देशित उपाय योजना आहेत नंतर विनाकारण फवारणीचा खर्च टाळा व आपल्या हातात असलेले वर निर्देशित कमी खर्चाचे उपाय अमलात आणा

 

राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ

कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Message for farmers with problems like death, root rot or burns in gram crop Published on: 08 November 2021, 06:42 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters