वेलवर्गीय पिकांमध्ये कारले एक महत्त्वाचे पीक आहे.कारल्या पासून कमी कालावधीत अधिक उत्पन्न व नफा मिळतो.कारल्याच्या औषधी गुणधर्मांमुळे यास भारतीयतसेच परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. कारण याच्या नियमित सेवनाने मधुमेह व हृदयविकार यासारखे आजार आटोक्यात येतात.
कारडे पिकाच्या वेलीला आधार देण्यासाठी मंडप उभारण्याची पद्धत
- या पद्धतीमध्ये अडीच बाय एक मीटर अंतरावर कारल्याची लागवड करतात. त्यासाठी अडीच मीटर अंतरावर रिजरनेसरी पाडावी. नंतर जमिनीच्या उतारानुसार पाणी चांगले बसण्याच्या दृष्टीने दर पाच ते सहा मीटर अंतरावर आडवे पाट पाडावेत व रान व्यवस्थित बांधून घ्यावे.
- मंडपाची उभारणी करताना शेताच्या सर्व बाजूंनी एक आड एक सरी सोडून म्हणजे पाच मीटर अंतरावर दहा फूट उंचीचे आणि चार उंच जाडीचे लाकडी डांब शेताच्या बाहेरील बाजूस झुकतील अशा पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत.
- डांबाच्या खालच्या बाजूवर डांबर लावावेम्हणजे जमिनीत गाडल्या वर ते कुजणारा नाहीत. प्रत्येक खांबास बाहेरच्या बाजूने दहा गज जाडीच्या तारेने ताण द्यावा. त्यासाठी एक ते दीड फूट लांबीच्या निमुळत्या दगडास दुहेरी तार बांधून तो दगड दोन फूट जमिनीत पक्का गाडावा.
- नंतर डांब बाहेरील बाजूस ओढून साडे सहा फूट उंचीवर तानाच्या तारेने पक्का करावा. तारक खाली घसरू नये म्हणून तारेवर यु आकाराचा खिळा ठोकून तार पक्के करावे.अशा रीतीने डांबाला ताण दिल्यानंतर 10गेजची दुहेरी तार पीळ देऊन साडेसहा फूट उंचीवर युवा आकाराचा खिळा ठोकून त्यात ओऊन पुलावर च्या साह्याने व्यवस्थित ताणून घ्यावी.
- तसेच चारही बाजूने समोरासमोरील लाकडी डांब एकमेकांना दहा गेजच्या तारेने जोडून घ्यावेत आणि कुलर च्या साह्याने तान आकाराचा चौरस तयार होईल. त्यानंतर बेलाच्या प्रत्येक सरीवर आठ फूट अंतरावर बांबूने ( दहा फूट उंच व दोन इंच जाड) वेलाच्या तारेस आधार द्यावा. म्हणजे मंडपासझोळ येणार नाही.तसेच वाऱ्याने मंडपहलणारनाही.
- मंडप उभारण्याचे काम वेल साधारण एक ते दीड फूट उंचीचे होण्याआधी पूर्ण होणे गरजेचे आहे. मंडप तयार झाल्यानंतर साधारणतः साडेसहा ते सात फूट लांबीची सुतळी घेऊन तिचे एक टोक वेलाच्या खोडाजवळ तिरपी काडी रोवून त्या काडीस बांधावे व दुसरे टोक वेलीवरील तारेस बांधावे व वेल त्या सुतळीसपीळदेऊन तारेवर चढवावी.
- वेल पाच फूट उंचीची झाल्यानंतर तनावे काढणे थांबवावे.
- मुख्य वेल मांडवावर पोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावाव राखलेल्या बगल फुटी वाढू द्याव्यात.
- वेलींना आधार आणि वळण देणे गरजेचे व फायदेशीर आहे. जमिनीत बिया टाकल्यानंतर साधारणतः आठ ते दहा दिवसात उगवण येतात. चांगले वाढत असलेले रोप ठेवून बाकीचे काढून टाकावेत.
- मुलीच्या जवळ एक फुटाच्या लहान काटक्या रोवून घ्याव्यात.तर त्या काटक्याना सुतळी बांधावी व वेलीच्या अगदी बरोबर वरून आडव्या जाणाऱ्या तारेला दोन पदरीसुतळी बांधावी. नंतर वेल जसा वाढेल तसा तो त्या तणावाच्या सहाय्याने दोरीवर चढत जातो.
- वेली दोरीच्या हेलकावे नि खाली पडणार नाहीत तसेच शेंडे मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी. वेलीच्या फुटी जशा वाढतील तशा मांडवाच्या तारेवर आडव्या पसरवून घ्याव्यात.
Share your comments