भारताचा विचार केला तर भारतामध्ये सन 2007 ते 2008 या वर्षात वांगी पिकाखालील सुमारे 5.66 लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन 9595.8 मॅट्रिक तर उत्पादकता 16.9टन प्रति हेक्टर होती.भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, गुजरात,महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
महाराष्ट्रात विविध भागात आवडीनुसार वांग्याच्या विविध जाती आहेत. सांगली आणि सातारा या भागाचा विचार केला तर कृष्णाकाठची चविष्ट वांगे प्रसिद्ध आहेत. या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. ह्या लेखात आपण वांगी लागवड करण्यासाठी वांग्याची रोपवाटिका कशी तयार करावी व रोपांची लागवड याबद्दल माहिती घेणार आहोत.
अशा पद्धतीने तयार करा रोपवाटिका
वांग्याचीरोपे तयार करण्यासाठी गादीवाफे साधारणता तीन बाय दोन मीटर आकाराचे करून गादीएक मीटर रुंद व 15 सेंटिमीटर उंच असावी.
- प्रति वाक्यात चांगले कुजलेले शेणखत दोन पाट्या टाकावे व 200 ग्राम संयुक्त रासायनिक खत द्यावे. खत व माती यांचे मिश्रण करून गादीवाफ्यात समप्रमाणात पाणी मिळेल असे पहावे. प्रत्येक वाक्यात मर रोगाच्या नियंत्रणासाठी 30 ते 40 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड वापरावे.
- वाफ्याच्या रुंदीशी समांतर दहा सेंटिमीटर अंतरावर खुरप्याने एक ते दोन सेंटीमीटर खोलीच्या ओळी करून त्यात पातळ बी पेरावे. सुरुवातीस वाफ्यांना झारीने पाणी द्यावे.त्यानंतरपाटाने पाणी द्यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया आणि 15 ते 20 ग्रॅम फोरेट दोन ओळींमध्ये काकरी पाडून द्यावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे. किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी दहा दिवसांच्या अंतराने शिफारसीनुसार कीडनाशकांची फवारणी करावी.
- लागवडीपूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोपकणखर होईल. लागवड करण्याच्या अगोदर एक दिवस रोपांना पाणी द्यावे. रोप लागवडीसाठी पाच ते सहा आठवड्यात तयार होते. रोप 12 ते 15 सेंटिमीटर उंचीची झाल्यावर लागवड करावी.
वांगे रोपांची लागवड
लागवड करण्यापूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करावी व शेणखत मिसळावे. जमिनीचा मगदूर आहे त्या प्रमाणात योग्य अंतर घेऊन सरी-वरंबे पाडावेत. हलक्या जमिनीत 75 बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर लागवडीचे अंतर तर जास्त वाढणार्या किंवा संकरित जातीसाठी 90 बाय 90 सेंटिमीटर अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळया कसदार जमिनीत कमी वाढणार्या जातीसाठी 90× 75 सेंटीमीटर व जास्त वाढणार्या जातीसाठी 100×90 सेंटीमीटर अंतर ठेवावे.
Share your comments