बागेच्या पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन करावे.
लिंबावरील खैऱ्या रोगाचा फैलाव पावसाळ्यात फार झपाट्याने होतो, त्यामुळे लिंबाच्या झाडावरील रोगग्रस्त फांद्या, पाने कापून, जाळून नष्ट कराव्यात झाडावर १८० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि सहा ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन प्रति ६० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी आवश्यकतेनुसार ३० दिवसांनी करावी.
या महिन्यात फळातील रस शोषणाऱ्या पतंगाचाही प्रादुर्भाव असते. प्रौढ पतंग सायंकाळी बाहेर पडतात. पिकणाऱ्या आणि पिकलेल्या फळाच्या सालीत बारीक छिद्र पाडतात पतंगांना आकर्षित करून मारण्यासाठी २० ग्रॅम मॅलॅथिऑन प्रति दोन लिटर पाण्यात मिसळावे. यामध्ये 200 ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण प्लॅस्टिक ट्रेमध्ये ओतून यावर प्रकाश सापळा बागेत लावावा.
गळालेली फळे नष्ट करावीत.
कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणीच १.५ मि.लि. डायकोफॉल किंवा विद्राव्य गंधक तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यक भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
फळातील रस शोषणाऱ्या पतंगामुळे ६० ते ७० टक्के फळगळ होऊ शकते.
या किडीच्या नियंत्रणासाठी कडुनिंबावर आधारित कीडनाशकाची तीन मि.लि. (३०० पीपीएम तीव्रता)
प्रति लिटर पाण्यात मिसळून तोडणीच्या १५ दिवस पूर्व झाडांवर फवारणी करावी.
Share your comments