आपल्याला माहित आहेच की वेगळी पिकांबरोबर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड एक आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होऊ शकते. आपण साग, चंदन, बांबू यासारखे वृक्षांची लागवड करतो.
परंतु या मधील फक्त एकच गोष्ट असते की यांचा कालावधी हा दीर्घ स्वरूपाचा असतो म्हणजेच हातात येणारे उत्पादन यायला कमीत कमी चार वर्षाच्या पुढील काळ जायला लागतो. परंतु ठीक आहे पडीक जमीन, खारवट जमीन इत्यादी ठिकाणी आपण अशा पर्यायांचा विचार केला तर उत्तम ठरू शकते. परंतु या लेखात आपण अशाच एका कडुलिंबाचा प्रकार म्हणजेच मलबार कडुलिंब लागवड व त्याच्या पासून मिळणारे आर्थिक उत्पन्न माहितीस्तव जाणून घेणार आहोत.
नक्की वाचा:माशांची योग्य निवड ठरेल मत्स्यशेती मधील यशाचे सूत्र, माशाची योग्य निवड यशाची जास्त खात्री
मलबार कडुलिंबाची माहिती आणि आर्थिक फायदा
हा कडुलिंबाचा प्रकार असून मलबार कडुलिंबाला मेलिया डबीया या नावाने देखील ओळखले जाते. मलबार कडूलिंब एक उष्णकटिबंधीय पानझडी वृक्ष आहे. जर पाण्याची योग्य सोय असेल तर वेगाने वाढते. प्लायवुड उद्योगांमध्ये आणि कागद उद्योगांमध्ये देखील याला खूप महत्त्व आहे. एकूण चार वर्षांमध्ये याची काढणी करता येते. ज्या प्रकारे निलगिरीच्या वृक्षाला वाढ असते त्याप्रमाणे जलदगतीने मलबार कडूलिंबाचे झाड देखील वाढते.
अवघ्या दोन वर्षापर्यंत 40 फूट एवढी उंची याची वाढते. जर शेतीत लागवडीचा विचार केला तर भारतात केरळ तसेच तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील शेतकरी या झाडाची लागवड बऱ्या प्रमाणात करू लागले आहेत. कमी पाण्यामध्ये मलबार कडुलिंबाची वाढ चांगली होते. याची लागवड जर करायची झाली तर माहितीप्रमाणे मार्च आणि एप्रिल महिना हा योग्य असतो असं म्हटलं जातं.
नक्की वाचा:एकात्मिक पीक पोषण व्यवस्थापन पद्धती: मिळेल भरघोस उत्पादन आणि साधला जाईल समतोल खतांचा
सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये मलबार ची वाढ चांगली होते. लागवडीनंतर 5 वर्षाच्या कालखंडामध्ये यापासून लाकूड प्राप्त होते. तसेच याला कीड लागत नसल्यामुळे उत्पादनावर होणारा खर्च देखील कमी प्रमाणात होतो. मलबार कडुलिंबाचे लाकूड प्लायवूड उद्योगासाठी सर्वात उत्कृष्ट मानले जाते तसेच टिकण्यास देखील उत्तम आहे.
प्राप्त माहितीनुसार मलबार कडुलिंबाचे लाकूड आठ वर्षानंतर विकता येते. बाजारामध्ये कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल किमतीने हे लाकूड बाजारात विकले जाते. एका झाडापासून दीड ते दोन टन लाकूड मिळते. म्हणजेच एक रोप सहा ते सात हजार रुपयांना विकले जाते. जास्त प्रमाणात शेती असेल आणि काहीतरी वेगळे करण्याचा जर विचार असेल तर हा पर्याय चांगली माहिती घेऊन आजमावू शकतात.
Share your comments