कापसाच्या लागवड महाराष्ट्र राज्य अग्रक्रमावर आहे कापसाचे लागवडीत प्रामुख्याने महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, बोंडअळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी २००२ मध्ये बीटी जनुक असलेल्या वाणांचा वापर भारतामध्ये सुरू झाला परंतु बोंड अळीचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर सुद्धा दिसून येत आहे.
शेतकऱ्यांनी वेळेवर उपयोजना केल्यास बोंड अळीचा प्रादुर्भाव पासून होणारे संभाव्य नुकसान कमी करता येईल. दरम्यान कुठल्याही रासायनिक कीटकनाशकांचा बोंड अळीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. कापसात मुख्य ठिपक्याची बोंड आळी, अमेरिकन (हिरवी) बोंडअळी ,गुलाबी बोंड आळी यातीन बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव असतो.
बोंड अळीचा प्रकार |
पिकांवर येण्याचा कालावधी(पेरणीपासून) |
ओळख |
नुकसानीचा प्रकार |
ठिपक्याची बोंड अळी |
३० ते ६५ दिवस |
अंगावर पांढरे ठिपके असतात. ही तपकिरी रंगाची अळी १५- १८ मिमी लांब असते. |
अळी सुरुवातील शेंडा पोखारते यामुळे शेंडे वाळतात णि खाली वाकतात. बोंडे लालसर होऊन गळतात. बोंडाच्या आतील भाग पोखापल्याने बोंडे निकामी होऊन रुईची प्रत खालावते. |
अमेरिकन बोंड अळी |
४५ ते ८५ दिवस |
अळी हिरव्या रंगाची असून शरिरावर लांबीच्या बाजूने तुटक करड्या रंगाच्या रेषा असतात. पतंग मोठ्या आकाराच्या व पिवळसर तपिकरी असतो. |
अळी बोंडाना छिद्र पाडून तोंडाकडील भागाने आत शिरुन आतील भाग पोखरते. त्यामुळे बोंड निकामी होते. |
रोटरी गुलाबी बोंड अळी |
७५ ते ११० |
शेदरी रंगाची अळी साधरण १८-१९ मीमी लांबीची असते. डोक्यावर जवळचा भाग काळपट रंगाचा असतो. |
ही सर्वात जास्त विध्वंसक अळी आहे. अळी कवळ्या फुले, बोंडे, यांना बारीक छिद्र पाडून आत शिरते, फुले पुर्णपणे उमळत नाहीत. उघडलेल्या बोंडावर डाग दिसतात. |
कपाशीवरील बोंड आळीचे एकात्मिक व्यवस्थापन
पिकाचा हंगाम संपल्यावर खोल नांगरणी करावी. त्यामुळे पतंगाचे कोष उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष झाल्यामुळे नष्ट होतील.
हंगामात वेळेवर पेरणी करावी( जून ते जुलैचा पहिला आठवडा)
कपाशीच्या सभोवती नॉन बीटी रिफ्यूजी आश्रित कपाशीची पेरणी करावी.
मका, झेंडू, चवळी, एरंडी या सापळा पिकांची लागवड करावी.
कपाशीला पाते लागण्यास सुरुवात झाल्यानंतर हेक्टरी ५ कामगंध सापळे कपाशी पिकामध्ये लावावे.
शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून नत्र खतांचा संतुलित वापर करावा.
कपाशीला पाती लागल्यानंतर ७ ते ८ वेळा पिकांमध्ये दर १० दिवसानंतर ट्रायकोकार्ड एकरी ३ या प्रमाणात लावावे म्हणजे बोंडांचा अंडी अवस्थेत नायनाट होईल.
फुलाच्या अवस्थेत गुलाबी बोंड आळी ग्रस्त फुले नष्ट करावीत.
जैविक नियंत्रण:-
एच. एन.पी. व्ही. ५०० एल . ई प्रति हेक्टर क्रायसोपा अंडी ५०००० प्रति हेक्टर
निंबोळी अर्क ५% फवारणी
बिव्हेरिया बॅसियाना १.१५ डब्यू पी ५० ग्रॅम प्रति १० लिटर
रासायनिक नियंत्रण:
लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५% ईसी ८ मिली किंवा स्पिनोसॅड ४५ एस. सी. ३.५ मिली, किंवा
क्लोरोपायरीफॉस ५० ईसी २० मिली किंवा, प्रोफेनोफाॅस ५० ईसी ३० मिली किंवा क्विनाॅलफाॅस २० ए. एफ. २० मिली
प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लेखक -
प्रा. महेश गडाख
सहाय्यक प्राध्यापक, कृषिविद्या विभाग
डॉ. राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालय, बुलडाणा
पूजा लगड
Msc ( Agri)
पूजा माने
Bsc ( Agri)
Share your comments