1. कृषीपीडिया

कमी उत्पादन खर्चात निश्चित उत्पन्न देणारी शेती म्हणजे झेंडू फूल शेती

KJ Staff
KJ Staff
marigold farming

marigold farming

झेंडू पिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. झेंडूचे पिक ते विविध प्रकारच्या जमिनीत आणि विविध प्रकारच्या प्रकारच्या हवामानात उत्तम प्रकारे घेता येते. जर महाराष्ट्राचा विचार केला तर तीनही हंगामामध्ये झेंडूचे पीक घेता येते.

पण तू महाराष्ट्रामध्ये सणासुदीचा काळ, लग्नसराईचा काळ यामध्ये झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असल्याने तेव्हा जास्त प्रमाणात लागवड करण्यात येते. झेंडूच्या फुलांचे विविध रंग व आकार असतात. काढणीनंतर ही फुले चांगल्या प्रकारे टिकत असल्याने बाजार भाव चांगला मिळतो. कमी दिवसात, कमी खर्चात, कमी तासात पण खात्रीने फुले देणारे पीक म्हणून झेंडू कडे पाहिले जाते.  झेंडूच्या फुलांना भरपूर मागणी असते आणि चांगला भाव देखील मिळतो. झेंडूचे पीक हे हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यात येते. या लेखात झेंडू पिकाच्या लागवडीविषयी माहिती घेऊया.

 

खत आणि पाणी व्यवस्थापन

 झेंडूच्या आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत हे पंचवीस ते तीस मेट्रिक टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसेच 100 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश या प्रमाणात खते द्यावीत. संकरित जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्‍टर नत्र 250 किलो, स्फुरद  चारशे किलो याप्रमाणे लागवडीपूर्वीच जमिनीची व्यवस्थित मिसळून घ्यावे. झेंडूची सुदृढ रोपे मिळवण्यासाठी वाफ्यातील रोपांवर उगवणीनंतर एका आठवड्याच्या नंतर कार्बनडेंझिम 20 ग्रॅम किंवा कॅप टॉप 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

 

त्याप्रमाणेच आंतरप्रवाही कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्या आठ दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या द्याव्यात. हंगामी झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास एक-दोन वेळा 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलांच्या कळ्या लागल्यापासून फुलांचे काढणीपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters