हरभरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे. ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो. त्याला घाटा असे म्हणतात. याचे मूळस्थान तुर्कस्तान आहे असे मानतात. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते.
हरभरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. हरभरा जमिनीला वातावरणातील ३० किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करुन देतो . हरभऱ्यापासून डाळ, बेसन तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो. पानांची भाजी पण तयार करतात. अंकूर आलेले बियाणे रक्तदोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते .
लागवड :-
जमिनीचा प्रकार हलकी ,मध्यम , व भारी जमीनपूर्व मशागत नांगरणी व वखराची पाळी पेरणीची वेळ १५ आँक्टोबर ते नोव्हेंबर पहिला आठवडा. वाण बीडीएन ९-३ ,फूले जी -५, फुले जी -१२ आयसीसीव्ही -२ ,फूले जी-५ -८१ -१-१ चाफा,जी -१२ ,आयसीसीव्ही -१० विकास जी-१, विश्वास (जी -५ ), विशाल (फुले -जी -८७ -२०७ ) लागणारे बियाणे ७० ते १०० किलो प्रति हेक्टरी रोप संख्या ३. ३३ लाख बीजप्रक्रिया पेरणी पुर्वी रायझॊबियम व जिवाणू स्फुरद संवर्धक वापरावे. पेरणीचे अंतर ३० x १० सें .मीआंतर मशागत १ -२ खुरपण्यापीक पध्दती विशेष माहिती २ पाण्याच्या पाळ्या -१ पेरणी नंतर ४५ दिवासांनी व दुसरी ७५ दिवासाने दिल्यास उत्पादनात वाढ होते.
प्रभावी मर रोग व्यवस्थापन :-
ज्यांनी बीज प्रक्रिया केलेली नाही अशा शेतात मर येवून अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झालेले दिसते. बीज प्रक्रियेची गरज किती महत्वाची आहे हे यावरुन समजून येते. पेरणी बाकी असलेल्या पिकांची बीज प्रक्रिया करायलाच हवी आणि जी पिके रोपावस्थेत आहेत पण बीज प्रक्रिया राहून गेली आहे, अशा पिकांना नेहमी येणाऱ्या कीड रोगांच्या अंदाजाने कीड किंवा बुरशीनाशकाचे ड्रेंचींग करावे. रसायनांची प्रक्रिया झाल्यावर पेरणी पुर्वी जैविक बीज प्रक्रिया करावी.
-
हरभऱ्याच्या प्रति किलो बियाणास २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. व ५ ग्रॅम ट्रायकोडर्माने बीजप्रक्रिया करावी. जिवाणू खते गुळाच्या थंड पाण्यात मिसळून बीस लावावे. योग्य बीजप्रक्रिया केलेले पीक हुमनी, शोषक किडी आणि बुरशीजन्य रोगांपासून सुरुवातीच्या महत्वाच्या काळात सुरक्षित राहील.
-
हरभरा पिकात मररोग प्राथमिक अवस्था असताना. १ ग्रॅम ट्रायकोडर्मा २०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळा. तीन दिवसांनंतर मर प्रादुर्भावित भागात याचा वापर करा. किंवा ट्रायकोडर्मा आणि अन्य जैविक बुरशीनाशके असलेल्या औषधांचे ड्रेन्चिंग करा.
-
जास्त तापमानामुळे आणि सिंचनाच्या आर्द्रतेमुळे पिकात मुळांजवळ बुरशीची शक्यता निर्माण होते. तेथेही अशा द्रावणाचे ड्रेन्चिंग उपयोगी पडेल.
-
प्रादुर्भाव जास्त असेल तर (७०% कॅप्टन + ५% व हेक्झाकोनाझोल)टाटा ताकत. ३० ग्रॅम/पम्प पेरणीनंतर १५ व ३० दिवसांनी अलवणी करावी.
-
किंवा प्रोपेकनझोल ४ मिली प्रति १० लि पाण्यात मिसळून अलवणी केल्यास मर रोग आटोक्यात येऊ शकतो.
लेखक -
प्रा. हरिष अ.फरकाडे (वनस्पती रोगशास्त्र विभाग)
श्री शिवाजी उध्यानविध्या महाविध्यालय, अमरावती.
मो. 8928363638 इ. मेल. agriharish27@gmail.com
डॉ. अमोल झापे (पीक संरक्षण विभाग)
कृषिविज्ञान शाखा, ग्रामीण शिक्षण संस्था,
(डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. सलग्नं) पिपरी, वर्धा. मो.9822930358
Share your comments