खरबूज हे वेलवर्गीय पीक असून वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असते.खरबुजाचे पीक हे कमी खर्चात, कमी पाण्यावर 70 ते 90 दिवसांमध्ये येणारे मधुर, गोड व स्वादिष्ट अशा वेलवर्गीय फळपीक आहे या लेखात आपण खरबूज लागवडीविषयी माहिती घेणार आहोत.
खरबूज लागवड व्यवस्थापन
- जमीन- खरबुजे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करता येते. परंतु चुनखडीयुक्त,खारवट जमीन लागवडीस अयोग्य आहे.कारण या जमिनींमध्ये कॅल्शियम सल्फेट क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेट सारख्या विद्राव्य क्षार यामुळे फळांना डाग पडण्याची शक्यता असते.
- हवामान-खरबूज पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. वाढीच्या कालावधीत हवेमध्ये दमटपणा व धुकेअसल्यास वेलींची वाढ व्यवस्थित होत नाही व पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.
खरबुजाच्या संकरित जाती
- कुंदन- ही जात नोन यु सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे असून फळे लंबगोल आकाराची, वजनाने दीड किलो ते दोन किलो पर्यंत असतात. एका वेळेस दोन ते तीन फळे सारख्या आकाराचे वजनाची येतात. जाळीदार खरबुजा मध्ये देठ मजबूत असलेले हे वान आहे. या जातीच्या फळांची टिकवणक्षमता काढणीनंतर 10 ते 12 दिवसाच्या आहे. लावणी केल्यापासून 80 ते 85 दिवसात फळ काढणी योग्य होते. चवीला हवामान अतिशय गोड व सुगंधी आहे. एकरी उत्पादन 12 ते 15 टन मिळते.
- बॉबी- कुंदन जातीप्रमाणे ची जातही नोन यु सीड्सची असून या जातीची फळे कुंदन या जातीच्या तुलनेत आकाराने लहान असतात. या जातीपासून मिळणारे उत्पादन थोडे कमी असले तरी बाजारपेठेत याला चांगली मागणी असल्याने भाव चांगले मिळतात.
- एन. एस. 910-हावाण नामधारी कंपनीचा असून फळे 60 ते 65 दिवसात तयार होतात. एका फळाचे वजन दीड ते दोन किलो असते. या फळाची साल सोनेरी पिवळी व जाळीदार साल असून पोकळी मध्यम व गर घट्ट असतो. याचा टी. एस.एस 13 ते 14 टक्के असून अधिक उत्पादन क्षमता, खूपच गोड असा हा वान आहे.
याशिवाय दीप्ती, सोना, केशर या जातींचा ही दर्जा व उत्पादन चांगले असल्याने लागवडीस योग्य आहेत.
खरबूज लागवडीचा काळ
हेपिक 70 ते 90 दिवसांत तयार होते. याची विशिष्ट गोड चव व रंगामुळे या फळांना चांगली मागणी असते. साधारणतः अर्धा ते एक किलोचे खरबूज 20 ते 30 रुपयास मिळते.हे फळ एका वेलीवर 4 फळे सहज लागतात. या फळाची लागवड ऑक्टोबर, दसऱ्यानंतर व्यापारी पद्धतीने याचे लागवड करून थेट नोव्हेंबर अखेर व परत थंडी कमी झाल्यावर संक्रांतीनंतर करता येते तसेच बरेच शेतकरी जानेवारी ते फेब्रुवारी अखेर बागायती शेतीत याची लागवड करतात. फळे साधारण मार्च-एप्रिल मध्ये मिळाले तर पैसे खूप मिळतात. आंबा मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर जर हे फळ मार्केटमध्ये आणले तर पैसे हमखास मिळतात.
खरबुजाची लागवड पद्धत
याची लागवड आळे पद्धतीने किंवा सरी पद्धतीने करतात. दोन मीटर अंतरावर सऱ्या पाडून सरीच्या दोन्ही बाजूस लहान लहान आळी करतात. एका आळ्यामध्ये एकच बी लावावे.पाणी कमी असल्यावर दहा बाय चार अंतरावर सरी पाडून लागवड करावी. सरी पाडून बी टोकले असता वेल पसरायला ही जागा राहते.
खरबुजाचेबियाणे
सुधारित जातीची साधारणता अर्धा किलो बी पुरेसे होते. संकरित जातीचे बी एकरी शंभर ते दीडशे ग्राम लागते. थंडीमध्ये बियांची उगवण क्षमता कमी होते व वाढ लवकर होत नाही. याकरिता कोमट पाण्यामध्ये सीड कॅपऔषध 10 लिटर पाणी या द्रावणात बी चार ते पाच तास भिजवून नंतर सावलीतसुकवून लावल्यास बियांची उगवण दोन ते तीन दिवस लवकर एक सारखे व निरोगी होते.
Share your comments